स्पेशल

महाराष्ट्रातील 10 हजार तरुणांना जर्मनीमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी !

Published by
Ajay Patil

आपण समाजामध्ये असे अनेक तरुण तरुणी पाहतो की त्यांच्याकडे उच्च शिक्षण असते तसेच दर्जेदार कौशल्य देखील भरपूर प्रमाणामध्ये असते. अशा प्रकारचे उच्च शिक्षण व कौशल्य असलेल्या विद्यार्थ्यांचे नोकरीचे एक वेगळ्या प्रकारचे स्वप्न असते. परंतु आता नोकऱ्या खूप कमी असल्यामुळे कित्येक तरुणांचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही.

आपण असे अनेक तरुण पाहतो की, त्यांचे शिक्षण व कौशल्य यांच्या दृष्टिकोनातून त्यांना हव्या असलेल्या नोकऱ्या किंवा काम त्यांना मिळत नाही व नाईलाजाने त्यांना वेगळ्या ठिकाणी काम करावे लागते.

परदेशी शिक्षण आणि नोकरी…

परंतु आता अशा तरुणांसाठी महाराष्ट्र शासनाने एक चांगली संधी उपलब्ध करून दिली असून दर्जेदार कौशल्य आणि परदेशी शिक्षण आणि नोकरीचे स्वप्न पूर्ण करता येणे आता शक्य होणार आहे. कारण अशा तरुणांना आता थेट जर्मनीतील बाडेन वूटेनबर्ग राज्यामध्ये नोकरीची संधी मिळणार आहे.

 दहा हजार तरुणांना जर्मनीत नोकरीची सुवर्णसंधी

याबाबत सविस्तर वृत्त असे की, दर्जेदार कौशल्य असून परदेशी शिक्षण आणि नोकरीचे स्वप्न पूर्ण होऊ न शकणाऱ्या तरुणांसाठी आता महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून उत्तम संधी उपलब्ध करून दिली आहे व अशा तरुणांना आता थेट जर्मनीतील बाडेन वूटेनबर्ग राज्यामध्ये तब्बल 30 प्रकारच्या ट्रेडमध्ये नोकरीची संधी मिळणार असून याकरिता महाराष्ट्र शासन विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरवणार आहे.

76 कोटींच्या खर्चाची तरतूद

तसेच या नोकरीसाठी जर्मन भाषेचे प्रशिक्षण आवश्यक असून त्या प्रकारचे प्रशिक्षण देखील आता शासनाकडून दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण गोएसो संस्थेच्या माध्यमातून पुढील महिन्यापासून नाशिक सह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दिले जाणार आहे. विशेष म्हणजे याकरिता राज्य शासनाच्या माध्यमातून 76 कोटींच्या खर्चाची तरतूद देखील करण्यात आलेली आहे.

या अनुषंगाने  बाडेन वूटेनबर्ग आणि महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला असून या अंतर्गत राज्यातील विद्यार्थ्यांना जर्मन भाषेचे तसेच तेथील कार्य संस्कृतीचे ज्ञान देऊन वाहन चालक तसेच आरोग्य, प्रयोगशाळा, वैद्यकीय सहाय्यक, परिचारिका,इलेक्ट्रॉनिक्स आणि इंजीनियरिंग इत्यादी 30 क्षेत्रामध्ये मागणीप्रमाणे कुशल मनुष्यबळ पुरवण्यात येणार आहे.

तसेच एसआरटीमार्फत आता प्रत्येक जिल्ह्यातून यासंबंधीची माहिती देखील गोळा करण्यात येत आहे.या ट्रेड सोबतच लॅब असिस्टंट तसेच वैद्यकीय, नर्स आणि डेंटल असिस्टंट अशा ट्रेडचा देखील यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे.

 जर्मन भाषेच्या प्रशिक्षणासाठी प्रतिव्यक्ती होईल 33 हजाराचा खर्च

जर्मन भाषेचे प्रशिक्षण करिता प्रतिव्यक्ती 33 हजार रुपये असा एकूण खर्च होणार असून याकरिता 33 कोटींचा अंदाजित खर्च आहे. भाषेच्या प्रशिक्षण वर्गाकरिता 200 वर्ग खोल्यांची सुविधा निर्माण करण्यात येणार असून याकरिता

तीन कोटी रुपये व कौशल्य वृद्धीसाठी अतिरिक्त प्रशिक्षण ग्रामीण भाग प्रती व्यक्ती प्रति महिना सात हजार, शहरी भागात प्रति व्यक्ती प्रति महिना दहा हजार रुपये अशाप्रकारे अंदाजे चार महिन्याचा खर्च चाळीस कोटी प्रमाणे 76 कोटींची तरतूद यासाठी करण्यात आलेली आहे.

Ajay Patil