स्पेशल

बँक ऑफ बडोदाची 90 दिवसांची एफडी योजना गुंतवणूकदारांसाठी ठरणार फायदेशीर! 4 लाख गुंतवले तर किती रिटर्न मिळणार ?

Published by
Tejas B Shelar

Bank Of Baroda FD Scheme : अलीकडे फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. फिक्स डिपॉझिट अर्थातच मुदत ठेव योजनेत पैसे गुंतवून अनेकजण चांगला परतावा मिळवत आहेत. यामध्ये महिला आणि जेष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवत आहेत.

अलीकडे छोट्या छोट्या फायनान्स कंपन्यांनी तसेच राष्ट्रीय बँकांनी फिक्स डिपॉझिट वरील व्याज दरात मोठी वाढ केलेली आहे. म्हणून याचा गुंतवणूकदारांना फायदा होतोय.

बँक ऑफ बडोदा या सरकारी बँकेत देखील मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते. दरम्यान आज आपण बँक ऑफ बडोदा च्या FD योजनेची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

बँक ऑफ बडोदा च्या 90 दिवसांच्या एफडी योजनेबाबत आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. बँक ऑफ बडोदा आपला ग्राहकांसाठी सात दिवसांपासून ते दहा वर्ष कालावधीची एफडी ऑफर करते.

अल्पकालावधीच्या एफडी साठी देखील बँक ऑफ बडोदा कडून चांगले व्याज दिले जाते. त्यामुळे ज्यांना कमी दिवसात चांगला परतावा मिळवायचा असेल त्यांच्यासाठी बँक ऑफ बडोदाची एफडी योजना फायदेशीर ठरणार आहे.

कशी आहे BOB ची 90 दिवसांची एफडी योजना ?

बँक ऑफ बडोदा सात दिवसांपासून ते दहा वर्षे कालावधीची एफडी ऑफर करते आणि यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 4.25 टक्क्यांपासून ते 7.30 % दराने व्याज दिले जाते.

बी ओ बी 90 दिवसांच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या सामान्य ग्राहकांना 5.50% दराने आणि ज्येष्ठ नागरिकांना 6% दराने व्याज देते. म्हणजे सामान्य ग्राहकांच्या तुलनेत जेष्ठ नागरिकांना अधिकचा परतावा मिळतो.

चार लाखाची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार?

९० दिवसांच्या एफडी योजनेत एखाद्या सामान्य ग्राहकाने चार लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला मॅच्युरिटी वर म्हणजेच 90 दिवसांचा काळ पूर्ण झाल्यानंतर चार लाख पाच हजार 424 रुपये रिटर्न मिळणार आहेत.

म्हणजेच 90 दिवसात 5424 रुपयांचा फायदा होणार आहे. जर समजा सीनियर सिटीजन ग्राहकाने 90 दिवसांच्या एफडी मध्ये चार लाख रुपये गुंतवले तर त्यांना चार लाख पाच हजार 917 रुपये मिळणार आहेत.

म्हणजे 5917 रुपये व्याज म्हणून रिटर्न मिळणार आहेत. अर्थातच सामान्य ग्राहकांपेक्षा ज्येष्ठ नागरिक ग्राहकांसाठी बँक ऑफ बडोदा ची 90 दिवसांची एफ डी योजना फायदेशीर ठरते.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com