अर्रर्रर्र ! मोबाईल चोरी झाला ? घाबरू नका, बसल्या जागेवर सरकार करेल आपली मदत, जाणून घ्या सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Marathi News : सध्या स्मार्ट फोनचा जमाना आहे. आजकाल प्रत्येकाकडेच मोबाईल हा असतोच. मोबाईल शिवाय काम करणे मुश्किल होऊन जाते. अगदी सामान्य माणूस जरी असेल तरी मोबाईल फोन तो वापरतोच.

अगदी करमणुकीपासून तर ऑनलाईन कामापर्यंत मोबाईल गरजेचं झाला आहे. या फोनमध्ये आपले सर्व सिक्रेट देखील असतात. उदा. फोन पे किंवा इतर कार्ड्स नम्बर आदी. परंतु अडचण तेच येते जेव्हा आपला फोन हरवतो किंवा चोरी होतो.

फोन हरवल्यानंतर त्यातील कार्ड व इतर गोष्टींची व त्याच्या मिसयुज होण्याची भीती वाटू लागते. आपण ज्या स्विचवेशनमध्ये असतो तेथून लागेच पोलीस ठाण्यात कम्प्लेंट देणे किंवा नवीन सिम घेणे हे करता येत नाही. असा वेळी सजिबात घाबरू नका.

सरकार तुम्ही यावेळी मदत करेल. खरे तर सरकारने संचार साथी पोर्टल सुरू केले आहे. हे पोर्टल तुमचा फोन शोधण्यात मदत करेल. आणि जोपर्यंत तुम्हाला फोन सापडत नाही तोपर्यंत तुम्ही ते ब्लॉक करू शकता. फोन सापडल्यावर तो अनब्लॉकही करता येतो. चला तर मग याठिकाणी आपण याविषयी स्विसर माहिती पाहून घेऊयात –

* अशा पद्धतीने पोर्टल वापरून मोबाईल करा ब्लॉक

तुमचा फोन चोरीला गेला किंवा हरवला तर तुम्ही sancharsaathi.gov.in साईटवर जा. सिटिझन सेंट्रिक सर्व्हिसेसमध्ये जा. तेथेगेलात की तुम्हाला २ ऑप्शन दिसतील. पहिला आहे फोन हरवला असेल आणि दुसरा ऑप्शन असतो मोबाइल कनेक्शन जाणून घेणे.

येथे तुम्हाला पहिला पर्याय निवाडावा लागेल. यावर क्लिक करताच तीन ऑप्शन समोर येतील. पहिला असेल फोन ब्लॉक दुसरा असेल फोन अनब्लॉक व तीसरा असेल स्टेट्स तपासणी करणे. हरवलेला मोबाईल ब्लॉक करण्यासाठी पहिल्या पर्यायावर क्लिक करा, हरवलेला फोन नंबर,

डिव्हाइसचे नाव, मॉडेल नंबर, बिल, हरवलेली जागा, दिवस, वेळ ही सारी माहिती त्यात भरून घ्या. कॅप्चा भरा आणि आपला सध्याचा मोबाईल नंबर द्या. एक ओटीपी येईल. तो टाका व सबमिटवर क्लिक करा. अशा पद्धतीने तुमचा चोरी झालेला किंवा हरवलेला मोबाईल ब्लॉक होईल.

* पोलीस ठाण्यातही जाईल तक्रार

तुम्ही जर योग्य तपशील भरला तर अवघ्या काही तासात तुमचा नंबर ब्लॉक होईल. विशेष म्हणजे तुमची तक्रार जवळच्या पोलिस ठाण्यात नोंदवली जाईल. तुमचा फोन साडपल्यास तुम्ही पुन्हा या पोर्टलवर जाऊन तो अनब्लॉक करू शकता.