आज २१ जून; जाणून घ्या आजच्या दिवसाबद्दल ‘ही’ खास माहिती..!

Pragati
Updated:

येणार प्रत्येक दिवस हा तसा महत्वाचाच असतो, मात्र २१ जून हा खास असतो. तो म्हणजे हा वर्षातला सर्वात मोठा दिवस असतो, आज महिलांचा महत्वाचा असणारा सण वटपौर्णिमा, आंतरराष्ट्रीय योगदिन असा हा दिवस. जाणून घेवूया याबाबत अधिक माहिती …

वर्षा ऋतुच्या सुरुवातीला ढगांच्या लपंडावात विविध दृश्य साकारताना खुल्या आकाशातील अनेक नजारे सुखावून जातात. पावसानंतर वातावरणातीत धुलीकणांचे प्रमाण कमी होत असल्याने या ढगांच्या पलिकडील सुंदर आकाशाचा आनंद घेता येतो. २१ जून रोजी सर्वात मोठा दिवस व रात्र लहान राहणार असल्याचे खगोल निरीक्षकांनी सांगतले आहे.

२१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवसाचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे २१ जून हा वर्षातला सर्वात मोठा दिवस असतो, पृथ्वी फिरत असल्याने सूर्याचे दक्षिणोत्तर सरकणे सदैव सुरु असते. २१ जूनला सूर्य नेमका कर्कवृत्तावर आल्याने नंतर त्याच्या दक्षिणेला जाण्याला दक्षिणायन म्हणतात. उत्तरायण संपून दक्षिणायनही सुरु होते.

या वेळी सूर्य उत्तर गोलार्धाकडे झुकलेला असल्याने दिनमानात वाढ होत असून, २१ जून रोजी वर्षातील सर्वात मोठा दिवस सव्वा तेरा तासांचा व रात्र पावणेअकरा तासांची होते. या दिवशी सूर्यापासून सर्वाधिक उर्जा मिळते. २१ जून रोजी सूर्य पृथ्वीच्या उत्तर ध्रुवावर असतो. त्यामुळे पृथ्वीचा उत्तर ध्रुव हा २१ जून या दिवशी सुर्याच्या दिशेने सर्वाधिक कोनामध्ये कललेला असतो.

या दिवशी सूर्य कर्कवृत्तात थेट डोक्यावर येतो व यामुळेच पृथ्वीवर या दिवशी सर्वाधिक प्रकाश पडतो. पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास लागणाऱ्या वेगामुळे २१ जून हा वर्षातल्या इतर दिवसांच्या तुलनेत सर्वात मोठा दिवस असतो.

सूर्यमालेतील सर्वात लहान असलेला बुध ग्रह २३ जूनपासून व सर्वात तेजस्वी शुक्र ग्रह २७ जून रोजी उदित होत असल्याने सायंकाळी पश्चिम आकाशात पाहता येईल. हे दोन्ही ग्रह पृथ्वी व सूर्य यांच्यामध्ये असल्याने दुर्बिणीतून आपल्याला चंद्राप्रमाणे बघता येतील.

सूर्य, चंद्र व ग्रहांचा भ्रमण मार्ग अर्थात बारा राशींचे चक्र यामधील पश्चिमेस मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ व अगदी विंचवासारखी दिसणारी वृश्चिक राशी पूर्व क्षितीजावरील असेल.

दर दोन तासांनी एक राशी पूर्वेस उदय व एकीचा पश्चिमेस अस्त होत असून, या सहा राशीतील पुनर्वसूचे कॅस्टर व पोलूक्स, कर्क राशीतील पुष्य नक्षत्र, सिंहेतील मघा, कन्या मधील चित्रा, स्वाती आदि नक्षत्र ठळक स्वरूपात बघता येतील. आकाश निरीक्षणाचा आनंद घेण्याचे आवाहन खगोल तज्ज्ञांनी केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe