भारतीय परंपरांमध्ये अनेक गोष्टी अशा आहेत की त्यांना अनन्यसाधारण महत्व असते. काही विशिष्ट गोष्टींना भारतीय पद्धतीत व हिंदू धर्मामध्ये पूजनीय मानले जाते व यामध्ये सापाचा देखील समावेश होतो. सगळ्यात अगोदर साप म्हटले म्हणजे आपल्या मनात भीती निर्माण होते.
कारण सर्पदंश झाला की मृत्यू होतो हा साधारणपणे आपल्याकडे समज आहे. परंतु वस्तुस्थिती असे आहे की सगळेच साप हे विषारी नसून बहुसंख्य सापांच्या प्रजाती या बिनविषारी वर्गात मोडतात. तसेच भारतीय परंपरेमध्ये सापाच्या बाबतीत अनेक आख्यायिका व महत्त्व देखील आहे.
साप हा एक वैशिष्ट्यपूर्ण असा प्राणी असून त्यातील सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे साप वेळोवेळी स्वतःची त्वचा बदलत असतो व त्यालाच आपण कात म्हणतो. कात म्हणजे ही सापाची त्वचा असते व ती टाकल्यानंतर काही काळानंतर मृत होते. परंतु ज्योतिष शास्त्रानुसार या सापेच्या कातीला खूप महत्त्व असून ती व्यक्तीला श्रीमंत बनवू शकते असे ज्योतिष शास्त्र म्हणते.
ज्योतिष शास्त्रानुसार सापाच्या कातीला काय आहे महत्व?
ज्योतिषशास्त्रानुसार बघितले तर सापाची कात ही एक महत्त्वाची असून ती व्यक्तीला श्रीमंत बनवू शकते. सापाची कात खूप शक्तिशाली असल्याचे म्हटले जाते. म्हणजेच ज्या प्रकारे एकमुखी रुद्राक्ष तसेच दक्षिणावर्ती शंख यांना जितके महत्त्व आहे तितकेच महत्त्व आणि शक्ती सापेच्या कातीत आहे. ज्योतिष शास्त्रानुसार बघितले तर सापाची कात जर घरामध्ये ठेवली तर लक्ष्मीची कृपा होते व व्यक्तीला धन व संपत्तीची कमतरता भासत नाही. तसेच वाईट नजरांपासून देखील स्वतःला वाचवता येते.
सापाचे कात सापडले तर काय करावे?
तुम्हाला जर सापाची कात सापडली तर ती घरी आणा व घरामध्ये ठेवा व असे केल्याने तुमच्या घरात पैशांची व धनाची कधीच कमतरता भासणार नाही. बऱ्याच घरांमध्ये आपण बघितले असेल की सापाची कातीला फ्रेम करून ठेवले जाते. फक्त घरामध्ये सापाची कात ठेवताना एक गोष्ट लक्षात असू द्यावी की ती तुटलेली असू नये.
तसेच काही नकारात्मक शक्ती असतील तर त्या दूर होण्यासाठी देखील याचे खूप महत्त्व आहे. असं म्हटले जाते की जर एखाद्या अशुभ सावली घरावर पडले असेल तर सापाच्या कातीला बारीक वाटून घेऊन त्यामध्ये हिंग आणि कडुनिंबाची पाने मिसळून लोबानसह जर तिला जाळले व त्याचा धूर जर घरामध्ये पसरवला तर फायदा होतो व यामुळे नकारात्मक शक्ती दूर होतात.
( वरील माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे हा केवळ यामागे हेतू असून याविषयी आम्ही कुठल्याही प्रकारचा दावा किंवा समर्थन करत नाहीत.)