Ahmednagar Politics : विवेक कोल्हेंना थोरात-तांबे-लंके हे मदत करणार ? विखेंविरोधात असे आहे राजकीय गणित

Pragati
Published:
vivek kolhe

Ahmednagar Politics : यंदाचे २०२४ हे वर्ष निवडणुकांचे वर्ष ठरणार आहे. याचे कारण म्हणजे नुकतीच लोकसभा पार पडली. आता लवकरच विधानसभा व स्थानिक स्वराज्य संघांच्या निवडणूक होतील. तत्पूर्वी आता शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. विशेष म्हणजे नाशिक शिक्षक मतदार संघाची ही निवडणूक जाहीर झाल्यापासून गाजली आहे.

याचे कारण असे की, ही निवडणूक शिक्षक केंद्रित न राहता राजकीय धुरंधरांच्या भोवती केंद्रित होत गेली. यात आता भाजपचे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव विवेक कोल्हे यांनी काल (दि.३१ मे) अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. डॉ. राजेंद्र विखे हे भाजपकडून इच्छुक आहेत. तर आता अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते दत्ता पानसरे हे देखील इच्छुक झाले आहेत.

दरम्यान आता विवेक कोल्हे यांनी अपक्ष फॉर्म का भरला? विवेक कोल्हे आणि विखे यांचा राजकीय संघर्ष पाहता काँग्रेसचे आ. बाळासाहेब थोरात, माजी आ. सुधीर तांबे, तसेच माजी आ. निलेश लंके हे विवेक कोल्हे यांना मदत करतील का? की सर्वपक्षीयांची मदत घेता यावी यासाठीच कोल्हे अपक्ष उभे राहिले? अशा विविध शक्यता निर्माण झाल्या आहेत.

काँग्रेसचे आ. थोरात मदत करतील?
शिर्डीमधील गणेश कारखाना असेल किंवा संस्थानची सोसायटी असो कोल्हे व आ. बाळासाहेब थोरात यांनी एकत्र लढवत विखे यांना शह दिला. त्यावेळी कोल्हे हे भाजपचे असूनही व थोरात काँग्रेसचे असूनही त्यांनी कसलाही विचार न करता एकमेकांची साथ दिली. त्यामुळे आता या निवडणुकीत आ. थोरातांची मदत मिळावी यासाठी तर ते अपक्ष उभे नाहीत ना? अशी चर्चा सुरु आहे.

माजी आ. सुधीर तांबे यांची मदत?
माजी आ. सुधीर तांबे हे देखील या निवडणुकीत कोल्हे यांना मदत करतील का अशी चर्चा सुरु आहे. त्याचे कारण असे की, या निवडणुकीत सुधीर तांबे यांचे काही मार्गदर्शन आहे का? असा प्रश्न मीडियाने विवेक कोल्हे यांना विचारला असता त्यांनी पाचही जिल्ह्यात संस्था चालक, शिक्षक, संघटना यांच्या जेव्हा आम्ही भेटी घेतल्या त्याकाळात

सुधीर तांबे यांचे सर्वोच्च काम असल्याचे दिसून आले, त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे असल्याचे ते म्हणाले. तसेच त्यांची साथ आपल्याला आगामी काळात मिळेल असे वक्तव्य त्यांनी केले होते.

माजी आ. निलेश लंके यांचीही साथ?
या निवडणुकीमध्ये विवेक कोल्हे यांना माजी आ. लंके हे देखील मदत करू शकतात असे म्हटले जात आहे. त्याचे कारण असे की. लोकसभेचे तिकीट जाहीर होण्यापूर्वी कोल्हे व लंके यांची मैत्री व राजकीय वक्तव्ये खूपच चर्चेत आलेले होते. त्याची आठवण म्हणून निलेश लंके हे शिक्षक मतदार संघ निवडणुकीत विवेक कोल्हेंची साथ देऊ शकतात अशी चर्चा आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe