स्पेशल

84 लाख रुपये पॅकेज असलेली नोकरी सोडली आणि कपडे धुण्याचा व्यवसाय केला सुरु! आज हा व्यवसाय आहे 100 कोटीच्या घरात

Published by
Ajay Patil

काही व्यक्ती इतके अचाट आणि अचंबित करणारे काम करतात की काम पाहून आपल्याला विश्वास बसत नाही. आता लाखो रुपये पगाराची नोकरी जर कोणाला राहिली तर त्या नोकरीला लाथ मारून एखादा व्यवसाय करण्याचे कोणी ठरवले तर त्याला अजून देखील वेड्यांच्या गणतीत समाज काढत असतो.

कारण आरामशीर आयुष्य जगायचे सोडून काहीतरी जोखीम पत्करून काहीतरी वेगळे करणे म्हणजे पायावर धोंडा मारून घेण्यासारखे आहे असा समज हा बऱ्याच अंशी समाजामध्ये दिसून येतो. परंतु तरीदेखील काही व्यक्ती खूप मोठी रिस्क देतात व लाखो रुपये पगाराची नोकरी सोडून एखाद्या व्यवसायात पडतात व अफाट असे यश देखील मिळवतात.

त्यातल्या त्यात कपडे धुण्यासारखा व्यवसाय कोणी सात लाख रुपये पगाराची नोकरी सोडून जर सुरू केला तर त्याला तुम्ही काय म्हणाल? अगदी याच पद्धतीने बिहार मधील भागलपुर जिल्ह्यातील अरुणाभ सिन्हा या तरुण उद्योजकाने तब्बल 84 लाख रुपये पॅकेज असलेल्या नोकरीला रामराम ठोकला आणि पत्नी गुंजन यांच्यासोबत वाशिंग कंपनी सुरू केली व त्यांचा हा व्यवसाय आज कोटी रुपयांमध्ये पोहोचला आहे.

 अरुणाभ सिन्हा यांची यशोगाथा

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, बिहार राज्यातील भागलपूर जिल्ह्यातील अरुणाभ सिन्हा या तरुण उद्योजकाने लाखो रुपये पॅकेजेची नोकरीला लाथ मारली आणि पत्नी गुंजन सिन्हा यांच्यासोबत एक वाशिंग कंपनी सुरू केली व लाखात सुरू केलेली ही कंपनी आज शंभर कोटीच्या घरात पोहोचलेली आहे.

अरुणाभ याचे शिक्षण आयआयटी मधून झालेले असून नोकरी करत असताना त्याने अनेक कमी बजेट असलेल्या हॉटेल्सला भेटी दिल्या. यादरम्यान त्याच्या लक्षात आले की हॉटेलमध्ये किंवा इतर ठिकाणी कपडे धुण्याची सगळ्यात मोठी समस्या आहे व ही समस्या सुवर्णसंधी मानून त्याने लॉन्ड्री व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये त्याला त्यांची पत्नी गुंजन यांची मोलाची साथ लाभली.

साधारणपणे ऑगस्ट 2016 मध्ये त्यांनी नोकरी सोडली आणि जानेवारी 2017 मध्ये वीस लाख रुपये भांडवल टाकत युक्लीन नावाची लॉन्ड्री सेवा सुरू केली. जेव्हा अरुणाभ यांनी नोकरी सोडली तेव्हा त्याला 84 लाख रुपये वार्षिक पॅकेज होते. नोकरी सोडल्यानंतर त्याने फॅन ग्लोबल नावाची स्टार्टअप कंपनी सुरू केलेली होती व यामध्ये त्याला पूर्णपणे अपयश आले होते व त्यानंतर त्याने ट्रायबो नावाच्या हॉटेलमध्ये काम करायला सुरुवात केली होती.

त्यानंतर या कालावधीमध्ये अरुणाभ याला लॉन्ड्री व्यवसाय सुरू करण्याची कल्पना सुचली व त्यांनी नोकरी सोडून दिल्ली या ठिकाणी वसंत कुंज परिसरामध्ये पहिले स्टोर उभारले. एवढ्या मोठ्या पगाराची नोकरी सोडून असा व्यवसाय करणे हे कुणाच्याही घरच्यांना आवडणार नाही व अशाच पद्धतीने अरुणाभ याच्या परिवारातील लोकांना देखील हे काम आवडले नाही. परंतु कोण काय म्हणते याच्याकडे लक्ष न देता अरुणाभने पूर्ण लक्ष व्यवसायावर केंद्रित केले व 20 लाख रुपये गुंतवणुकीतून सुरू केलेला हा व्यवसाय आज शंभर कोटी रुपयांपर्यंत पोहोचवला.

Ajay Patil