Ahmednagar Politics : चार जूननंतरच्या मंत्रीमंडळ विस्तारात आमदार संग्राम जगताप यांचे नाव निश्चित, मिळणार ‘हे’ मंत्रिपद ?

Pragati
Published:
sangram jagatap

Ahmednagar Politics : लोकसभा निवडणुकीचा निकाल आता काही तासांवर येऊन ठेपला आहे. ४ तारखेला निवडणुकीचा निकाल लागेल. दरम्यान या निकालानंतर लगेच राज्याच्या मंत्रीमंडळाचा विस्तार होईल असे म्हटले जात आहे.

आगामी विधानसभेच्या व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दृष्टीने हा विस्तार महत्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे आता या मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामध्ये शिंदेगटापेक्षा अजित पवार गटाला जास्त जागा मिळतील असे म्हटले जात आहे.

यामध्ये अहमदनगर शहरचे आमदार संग्राम जगताप यांचेही नाव आघाडीवर असून त्यांना राज्यमंत्रीपद मिळणार असल्याची माहिती समजली आहे.

आमदार संग्राम जगताप आघाडीवर
मंत्रिमंडळ विस्तारात आ. जगताप यांचे नाव अजित पवार गटाकडून पुढे आहे. अहमदनगर जिल्ह्यावर आपली पकड कायम ठेवण्यासाठी व युवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी ही खेळी उपमुख्यमंत्री अजित पवार खेळू शकतात असे म्हटले जात आहे.

अहमदनगर जिल्हा सहकाराची पंढरी समजली जाते. त्यामुळे येथे शरद पवार गटाला शह देण्यासाठी व आपली पकड मजबूत करण्यासाठी अजित पवार जगताप यांना मंत्रिपद देतील असे म्हटले जात आहे. लोकसभा निवडणूक जाहीर होताच लंके यांनी सोडचिठ्ठी दिली होती त्यामुळे आता लंके यांना शह देण्यासाठीही ही खेळी असू शकते असे म्हटले जाते.

नाराजांना संधी
लोकसभा निकालानंतर मंत्रिमंडळ विस्तार करून अनेक नाराजांना संधी दिली जाईल. सध्या अनेक मंत्र्यांकडे एकापेक्षा जास्त खाती असल्याने त्यांना त्या विभागांना पाहिजे तेवढा वेळ देता येत नसल्याने आता हा विस्तार होईल.

दरम्यान भाजप ,राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या सेनेच्या कुठल्या आमदाराला मंत्री पद मिळेल हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे. ज्या आमदारांना मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळणार नाही त्यांना महामंडळावर देखील नियुक्त केले जाऊ शकते अशी माहिती समजली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Ahmednagar News