रिलायन्स जिओची भन्नाट ऑफर ! ‘हा’ 80 रुपयांपेक्षा कमीचा प्लॅन ग्राहकांसाठी ठरणार फायदेशीर, काय लाभ मिळणार ? वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Reliance Jio Plan : रिलायन्स जिओ ही देशातील एक प्रमुख टेलिकॉम कंपनी आहे. Reliance Jio चे करोडो ग्राहक आहेत. दरम्यान, कंपनी आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या ऑफर्स घेऊन येत असते.

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जिओने आत्तापर्यंत शेकडो ऑफर्स आणल्या आहेत. अनेक नवीन प्लॅन लॉन्च केले आहेत. हे नवनवीन प्लॅन्स ग्राहकांमध्ये विशेष लोकप्रिय देखील आहेत. ग्राहक आपल्या सोयीने आणि आवडीनुसार वेगवेगळ्या प्लॅनचा रिचार्ज करत असतात.

इतर कंपन्यांशी तुलना केली असता रिलायन्स जिओचे प्लॅन स्वस्त आहेत असा दावा ग्राहक करतात. दरम्यान आज आपण जिओच्या 80 रुपयांपेक्षा कमीच्या प्लॅन बाबत माहिती पाहणार आहोत. हा 75 रुपयांचा प्लॅन असून यामध्ये ग्राहकांना 23 दिवसांची व्हॅलिडीटी म्हणजेच वैधता मिळते.

या प्लॅनने रिचार्ज केल्यानंतर 23 दिवसांसाठी ग्राहकांना अमर्याद कॉलिंगचा लाभ घेता येतो. यामध्ये ग्राहकांना 0.01 एमबी डाटा मिळतो, सोबतच 200 एम बी अतिरिक्त डेटा देखील ग्राहकांना उपलब्ध करून दिला जातो. म्हणजेच जिओच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना अडीच जीबी डेटा मिळतो.

याशिवाय पन्नास एसएमएस देखील उपलब्ध होतात. म्हणजे जर तुम्हाला कोणाला मेसेज करायचा असेल तर तुम्हाला 23 दिवसांसाठी 50 एसएमएस करता येऊ शकतात. मात्र हा प्लॅन सर्वच ग्राहकांसाठी नाहीये. जे लोक जिओ फोनचा वापर करतात, त्यांच्यासाठी हा पर्याय आहे.

Jiophone हा एक बारफोन आहे जो रिलायन्स कंपनीचाच आहे. याच फोनच्या ग्राहकांसाठी हा प्लॅन आहे. म्हणजेच जर तुमच्याकडे स्मार्टफोन असेल आणि त्यामध्ये जिओचे सिम असेल तर तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही. यासाठी तुम्हाला दुसऱ्या प्लॅनने रिचार्ज करावा लागणार आहे.

अर्थातच जिओ फोनच्या ग्राहकांना दिवसाला तीन रुपये खर्च करून अमर्यादित कॉलिंग लिमिटेड इंटरनेट आणि एसएमएसचा लाभ घेता येणार आहे. याशिवाय जिओचा आणखी एक 91 रुपयाचा प्लॅन उपलब्ध आहे. हा देखील प्लॅन जिओ फोन ग्राहकांसाठीच आहे.

या प्लॅनमध्ये 28 दिवसांची व्हॅलिडीटी मिळते. यात अमर्यादित कॉलिंग, 0.01 एमबी डेटा प्लस अतिरिक्त 200 एम बी डेटा असा एकूण 28 दिवसांसाठी 3 जीबी डेटा मिळतो. या प्लॅन सोबत पन्नास एसएमएस देखील मिळतात.