स्पेशल

Ahmednagar Politics : ..तर निलेश लंकेंचा झाला असता आणखी मोठा विजय, पण ‘तो’ घोळ कुणाच्या लक्षातच आला नाही

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभेची निवडणूक राज्यात गाजली असल्याने निकालाकडे देखील सर्वांचे लक्ष लागले होते. अहमदनगर लोकसभेत लंके की विखे? हे पाहण्याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला होता. अखेर निलेश लंके यांचा जवळपास २९ हजार मतांनी विजय झाला.

परंतु त्यांत आता एक बाब आणखी लक्ष घेण्याची गरज आहे ती म्हणजे तुतारी चिन्ह असणारा एक अपक्ष देखील या निवडणुकीत उभे होते. आळेकर गोरख दशरथ हे अहमदनगर लोकसभेत अपक्ष उभे होते. त्यांचे चिन्ह तुतारी हे होते. त्यांना जवळपास ४४ हजार ५९७ मते मिळाली.

अर्थात हे मात्र त्यांचीच होती की एकसारख्या चिन्हामुळे मिळाली हा चिंतनाचा व वादाचा विषय होईल. परंतु काही लोक म्हणतात की एकसारखे चिन्ह असल्याने निलेश लंके यांची मते त्यांना मिळाली.

जर असे झाले असेल व जर हे चिन्ह नसते तर साधारण यातील ४० हजार मते तरी निलेश लंके यांना पडली असती. म्हणजेच आणखी ४० हजार मतांची भर पडली असती. तर एकंदरीत ७० हजार मतांचे मताधिक्य निलेश लंके यांना राहिले असते.

निलेश लंके यांचे नुकसान?


एकसारख्या चिन्हामुळे निलेश लंके यांचे नुकसान झाले आहे का? अशा चर्चा आता लोक करतायेत. जर आणखी काही मते या चिन्हांनी खाल्ले असते तर मग सुजय विखे यांचा विजय झाला असता का? अशी देखील चर्चा सध्या लोक करतायेत. हेच चिन्ह नसते तर लंके यांना ४० हजारांचे तरी आणखी लीड भेटले असते अशा चर्चा आहे.

चिन्हाला केला होता विरोध
सुरवातीलाच चिन्ह वाटप झाल्यानंतर हे चिन्ह देऊ नका यासाठी आ. रोहित पवारांसह अनेकांनी विनंती केली होती. परंतु हे चिन्ह कायम ठेवण्यात आले होते.

Ahmednagarlive24 Office