स्पेशल

कांदा निर्यात बंदी बद्दल अजित पवार स्पष्टच बोलले ! आता परत…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

‘अब की बार ४०० पार’ या घोषणेबद्दल विरोधकांनी आमच्याबद्दल गैरसमज पसरवण्याचे काम केले. ४०० पार कशासाठी तर यांना संविधान बदलायचे आहे. आदिवासींचे अधिकार कमी करणार आहे. समान नागरी कायदा आणायचा आहे, असा गैरसमज निर्माण केला गेला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेले संविधान कोणीही बदलू शकत नाही. सर्व धर्म समभाव ही राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

कडूस (ता. खेड) येथे श्री क्षेत्र कडूस ते शिरदाळे या २४१ कोटी रुपये मंजूर झालेल्या सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्याचे भूमिपूजन व कडूस गावठाण अंतर्गत २ कोटी रुपये खर्च करून केलेल्या सिमेंट काँक्रीटीकरण कामाचा उ‌द्घाटन समारंभ, जनसंवाद आणि शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. पवार म्हणाले, तुमच्यामुळे मला अर्थ खाते मिळाले. तुम्ही दिलीप मोहिते पाटील यांना निवडून दिले.

तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही भरघोस निधी उपलब्ध करून दिला. सुरुवातीची दोन वर्ष आम्ही सत्तेत होतो. पहिले वर्ष कोरोनामुळे वाया गेले. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसाठी अनेक अडचणी आल्या. पण आज प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन केले. सेंट्रल बिल्डिंगमध्ये सर्व शासकीय कार्यालये बसतात की नाही, त्यासाठी दोन मजले वाढवावे लागतील. त्यासाठी अधिकचा २४ कोटी रुपयांच्या निधीला तत्त्वतः मान्यता दिली. मी माझ्या राजकीय जीवनात कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही.

आदिवासी बांधवांसाठी खावटी योजना आणण्याचा आमचा विचार सुरू आहे. माझ्या माता-भगिनी शेतात काम करतात. स्वतःसाठी कधीही पैसे खर्च करत नाही. तिच्यासाठी आम्ही लाडकी बहीण योजना आणली. पुणे जिल्ह्यात १८ लाख लाडकी बहीण योजनेचे अर्ज मंजूर झाले आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात ९ लाख लाडकी बहीण योजनेचे अर्ज मंजूर झाले आहेत.

आमदार दिलीप मोहिते पाटील म्हणाले, चाकण ग्रामीण रुग्णालयासाठी १०० कोटी रुपये दिले. तसेच उर्वरित रुग्णालयाच्या कामासाठी १०० कोटी रुपये अधिकचे देणार आहे. कडूस ते कोहिंडे बुद्रुक रस्त्यासाठी अधिकचा निधी दादा देणार आहेत. खेड तालुक्यात १ लाख ९ हजार आमच्या लाडक्या बहिणी झाल्या आहेत. अनेक महिलांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाल्यावर दादांचे आभार मानले.

काहीही झाले तरी कांदा निर्यात बंदी होऊ देणार नाही.

दरम्यान राज्यातील कांद्याच्या प्रश्नाबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं विधान केलंय. “केंद्रात आणि राज्यात आमच्या विचाराचं सरकार असल्यानं कांदा निर्यातीवर बंदी घालणार नाही,असेही त्यांनी बोलताना सांगितले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24