लाडकी बहीण योजनेचे निकष खरच बदलले आहेत का? अजित पवारांनी दिली मोठी माहिती

निवडणुका झाल्यात आणि लाडकी बहीण योजनेचे निकष बदलले गेलेत अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. आज सकाळपासून या चर्चांना अधिक जोर पकडला आहे. प्रसार माध्यमांमध्ये लाडकी बहीण योजनेचे निकष चेंज झाले असल्याचे म्हटले गेले असून आता याच संदर्भात अजित पवार यांनी मोठे भाष्य केले आहे.

Tejas B Shelar
Published:
Ajit Pawar On Ladki Bahin Yojana

Ajit Pawar On Ladki Bahin Yojana : लोकसभा निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्रातील महायुती सरकारने लाडके बहीण योजनेची सुरुवात केली. योजना जुलै 2024 मध्ये सुरू झाली असून या अंतर्गत आत्तापर्यंत पात्र ठरणाऱ्या महिलांना एकूण पाच हप्ते वितरित करण्यात आले आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या आधीच पात्र ठरणाऱ्या महिलांना 5 हप्ते देण्यात आले असून या योजनेच्या जोरावरच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांमध्ये महायुती सरकारला चांगले घवघवीत यश प्राप्त करता आले आहे.

अनेक राजकीय विश्लेषकांनी असाच दावा केला असून स्वतः सरकारही लाडक्या बहिणीचे आभार मानायला विसरत नाहीये. मात्र, निवडणुका झाल्यात आणि लाडकी बहीण योजनेचे निकष बदलले गेलेत अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत.

आज सकाळपासून या चर्चांना अधिक जोर पकडला आहे. प्रसार माध्यमांमध्ये लाडकी बहीण योजनेचे निकष चेंज झाले असल्याचे म्हटले गेले असून आता याच संदर्भात अजित पवार यांनी मोठे भाष्य केले आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीमधील नेत्यांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या रकमेत वाढ केली जाईल असे आश्वासन दिले होते. लाडकी बहीण योजनेचे पैसे पंधराशे रुपयांवरून 2100 रुपये करू अशी ग्वाही महायुतीच्या नेत्यांनी दिली.

मात्र, आता निवडणुकीचा निकाल लागला असून येत्या काही दिवसांनी सत्ता स्थापित होणार असे दिसत असतानाच लाडकी बहीण योजनेचे निकष बदलले गेले आहेत अशा काही चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, आता याच संदर्भात राज्यातील सध्याचे काळजीवाहू उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी मोठी माहिती दिली आहे.

अजितदादांनी आपल्याच अंदाजात यावर भाष्य केले आहे. दादा स्टाईलमध्ये उत्तर देताना काळजीवाहू उपमुख्यमंत्री अजित दादा यांनी, ‘अरे काळजीवाहू सरकारमध्ये कुठे निकष बदलायला निघाला बाळ’, असं उत्तर दिलय.

अजित पवार यांनी पुण्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधाला. यावेळेस ते बोलत होते. यावेळी अजित दादांना पत्रकारांनी दादा लाडकी बहीण योजनेचे निकष बदललेत का? असा प्रश्न विचारला होता.

यावर उत्तर देताना काळजीवाहू सरकारमध्ये कुठे निकष बदलले जाऊ शकतात का असे अजित दादांनी म्हटले आहे. थोडक्यात या योजनेचे कोणतेच निकष बदलले गेले नाहीत असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe