स्पेशल

राशींसाठी महत्त्वाचा असतो शुभ रंग आणि शुभ अंक! जाणून घ्या नवीन वर्षात तुमच्या राशीसाठी कोणता आहे शुभ रंग आणि शुभ अंक?

Published by
Ajay Patil

Lucky Colour and Number For Zodiac Signs:- ज्योतिष शास्त्रामध्ये व्यक्तीची जन्मतारीख तसेच जन्मवेळ व जन्मवार इत्यादी वरून भविष्य वर्तवण्यात येते व यामध्ये अनेक गोष्टींचा अभ्यास केला जातो. कुठल्याही व्यक्तीची एक राशी असते व या राशीनुसार संबंधित व्यक्तीचे भविष्य कसे राहील किंवा आयुष्यात त्याला कोणत्या प्रकारचे अडचणी येऊ शकतील इत्यादी बद्दल महत्वाची माहिती आपल्याला मिळत असते.

याशिवाय अनेक बारीक-सारीक गोष्टींचा देखील यामध्ये तपशीलवार विश्लेषण केल्याचे आपल्याला दिसून येते. या अनुषंगाने जर आपण या येणाऱ्या नवीन वर्षाच्या दृष्टिकोनातून बघितले तर नवीन वर्ष हे अनेक अर्थाने खूप महत्त्वाचे असते

व ज्योतिष शास्त्रामध्ये देखील येणाऱ्या कुठल्याही नवीन वर्षाच्या बाबतीत अनेक प्रकारचे भविष्य किंवा अंदाज वर्तवले जातात किंवा त्याबद्दल काही महत्त्वाची उपयोगी माहिती देखील दिली जाते.

अगदी याच पद्धतीने ज्योतिषशास्त्रानुसार बघितले तर कोणत्या राशीसाठी या येणाऱ्या नवीन वर्षात कोणता रंग आणि कोणता नंबर किंवा अंक शुभ असू शकतो? याची देखील माहिती दिलेल्या आपल्याला दिसून येते. कारण म्हटले जाते की रंगांचा आणि अंकांचा आयुष्यावर परिणाम होतो. त्यामुळे येणाऱ्या या नवीन वर्षात तुमच्या राशीसाठी कोणता रंग आणि अंक शुभ असेल? बद्दलची थोडक्यात माहिती बघू.

नवीन वर्ष 2025 मध्ये कोणत्या राशीसाठी कोणता रंग आणि अंक असेल शुभ?

1- मेष राशी- या राशीसाठी येणाऱ्या 2025 मध्ये जर बघितले तर लाल आणि सोनेरी रंग हा भाग्याचा असणार आहे तर सात आणि नऊ नंबर लकी असणार आहे.

2- वृषभ राशी- या राशी करिता 2025 मध्ये लकी नंबर हे सहा आणि नऊ असणार आहे तर शुभ रंग हा सिल्वर असणार आहे.

3- मिथुन राशी- या राशी करिता येणाऱ्या या नवीन वर्षामध्ये शुभ रंग हा निळा आणि पोपटी असणारा असून शुभ अंक हे पाच आणि सात असणार आहेत.

4- कर्क राशी- या राशी करिता येणाऱ्या 2025 या वर्षांमध्ये शुभ रंग लाल आणि शुभ अंक एक आणि दोन असणार आहेत.

5- सिंह राशी- येणाऱ्या या नवीन वर्षामध्ये या राशीकरिता शुभ रंग पिवळा आणि जांभळा असणार आहे तर शुभांक एक आणि सात असणार आहे.

6- कन्या राशी- या राशी करीता येणाऱ्या नवीन वर्षामध्ये शुभ रंग हिरवा आणि निळा तर शुभांक दोन आणि पाच असणार आहेत.

7- तूळ राशी- या राशी करता येणाऱ्या नवीन वर्षाचा शुभ रंग सिल्वर आणि तपकिरी असणार आहेत तर शुभांक पाच आणि सहा असणार आहे.

8- वृश्चिक राशी- येणाऱ्या नवीन वर्षात या राशी करिता शुभ रंग लाल आणि पांढरा आणि शुभांक सात आणि नऊ असणार आहे.

9- धनु राशी- येणाऱ्या नवीन वर्षात या राशीकरिता शुभ रंग सोनेरी आणि ऑरेंज तर शुभ अंक तीन, सात आणि नऊ असणार आहेत.

10- मकर राशी- या राशी करिता येणारे 2025 या वर्षात शुभ रंग राखाडी राहणार असून शुभ अंक पाच आणि आठ असणार आहेत.

11- कुंभ राशी- या राशीकरिता 2025 मध्ये शुभ रंग निळा आणि काळा व शुभांक पाच आणि आठ असणार आहे.

12- मीन राशी- या राशीकरिता येणाऱ्या 2025 या वर्षात शुभ रंग पिवळा आणि भगवा असणार असून शुभांक तीन, सहा आणि नऊ असणार आहेत.

Ajay Patil