ATM Card News : तुमचेही कोणत्या ना कोणत्या बँकेत खाते असेल नाही का? मग आजची ही बातमी तुमच्यासाठी फारच खास ठरणार आहे. विशेषतः ही बातमी जे लोक एटीएम कार्ड वापरतात त्यांच्यासाठी खास राहणार आहे.
खरंतर अलीकडे पैशांचे व्यवहार हे फारच सुरळीत झाले आहेत. एटीएम कार्ड च्या वापरामुळे पैशांचे व्यवहार सहजतेने होऊ लागले आहेत. देशातील कोणत्याही कोपऱ्यात जाऊन एटीएम कार्ड च्या मदतीने पैसे काढता येतात.
बाहेर देशात जाऊन देखील एटीएम कार्ड वापरून पैसे काढले जाऊ शकतात हे विशेष. यामुळे आता पैशांच्या व्यवहारासाठी आधीच सारखी मेहनत घ्यावी लागत नाही.
पण एटीएम कार्ड चा फायदा फक्त एटीएम मधून पैसे काढणे एवढाच नाहीये. यापलीकडे देखील एटीएम कार्ड चे फायदे आहेत जे की आज आपण अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा बँकेकडून आपल्याला एटीएम कार्ड दिले जाते तेव्हा या एटीएम कार्ड सोबतच अपघात विमा आणि अकाली मृत्यू विमा सुद्धा उपलब्ध करून दिला जात असतो.
कदाचित तुम्हाला या गोष्टीची माहिती नसेल. खरेतर, माहितीअभावी एटीएम कार्डधारकाचा अपघात आणि अकाली मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना विम्याचा लाभ घेता येत नाही. हेच कारण आहे की आज आपण या संदर्भात माहिती पाहणार आहोत.
ग्राहकाच्या मृत्यूनंतर किती विमा रक्कम मिळते
जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे ATM कार्डच्या श्रेणीनुसार अपघात आणि अकाली मृत पावलेल्या व्यक्तीच्या परिवाराला विमा उपलब्ध करून दिला जात असतो.
नियमांनुसार, जो ग्राहक 45 दिवसांपासून कोणत्याही राष्ट्रीयकृत किंवा गैर-राष्ट्रीयीकृत बँकेचे एटीएम वापरत असेल त्याला एटीएम कार्डच्या श्रेणीनुसार विम्याची रक्कम दिली जात असते.
ज्या व्यक्तींकडे क्लासिक कार्ड आहे त्यांना एक लाख रुपये, प्लॅटिनम कार्डवर दोन लाख रुपये, ऑर्डिनरी मास्टरकार्डवर पन्नास हजार रुपये, प्लॅटिनम मास्टरकार्डवर पाच लाख रुपये, तसेच दीड ते दोन लाख रुपयांपर्यंत विमा मिळू शकतो.
तसेच ज्यांच्याकडे व्हिसा कार्ड आहे त्यांना 10 लाखापर्यंतचे विमा संरक्षण दिले जाते. त्याच रुपे कार्डवर एक ते दोन लाख रुपयांचा विमा देखील मिळतो.
अपघात झाल्यास किती रक्कम मिळते
तसेच एखाद्या ग्राहकाचा अपघात झाल्यास दोन्ही हात किंवा पायांना अपंगत्व आलेले असेल किंवा मृत्यू झाला तर कार्डानुसार त्या व्यक्तीला 1 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंतचा विमा दिला जात असतो.
कोणती कागदपत्रे लागतात?
एटीएम कार्ड धारकाचा अवेळी किंवा अपघाती मृत्यू झाला असेल किंवा अपंगत्व आलं असेल तर अशा प्रकरणात विम्याचा लाभ घेण्यासाठी एटीएम कार्ड धारकाच्या नॉमिनीला काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते.
यासाठी नॉमिनीला संबंधित बँकेच्या शाखेत एफआयआरची प्रत, उपचार प्रमाणपत्र, मृत्यु झालेला असल्यास मृत्यू प्रमाणपत्र, आश्रितांचे प्रमाणपत्र, मृत व्यक्तीच्या प्रमाणपत्राची मूळ प्रत इत्यादी कागदपत्र जमा करावी लागतील. बँकेत कागदपत्रे जमा झाल्यानंतर काही दिवसांनी मृत झालेल्या कुटुंबियांना विम्याची रक्कम मिळत असते.