स्पेशल

बँकेची FD योजना गुंतवणूकदारांसाठी ठरणार फायदेशीर! देशातील सर्व प्रमुख बँकांचे एफडीचे व्याजदर पहा….

Published by
Tejas B Shelar

Bank FD Scheme : आपल्यापैकी अनेकांनी बँकेच्या एफडी योजनेमध्ये गुंतवणूक केली असेल. काहीजण आगामी काळात एफडी योजनेत पैसा गुंतवण्याच्या तयारीत असतील. जर तुम्हीही असाच प्लॅन बनवत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे.

खरे तर अलीकडील काही वर्षांमध्ये बँकांनी फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला परतावा दिला आहे. बँकांच्या माध्यमातून काही विशेष योग्य योजना देखील चालवल्या जात आहेत ज्यातून ग्राहकांना सामान्य एफडी योजनांच्या तुलनेत अधिकचा परतावा मिळतोय.

देशातील काही बँकांच्या माध्यमातून 400 दिवस, 444 दिवस, 366 दिवस, 1111 दिवस, 555 दिवस अशा विशेष FD योजना सुरु करण्यात आल्या आहेत. दरम्यान आज आपण देशातील काही प्रमुख बँकांचे एफडी चे व्याजदर जाणून घेणार आहोत.

‘या’ बँका देतात एफडीवर सर्वाधिक व्याजदर

Yes बँक : प्रायव्हेट सेक्टर मधील ही बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी FD वर सर्वाधिक व्याजदर देते. येस बँक 18 ते 24 महिने कालावधीच्या एफडीवर सर्वाधिक व्याज देते. कालावधीच्या एफडीवर बँकेकडून 7.75 टक्के दराने परतावा दिला जातोय. या कालावधीच्या FD वर सर्वाधिक व्याज देणारी बँक म्हणून येस बँकेला ओळखले जाते.

आयसीआयसीआय बँक : आयसीआयसीआय बँक ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक. ही प्रायव्हेट सेक्टर मधील बँक असून या बँकेकडून आपल्या ग्राहकांना एफ डी वर चांगला परतावा दिला जातोय. पंधरा महिने ते दोन वर्ष कालावधीच्या एफडीवर या बँकेकडून 7.75 टक्के दराने परतावा दिला जातोय.

बँक ऑफ महाराष्ट्र : ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील एक प्रमुख बँक आणि या बँकेकडून आपल्या ग्राहकांसाठी 366 दिवसांचा एफडीवर 7.45 टक्के दराने परतावा दिला जातोय. तसेच एका वर्षासाठी 6.75%, तीन वर्षांसाठी 6.50%, अन पाच वर्षांसाठी 6.50% दराने व्याज दिले जात आहे.

इंडियन बँक : इंडियन बँक देखील आपल्या ग्राहकांना इंडियन सुपर या चारशे दिवसांच्या विशेष एफडी योजनेच्या माध्यमातून ग्राहकांना कमाल 7.30% दराने परतावा देते. तसेच ही बँक एका वर्षाच्या FD वर 6.10%, तीन वर्षांच्या एफडीवर 6.25% आणि पाच वर्षांच्या एफडीवर 6.25% दराने परतावा दिला जात आहे.

कॅनरा बँक : ही बँक 3 ते 5 वर्ष कालावधीच्या एफडीवर कमाल 7.40% दराने परतावा देते. तसेच एका वर्षाच्या FD वर 6.85%, तीन वर्षांच्या FD वर 7.40% आणि 5 वर्षांच्या FD वर 6.70% दराने परतावा दिला जातोय.

बँक ऑफ इंडिया : ही बँक आपल्या ग्राहकांना 400 दिवसांच्या FD वर कमाल 7.30% दराने परतावा देत आहे. तसेच एका वर्षाच्या FD वर बँकेकडून 6.80%, तीन वर्षाच्या FD वर 6.50% आणि 5 वर्षांच्या FD वर 6% दराने परतावा दिला जातोय.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar