स्पेशल

ऑडी इंडियाने ‘ए४ प्रीमियम’ लाँचची घोषणा केली

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- ऑडी या जर्मन लग्झरी कार उत्पादक कंपनीने आज यशत्पा वर्ष २०२१ ला साजरे करण्यासाठी ऑडी ए४ ची नवीन व्हेरिएण्ट ऑडी ए४ प्रीमियमच्या लाँचची घोषणा केली.

ऑडी ए४च्या पाचव्या जनरेशनमध्ये नवीन डिझाइन व शक्तिशाली २.० लिटर पेट्रोल इंजिन आहे, जे १४० केडब्ल्यू शक्ती (१९० अश्वशक्ती) आणि ३२० एनएम टॉर्कची निर्मिती करते. ऑडी ए४ प्रीमियम ही विद्यमान लाइन अपमधील नवीन भर आहे, ज्यामध्ये ए४ प्रीमियम प्लस व ए४ टेक्नोलॉजी व्हेरिएण्ट्सचा समावेश आहे. ऑडी ए४ प्रीमियमची किंमत ३९,९९,००० रूपये एक्स शोरूम आहे.

ऑडी इंडियाचे प्रमुख श्री. बलबीर सिंग धिल्लों म्हणाले, “ऑडी ए४ ला जानेवारीमध्ये लाँच केल्यापासून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ही कार ब्रॅण्डसाठी ऐतिहासिकदृष्ट्या सर्वोच्च विक्री करणारी ठरली आहे. आज आम्हाला २०२१ मधील आमच्या ब्रॅण्डच्या यशाला साजरे करण्यासाठी नवीन व्हेरिएण्ट ‘ऑडी ए४’ प्रीमियम सादर करण्याचा आनंद होत आहे.

हा आनंद साजरा करण्याचा क्षण आहे आणि आमच्या ग्राहकांना निवड करण्यासाठी तीन ट्रिम लेवल्स देत असल्यासारखा दुसरा आनंद कोणताच नाही. मला विश्वास आहे की, ही कार झपाट्याने विकसित होत असलेल्या ऑडी समूहामध्ये अधिक ग्राहकांची भर करेल.”

ऑडी ए४ प्रीमियम १४० केडब्ल्यू शक्ती (१९० अश्वशक्ती) आणि ३२० एनएम टॉर्क निर्माण करणारे २.० लिटर टीएफएसआय पेट्रोल इंजिनसह येते. ऑडी ए४ टीएफएसआय ७.३ सेकंदांमध्ये ० ते १०० किमी/तास गती प्राप्त करू शकते.

यात २५.६५ सेमी एमएमआय सेंट्रल टचस्क्रीनसह इन्फोटेन्मेंट सिस्टिममध्ये ऑडी साऊंड सिस्टिम, ऑडी स्मार्टफोन इंटरफेस, ऑडी फोनबॉक्स लाइटसह वायरेलस चार्जिंगचा समावेश करण्यात आला आहे. तसेच या कारमध्ये सिंगल झोन ऑटो एअर कंडिशनिंग, ६ एअरबॅग्‍ज व सिंगल कलर अॅम्बियण्ट लायटिंगची सुविधा देण्यात आली आहे.

ऑडी ए४ प्रीमियममधील वैशिष्ट्ये:

› एलईडी हेडलाइट्ससह सिग्नेचर डेटाइम रनिंग लाइट्स

› एलईडी रिअर कॉम्बीनेशन लाइट्स

› ग्लास सनरूफ

› ऑडी साऊंड सिस्टिम

› ऑडी स्मार्टफोन इंटरफेस

› ऑडी फोनबॉक्स लाइटसह वायरलेस चार्जिंग

› पार्किंग एड प्लस व रिअर व्ह्यू कॅमेरा

› ऑडी ड्राइव्ह सिलेक्ट

› सिंगल झोन डिलक्स ऑटोमॅटिक एअर कंडिशनिंग

› २५.६५ सेमी सेंट्रल एमएआय टचस्क्रिन

› ड्रायव्हर इन्फॉर्मेशन सिस्टिमसह कलर डिस्प्ले

› अॅम्बियण्ट लायटिंग – सिंगल कलर

› ६ एअरबॅग्ज › इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल फ्रण्ट सीट्स

› अॅल्युमिनिअम एलीप्सेमध्ये इनलेज

› इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल, ऑटो फोल्डिंग व हिटेड एक्स्टीरियर मिरर्ससह अॅण्टी-ग्लेअर

› लेदर/लेदरेट अपहोल्स्टरी

› फ्रण्ट सीट्ससाठी ४-वे लंबर सपोर्ट

› फ्रेमलेस इंटीरिअर मिरर्ससोबत ऑटोमॅटिक अॅण्टी-ग्लेअर अॅक्शन

› क्रूझ कंट्रोलसह स्पीड लिमिटर

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office