कॅन्सल चेकचा वापर करून पैसे काढता येऊ शकतात का? ‘हा’ चेक कोण कोणत्या कारणांसाठी वापरला जातो ?

अनेकदा कर्ज घेताना, पॉलिसी खरेदी करताना, किंवा नवीन नोकरी मिळाल्यानंतर किंवा इतर कोणत्याही आर्थिक बाबींसाठी कॅन्सल चेक मागितला जातो. दरम्यान याच कॅन्सल चेक संदर्भात बँक ग्राहकांकडून काही प्रश्न उपस्थित केले जातात. जसे की कॅन्सल चेक चा वापर करून खात्यातून पैसे काढता येऊ शकतात का? हा मोठा सवाल ग्राहकांकडून उपस्थित होतो.

Tejas B Shelar
Published:
Bank Cheque Viral News

Bank Cheque Viral News : अलीकडे पैशांचा व्यवहार करण्यासाठी डिजिटल बँकिंगचा वापर होतोय. नेट बँकिंग आणि यूपीआय सारख्या प्लॅटफॉर्ममुळे आता पैशांचे व्यवहार सोपे झाले आहेत. डिजिटल बँकिंगमुळे आता रोखीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत. अलीकडे अगदी खेड्यापाड्यात सुद्धा यूपीआयचा वापर होतोय.

फोन पे, गुगल पे, पेटीएम सारख्या प्लॅटफॉर्ममुळे पैशांचे व्यवहार सोपे झाले आहेत. बाजारात आता भाजी जरी खरेदी करायची असेल तरीदेखील यूपीआयने पेमेंट केले जात आहे.

मात्र असे असले तरी आजही अनेक ठिकाणी पैशांचे व्यवहार करण्यासाठी चेकचा वापर होताना दिसतो. दरम्यान आज आपण चेकने व्यवहार करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत.

खरे तर अनेक कामांसाठी कॅन्सल चेक चा वापर होतो. अनेकदा कर्ज घेताना, पॉलिसी खरेदी करताना, किंवा नवीन नोकरी मिळाल्यानंतर किंवा इतर कोणत्याही आर्थिक बाबींसाठी कॅन्सल चेक मागितला जातो.

दरम्यान याच कॅन्सल चेक संदर्भात बँक ग्राहकांकडून काही प्रश्न उपस्थित केले जातात. जसे की कॅन्सल चेक चा वापर करून खात्यातून पैसे काढता येऊ शकतात का? हा मोठा सवाल ग्राहकांकडून उपस्थित होतो.

दरम्यान आज आपण कॅन्सल चेकचा नेमका वापर कशासाठी होतो आणि याचा वापर करून पैसे काढता येऊ शकतात का? याच बाबत सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कॅन्सल चेकचा वापर करून पैसे काढता येतात का?

अनेकजण कॅन्सल चेक मागितल्याबरोबर विचारात पडत असतात. या चेकचा काही मिसयुज तर होणार नाही ना? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की कॅन्सल चेकचा मिस युज होऊ शकत नाही. या चेकचा वापर करून पैसे काढता येणे अशक्य आहे. कोणतीचं बँक कॅन्सल चेक स्वीकारून पैसे देत नाही.

पैशांसाठी नाही मग कॅन्सल चेकचा वापर कशासाठी होतो?

गृह कर्ज वैयक्तिक कर्ज किंवा वाहन कर्ज घेताना बँका ग्राहकांकडून कॅन्सल चेक मागवतात. विमा पॉलिसी खरेदी करताना देखील हा चेक मागितला जातो. याशिवाय इतरही अन्य कामांमध्ये या चेकचा वापर होतो. पण या चेकचा वापर हा पैसे काढण्यासाठी होत नाही.

जाणकार लोक सांगतात की कॅन्सल चेक मध्ये खातेदाराचे नाव, बँकेच्या शाखेचे नाव आणि पत्ता, खाते क्रमांक आणि बँकेचा IFSC कोड असतो. ही माहिती बँक खाते धारकाची पडताळणी करण्यासाठी आवश्यक असते. हेच कारण आहे की वित्तीय कामांमध्ये कॅन्सल चेक मागितला जातो.

एकंदरीत माहितीची पडताळणी करण्यासाठी कॅन्सल चेक मागितला जातो यामुळे याचा गैरवापर होणे अशक्य आहे. कॅन्सल चेक तयार करताना तुमच्या चेक बुक मधून एक चेक काढा त्यावर दोन समांतर रेषा ओढा आणि त्यामध्ये कॅन्सल (Cancelled) असे लिहा. त्यामुळे तुमचा चेक रद्द होतो आणि या चेकला कॅन्सल चेक म्हणून ओळखले जाते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe