स्पेशल

देशासाठी धोक्याची घंटा ! अखेर ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- भारतात ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटचा शिरकाव झाला आहे. कर्नाटकमध्ये ओमायक्रॉन व्हेरीयंटचे दोन रुग्ण आढळले असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे जॉईंट सेक्रेटरी लव अग्रवाल यांनी दिली आहे.

बंगळुरू विमानतळावर आल्यानंतर ६६ व ४६ वर्षीय पुरुषांची करोना चाचणी करण्यात आली होती. ही चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर जीनोम सिक्वेन्सिंग करण्यात आले.

चाचणीसाठी पाठवलेल्या नमुन्यांमधून ‘ओमायक्रॉन’ विषाणू असल्याचे स्पष्ट झाले. दक्षिण आफ्रीकेत सापडलेल्या कोरोनाचा नवा वेरियंट ओमिक्रॉन ने जगभराची चिंता वाढवली आहे.

वेगवेगळ्या देशात हा नवा स्ट्रेन सापडत आहे. दरम्यान भारतातील कर्नाटकामध्ये याचे दोन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता भारतीयांची चिंता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

या पार्श्वभुमीवर सुक्ष्मजीवशास्त्रातील तज्ञांनी सरकारकडे बूस्टर डोस देण्यात यावा अशी मागणी केली आहे. सध्या हा व्हेरिएंट वेगाने पसरत असल्याने जगभरात चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

पण भारतात चिंता करण्याची गरज नाही नागरिकांनी खबरदारीची पुरेपूर काळजी घ्यावी असं आवाहन आरोग्य मंत्रालयाने केले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office