Ahmednagar Politics : निलेश लंकेंच्या संपर्क कार्यालयावर बुलढोजर, विखेंनी मुद्दाम केलं? आता मंत्री विखे पाटलांनी स्पष्टच सांगितलं..

Pragati
Published:
vikhe lanke

Ahmednagar Politics : महसूल विभागाने सुपे येथील अतिक्रमणवर हातोडा घातला आहे. येथील बरेचसे अतिक्रमण पाडण्यात आले आहेत. पारनेर तालुक्यातील सुपा येथे शनिवारी सकाळी अतिक्रमण हटाव मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात माजी आमदार नीलेश लंके यांच्या सुपा- पारनेर रस्त्यावरील एमआयडीसी चौकातील जनसंपर्क कार्यालयावर हातोडा पडला,

तसेच याच परिसरातील एक मंदिर, एक दर्गाही हटविण्यात आला. दोन दिवस चाललेल्या पहिल्या टप्प्यात ३०० हून अधिक अतिक्रमणे हटविण्यात आली होती. त्यावेळी एमआयडीसीतील ८० अतिक्रमणांवर हातोडा पडला होता. अतिक्रमण हटविण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधितांना नोटीस बजावली होती.

अतिक्रमण हटाव मोहिमेच्या वेळी उपविभागीय दंडाधिकारी गणेश राठोड, उपविभागीय पोलिस अधिकारी संपत भोसले यांच्यासह पोलिस निरीक्षक, औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच, शीघ्र कृतिदलाची तुकडीसह मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

काही व्यावसायिकांनी न्यायालयाकडून स्थगिती मिळविल्याने पहिल्या टप्प्यावेळी काही अतिक्रमणे हटविण्यात आली नव्हती. न्यायालयाच्या स्थगितीची मुदत संपताच शनिवारी सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभाग यांनी पोलिस बंदोबस्तात दुसऱ्या टप्प्यातील अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात केली.

महसूलमंत्री राधाकृष्ण विखेंचा हात?
हे काम मुद्दामून करण्यात आले आहे. विखे मुद्दाम वचपा काढत आहेत अशा चर्चा काही नागरिक करत आहेत. परंतु आता याबाबत स्वतः महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

काय म्हणाले महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
सुपा येथील अतिक्रमण काढण्याच्या मोहीमेत कोणतीही राजकीय सूडबुध्दी नाही. प्रशासनाने ही कारवाई केली आहे. जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणची अतिक्रमण सगळीकडेच काढण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यामुळे गुन्हेगारीला पाठबळ मिळत होते. पण ज्यांनी आशा भाडोत्री लोकांमार्फत आपला धंदा सुरू ठेवला आहे. त्यांना वाईट वाटणे सहाजिक असल्याचा टोला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी लगावला.

आ. थोरातांवरही टीकास्त्र
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या दाव्याची खिल्ली उडवताना मंत्री विखे म्हणाले की ज्यांना काँग्रेससाठी जिल्ह्यात एकही जागा आणता आली नाही. त्यांनी दुसऱ्यांची तळी उचलण्यात त्यांनी धन्यता मानली. आता स्वतःच्या अस्तित्वाची चिंता करा, असा खोचक सल्ला मंत्री विखे पाटील यांनी दिला

. आचारसंहिता अद्याप शिथिल झाली नसली तरी टंचाईच्या बाबतीत सर्व सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. पाणी आणि चारांची टंचाई कुठेही भेडसावणार नाही याची दक्षता घेतली जात असल्याचे मंत्री विखे म्हणाले

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe