Bank Of Baroda FD Scheme : एफडी अर्थातच फिक्स डिपॉझिट हा गुंतवणुकीचा सर्वात अधिक लोकप्रिय आणि सुरक्षित प्रकार म्हणून ओळखला जातो. यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या फारच अधिक आहे.
महिला वर्ग आणि ज्येष्ठ नागरिक यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवतात. दरम्यान जर तुमचाही आगामी काळात एफडी करण्याचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे.
विशेषता ज्यांना बँक ऑफ बडोदा मध्ये एफडी करायचे असेल त्यांनी बँकेची पायरी चढण्या आधी आजची बातमी पूर्ण वाचायला हवी. कारण की, आज आपण बँक ऑफ बडोदाच्या
अशा एका एफडी योजनेबाबत माहिती पाहणार आहोत ज्यामध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना फक्त व्याजेच्या रकमेतून तीन लाखाहून अधिकचा आर्थिक लाभ मिळणार आहे.
कोणती आहे ती FD योजना
बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांसाठी सात दिवसांपासून ते दहा वर्ष कालावधीची एफडी ऑफर करते. यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना बॅंकेकडून चांगला परतावा दिला जातो.
बँक ऑफ बडोदा पाच वर्षांपेक्षा अधिक आणि दहा वर्ष कालावधीपर्यंतच्या एफडी मध्ये गुंतवणूक होणाऱ्या सामान्य ग्राहकांना 6.50% दराने परतावा देत आहे. तसेच या कालावधीच्या एफ डी मध्ये गुंतवणूक करणाऱ्या सीनियर सिटीजन ग्राहकांना 7.50 टक्के दराने परतावा दिला जात आहे.
कसे मिळणार तीन लाख 37 हजार रुपयांचे व्याज
जर बँक ऑफ बडोदाच्या सहा वर्ष कालावधीच्या एफडी योजनेत सामान्य ग्राहकाने सहा लाख रुपयांची गुंतवणूक केली तर मॅच्युरिटी वर म्हणजेच सहा वर्ष कालावधी पूर्ण झाल्यानंतर आठ लाख 83 हजार 415 रुपये मिळणार आहेत.
अर्थातच दोन लाख 83 हजार 415 रुपये फक्त व्याज म्हणून मिळणार आहे. जर समजा याच कालावधीच्या एफ डी मध्ये सीनियर सिटीजन ग्राहकांनी सहा लाख रुपये गुंतवले तर मॅच्युरिटी वर नऊ लाख 37 हजार 75 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच व्याज म्हणून तीन लाख 37 हजार 75 रुपये मिळणार आहेत.