Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील एक महत्त्वाचा महामार्ग पुढील काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. नगर-दौंड महामार्गावर असलेल्या नगर-बीड रेल्वेमार्गाच्या क्रॉसिंग पुलाच्या कामामुळे हा नगर दौंड महामार्ग पुढील काही दिवस वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.
जिल्हा पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार या मार्गावरील वाहतूक एक ऑक्टोंबर पासून म्हणजेच कालपासून बंद करण्यात आली आहे. तसेच ही वाहतूक 11 ऑक्टोबर पर्यंत बंद राहणार आहे.
हा मार्ग एक ते 11 ऑक्टोबर पर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याने या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना इतर पर्यायी मार्गाचा अवलंब या ठिकाणी करावा लागणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मार्गावरील वाहतूक कायनेटिक चौक ते केडगाव बायपासमार्गे वळविण्यात आली आहे.
नगर-दौंड महामार्गावर नगर-बीड रेल्वे लाईनला ओलांडणी पुलाच्या बांधकामाचा तिसरा टप्पा नुकताच सुरु करण्यात आला आहे. या पुलाचे काम नगर दौंड महामार्गावरील वाहतूक सुरू ठेवून करता येणे शक्य होते. याच पार्श्वभूमीवर या महामार्गावरील वाहतूक कालपासून बंद करण्यात आली आहे.
प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे, या बांधकामासाठी साईटजवळ मोठमोठे गर्डर बसविण्यात आले आहेत. हे गर्डर बसविण्यासाठी मोठे क्रेन व ट्रेलर सुद्धा वापरले जात आहेत. अशा स्थितीत वर्दळीच्या या महामार्गावरील वाहतूक सुरू ठेवणे धोकेदायक सिद्ध होणार होते.
हेच कारण आहे की हा वर्दळीचा महामार्ग जोपर्यंत या पुलाचे काम होत नाही तोपर्यंत बंद राहणार आहे. रहदारीचा रस्ता असल्याने पुलाचे काम करताना अपघात होण्याची शक्यता होती. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाहीये.
त्यामुळे या मार्गावरील कायनेटिक चौक ते अरणगाव बायपास या रोडवरील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे. या वाहतूक बदलानुसार कायनेटिक चौकातून दौंड रस्त्याने अरणगाव बायपासकडे जाणार्या वाहनांकरिता पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आदेश प्रशासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आले आहेत.
कायनेटिक चौक केडगाव केडगाव बायपास अरणगाव बायपासमार्गे इच्छितस्थळी जाऊ शकतील, असे प्रशासनाकडून सांगितले गेले आहे. यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन देखील प्रशासनाच्या माध्यमातून यावेळी करण्यात आले आहे.