स्पेशल

अरे वा! बजाज ‘या’ तारखेला लॉन्च करत आहे देशातील पहिली सीएनजी बाईक! वाचा या बाईकची किंमत आणि वैशिष्ट्ये

Published by
Ajay Patil

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती आणि पर्यावरणाचे रक्षण या दृष्टिकोनातून इलेक्ट्रिक आणि सीएनजी वाहनांचा वापर हा खूप महत्त्वाचा आहे. यामुळे आता ग्राहकांचा मोठ्या प्रमाणावर या प्रकारच्या वाहनांच्या वापराकडे किंवा खरेदीकडे कल असल्याचे आपल्याला दिसून येत असून अनेक वाहन उत्पादक कंपन्या विविध प्रकारचे इलेक्ट्रिक आणि सीएनजी मॉडेल्स देखील बाजारामध्ये लॉन्च करताना आपल्याला दिसून येत आहे.

दुचाकी उत्पादक कंपन्या असो की कार उत्पादक कंपन्या आपल्याला यामध्ये महत्त्वाचे पाऊल उचलताना दिसून येत आहेत. या अनुषंगाने जर आपण भारतातील प्रसिद्ध अशा दुचाकी उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या दृष्टिकोनातून बघितले तर बजाज मोटर्स ही महत्वाची कंपनी असून आजपर्यंत या कंपनीने अनेक वैशिष्ट्य असलेल्या दुचाकी बाजारामध्ये लॉन्च केलेले आहेत

व आता पुढचे पाऊल उचलत कंपनीच्या माध्यमातून देशातील पहिली सीएनजी बाईक लॉन्च केली जाणार आहे. या बाईकचे नाव काय असेल हे मात्र कंपनीच्या माध्यमातून अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

 बजाज लॉन्च करणार देशातील पहिली सीएनजी बाईक

देशातील प्रसिद्ध बाईक उत्पादक कंपनी बजाज मोटरच्या माध्यमातून देशातील पहिली सीएनजी बाईक लॉन्च करण्याचा निर्णय घेण्यात आला असून साधारणपणे 18 जून रोजी ही बाइक देशात लॉन्च होणार आहे. ही देशातील पहिली सीएनजी बाईक असणार असून सगळ्यांना या बाईकची उत्सुकता लागून राहिली आहे.

आपण या बाईकची किंमत पाहिली तर ती जवळपास 80 हजार रुपयांपासून सुरू होऊ शकते अशी माहिती समोर आलेली आहे. बजाज कंपनीच्या माध्यमातून या बाईकच्या संबंधित अजून कुठलीही माहिती शेअर करण्यात आलेली नाही.

 कशी असणार बजाजची पहिली सीएनजी बाईक?

देशातील प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी बजाज मोटर्सच्या माध्यमातून नवीन सीएनजी बाईक लॉन्च केली जाणार असून या बाईकचे नाव बजाज ब्रुझर किंवा बजाज फायटर असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे तसेच यामध्ये सीएनजी किट असेंबल करता येते.

या बाईकची इंजिन क्षमता ही साधारणपणे 110cc ते 125cc च्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. या बाईकचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जर प्रवास करताना जर या मधील सीएनजी संपला तर यामध्ये असलेली इंधन टाकीचा वापर करता येणार आहे. या बाईक मध्ये फ्रंट डिस्क आणि रियर ड्रम ब्रेक दिले जाण्याची शक्यता असून सध्या या बाईकची ग्राहकांच्या माध्यमातून आतुरतेने वाट पाहिली जात आहे.

Ajay Patil