Bank Account Opening Rule : भारतात अलीकडे बँकिंग व्यवहार वाढले आहेत. रोखीने व्यवहार करण्याऐवजी आता नागरिक डिजिटल व्यवहार करण्यावर अधिक भर देत आहेत. यामुळे नागरिकांचा वेळ वाचत असून डिजिटल कॅश फ्लो मुळे व्यवहार देखील पारदर्शक बनले आहेत.
आता आर्थिक व्यवहारासाठी बँक खाते आवश्यक आहे. बँक खात्यामुळे आर्थिक व्यवहार आणखीनच सुरळीत झाला आहे. आर्थिक व्यवहारा व्यतिरिक्त बँक खाते पैसे सेविंग करण्यासाठी देखील खोलले जाते. यामध्ये लोकांचे पैसे सुरक्षित असतात.
यामुळे अलीकडे अनेकांचे एकापेक्षा अधिक बँक खाती आहेत. व्यवहार जलद गतीने व्हावेत म्हणून लोक आता एकापेक्षा अधिक बँक खाते ओपन करत आहेत.
अशा परिस्थितीत आज आपण भारतात एका व्यक्तीचे किती बँक अकाउंट असू शकतात? यासाठी आरबीआय ने काही नियम तयार केले आहेत का? बँक खाते किती प्रकारचे आहेत? याबाबत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हे पण वाचा :- मोचा चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता, भारतीय हवामान विभागाचा गंभीर इशारा
आता आपण बँक खाती किती प्रकारची असतात याबाबत जाणून घेऊया. बँक खात्याचे विविध प्रकार पडतात. यामध्ये बचत खाते म्हणजेच सेविंग अकाउंट, चालू खाते म्हणजेच करंट अकाउंट, वेतन खाते म्हणजेच सॅलरी अकाउंट आणि संयुक्त खाते म्हणजेच जॉईंट अकाउंट यांचा समावेश होतो.
या वेगवेगळ्या बँक अकाउंटचा वेगवेगळा उपयोग देखील आहे. यामध्ये बचत खाते हे पैसे बचत करण्यासाठी सुरू केले जाते. सहसा सर्वसामान्य लोकांचे बचत खातेच असते. या खात्यात ठेवलेल्या रकमेवर बँकेकडून व्याज देखील दिले जाते.
याशिवाय ज्या लोकांचे व्यवहार अधिक असतात, अधिक रकमेचा व्यवहार करतात अशा लोकांचे करंट अकाउंट असते. प्रामुख्याने व्यापारी वर्गाचे करंट अकाउंट असते.
करंट अकाउंटमुळे अधिक पैशांची देवाणघेवाण करणे सोपे बनते. तसेच वेतन खाते म्हणजेच सॅलरी अकाउंट पगारदार व्यक्तींचे असते. संयुक्त खाते हे दोन लोकांचे जॉईंट खाते असते. प्रामुख्याने नवरा आणि बायको यांचे संयुक्त खाते उघडले जाते.
हे पण वाचा :- राज्यातील महिलांसाठी महत्वाची बातमी ; एसटीच्या हाफ तिकीटाबाबत एसटी महामंडळाने केले ‘हे’ महत्वाचे काम, आता….
किती बँक खाती असू शकतात?
भारतात एका व्यक्तीचे किती बँक खाते असू शकतात याबाबत कोणताही सरकारी नियम नाही. बँक खाते ओपन करण्यासाठी कोणतीच मर्यादा नाही. एक व्यक्ती कितीही बँक खाते ओपन करू शकतो. बँक खाते ओपन करणे हे सर्वस्वी संबंधित व्यक्तीच्या आर्थिक व्यवहारावर आधारित असते.
परंतु जाणकार लोकांनी तीन पेक्षा अधिक बचत खाते खोलू नये असं नमूद केले आहे. कारण की बचत खात्यांमध्ये शिल्लक रक्कम ठेवणे आवश्यक असते तसेच अधिक बचत खाते असली तर यांना हाताळणे कठीण होऊ शकते.
शिवाय जर बँक खात्यांमध्ये काही काळ व्यवहार झाला नाही तर अशी खाते निष्क्रिय म्हणजेच बंद देखील केली जातात. यामुळे लोकांनी आपल्या गरजेनुसार बँक खाते ओपन केली पाहिजेत. अधिक बँक खाते उघडणे योग्य नाही.
हे पण वाचा :- पुणे, मुंबईकरांसाठी खुशखबर ! ‘या’ मार्गामुळे Pune-Mumbai प्रवासातील अंतर 45 मिनिटांनी होणार कमी, केव्हा होणार सुरु? पहा….