Amol Kolhe News : सध्या संपूर्ण राज्यभर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले आहे. राजकीय नेत्यांनी आणि राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. यामुळे राजकीय नेते सध्या एकमेकांवर टीका करतांना दिसताय. पुणे जिल्ह्यातही लोकसभेच्या पार्श्वभूमीवर जोरदार प्रचार सुरू असल्याचे पाहायला मिळतय.
दरम्यान पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार अमोल कोल्हे यांनी देखील प्रचाराला सुरुवात केली आहे. अमोल कोल्हे यांनी आज शिरूर लोकसभा मतदारसंघातील भोसरी विधानसभा मतदारसंघात प्रचार केला आहे.
यावेळी त्यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि एकेकाळी ज्यांच्या सहवासात काम केलं ते राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा यांच्यावर निशाणा साधला आहे.
भोसरी मध्ये स्थानिक लोकांशी सुद्धा अमोल कोल्हे यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपले मत मांडले. त्यांनी जिल्ह्यातील पाणीटंचाईवर देखील मोठे भाष्य केले आहे.
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर लक्ष वेधले. तसेच जनतेच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या सरकारने पूर्ण करायला हव्यात असे म्हटले. दुष्काळावरून त्यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी पुणे जिल्ह्यात पाणीटंचाई आहे, मग आपले जिल्ह्याचे पालकमंत्री कुठं आहेत ? असा सवाल उपस्थित केला.
तसेच पुढे बोलताना कोल्हे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार नेहमीच विकासाच्या गोष्टी करतात, पण मात्र विकासाच्या मुद्द्यावर बैठका घेताना दिसत नाहीत, काही करताना दिसत नाही असं म्हणतं एकेकाळी सोबतीने काम करणाऱ्या आपल्या लाडक्या नेत्यावर (अजित पवार) जोरदार टीका केली आहे.
शिवाय, चारा छावणी, टँकर सुरु करणे या प्रमुख मागण्या अजित दादा त्यांच्या कार्यशैलीनुसार तातडीने पूर्ण करतील आणि दुष्काळावर पावले उचलतील अशी अपेक्षा देखील यावेळी कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.
बलिदान दिवशी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुढे नतमस्तक व्हावसं वाटलं नाही हे दुर्दैवी
कोल्हे यांनी त्यांच्या विरोधात उभे असलेले शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर टिका करतांना छत्रपती संभाजी महाराज यांच्या विकासा आराखडाच्या भूमिपूजनाच्या दिवशी महायुतीमधील जे कोणी नेते स्टेजवर मिरवत होते.
त्यांना आज इथ येऊन नतमस्तक व्हावं वाटलं नाही. हे त्यांच्या काळजात संभाजी महाराजांचे किती स्थान आहे, हे दाखवते. तसच मायबाप जनता हे सारे पाहत असल्याचे म्हटले आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या विकास आराखड्याच्या कार्यक्रमात छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासावर ते बोलत होते.
परंतु आज छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिवस आणि आज बलिदान दिवशी ते नतमस्तक होण्यासाठी आले नाहीत, त्यांना बलिदान दिवशी नतमस्तक व्हाव असं वाटत नाही हे दुर्दैवी असल्याचे म्हणतं शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावरही सडकून टीका केली आहे.