Ambani Family:- भारतातील जर आपण प्रसिद्ध उद्योगपतींचा विचार केला तर आपल्या डोळ्यासमोर पटकन येते ते अंबानी आणि टाटा ही नावे. यातील आपण जर अंबानी कुटुंबाचा विचार केला तर धीरूभाई अंबानी यांनी अगदी शून्यातून त्यांचे उद्योगविश्व उभे केले व आज त्यांचा हा सगळा वारसा मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी व त्यांची मुले यांनी यशस्वीपणे पुढे चालवलेला आहे.
मुकेश अंबानी म्हटले म्हणजे आज भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामधील एक प्रसिद्ध उद्योगपती म्हणून ओळखले जाणारे नाव असून जवळपास सर्व क्षेत्रांमध्ये या उद्योगसमूहाच्या कंपन्या असून जागतिक श्रीमंताच्या यादीमध्ये देखील मुकेश अंबानी यांचे नाव कायम पुढेच असते.
आज मुकेश अंबानी यांचे मुले त्यांचे विविध उद्योग सांभाळण्यासाठीच्या जबाबदाऱ्या पार पाडताना देखील आपल्याला दिसून येत आहेत. अशा या भारतातील महत्वपूर्ण कुटुंबाबद्दल जर आपण पाहिले तर अनेक महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला सांगता येतील.
परंतु जर आपण या सगळ्या कुटुंबातील सदस्यांच्या शिक्षणाच्या बाबतीत विचार केला तर बहुतेक जण हे उच्चशिक्षित आहेत. त्या अनुषंगाने आपण या लेखामध्ये अंबानी कुटुंबातील कोणत्या सदस्याचे किती शिक्षण झाले आहे? त्याबद्दलची माहिती घेऊ.
अंबानी कुटुंबातील कोणत्या सदस्याचे किती झाले आहे शिक्षण?
1- मुकेश अंबानी– हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जातात व मुकेश अंबानी यांचे शिक्षण पाहिले तर त्यांनी केमिकल इंजिनिअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले असून ते मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी या कॉलेजमधून पदवीधर आहेत. एवढेच नाही तर मुकेश अंबानी यांनी अमेरिकेतील स्कॅनफोर्ड युनिव्हर्सिटी मध्ये एमबीएचे शिक्षण पूर्ण करण्याकरिता गेले होते. परंतु वडील धीरूभाई अंबानी यांना व्यवसायामध्ये मदत व्हावी याकरिता त्यांनी एमबीएचे शिक्षण अर्धवट सोडले होते.
2- नीता अंबानी– नीता अंबानी या मुकेश अंबानी यांच्या पत्नी असून त्यांनी कॉमर्स मधून पदवी प्राप्त केलेली आहे. तसेच मुंबईतील नरसी मोंजी कॉलेज मधून त्यांनी संपूर्ण शिक्षण पूर्ण केले आहे.
3- आकाश अंबानी– आकाश अंबानी हे मुकेश अंबानी यांचे मोठे पुत्र असून त्यांनी अमेरिकेतील ब्राऊन युनिव्हर्सिटी मधून कॉमर्स फील्डमधून पदवी पूर्ण केली आहे व बिझनेस इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण देखील घेतल आहे.
4- अनंत अंबानी– अनंत अंबानी मुकेश अंबानी यांचे लहान सुपुत्र असून त्यांनी अमेरिकेतील ब्राऊन युनिव्हर्सिटी मधूनच इकॉनॉमिक्स मध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे.
5- ईशा अंबानी– ईशा अंबानी या मुकेश अंबानी यांच्या कन्या असून त्यांनी अमेरिकेतील येल युनिव्हर्सिटी मधून सायकॉलॉजीमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे.
6- अनिल अंबानी– अनिल अंबानी हे धीरूभाई अंबानी यांचे सुपुत्र असून त्यांनी देखील अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ पेनिसिल्वनिया मधून एमबीएची डिग्री घेतली आहे.
7- जयअनमोल अंबानी– हे अनिल अंबानी यांचे मोठे सुपुत्र असून त्यांनी युकेतील वार्विक बिझनेस स्कूलमधून बीएससी केले आहे.
8- जयअंशुल अंबानी– जय अंशुल हे अनिल अंबानी यांचे लहान सुपुत्र असून त्यांनी न्यूयॉर्कमधील युनिव्हर्सिटी मधून बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे.
अशा पद्धतीने आपल्याला दिसून येते की अंबानी कुटुंबातील जवळजवळ सर्व सदस्य हे उच्चशिक्षित आहेत.