एफडीमध्ये गुंतवणूक केल्यास मिळतात ‘हे’ 4 फायदे ! अनेकांना याची माहितीच नाही, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Banking FD News : अलीकडे प्रत्येकालाच आपल्याकडील पैसा मोठा करायचा आहे. यामुळे अनेक जण गुंतवणुकीला प्राधान्य देत आहेत. गुंतवणुकीसाठी आपल्या भारतात वेगवेगळे विकल्प उपलब्ध आहेत. यामध्ये सुरक्षित गुंतवणुकीसाठी एफडीचा पर्याय हा सर्वात फायदेशीर पर्याय ठरत आहे.

अनेकजण एफडी करण्याला विशेष महत्त्व दाखवत आहेत. एफडी अर्थातच फिक्स डिपॉझिट ही सुरक्षित गुंतवणुकीची योजना आहे. खरंतर एफडी केल्यास गुंतवणूकदारांना एक निश्चित परतावा मिळतो.

यातून गुंतवणूकदारांना गॅरंटेड रिटर्न मिळतात. याशिवाय एफडी करण्याचे अनेक फायदे आहेत. दरम्यान आज आपण एफडी करण्याचे चार सर्वोत्कृष्ट फायदे थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

एफडीवर कर्ज सुद्धा मिळते : एफडीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे बँकेच्या FD वर गुंतवणूकदारांना कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. अर्थातच जर तुम्ही एका ठराविक कालावधीसाठी योग्य केली आणि एफडी परिपक्व होण्याआधीच तुम्हाला पैशांची गरज भासली तर तुम्ही एफडी ब्रेक करण्याऐवजी त्यावर कर्ज घेऊ शकता. मात्र एफडीवर कर्ज देताना बँकेकडून एफडीसाठी दिल्या जाणाऱ्या व्याजदरापेक्षा अधिकचे व्याज आकारले जाते.

एफडीवर विमा संरक्षण मिळते : जर तुम्ही बँकेत एफडी केली असेल, तर तुम्हाला त्यावर ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) चे विमा संरक्षण मिळते. म्हणजे जर तुमची बँक डिफॉल्ट झाली किंवा दिवाळखोर झाली, तर तुम्हाला या विमा संरक्षण अंतर्गत रु. 5 लाख मिळतील, ज्यामध्ये मुद्दल आणि व्याज दोन्ही समाविष्ट असेल.

याचा अर्थ, जर तुम्ही एफडी मध्ये गुंतवलेली रक्कम आणि त्यावरील व्याज पाच लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल तर तुमची बँक बुडाली तरीही तुम्हाला संपूर्ण रक्कम रिटर्न मिळणार आहे.

मोफत जीवन विम्याचा लाभ : अशा अनेक बँका आहेत, ज्या की एफडी करणाऱ्यांना मोफत जीवन विम्याचा अतिरिक्त लाभ देत आहेत. अधिकाधिक लोकांना FD साठी आकर्षित करण्यासाठी बँकेकडून अशा विशिष्ट ऑफर चालवल्या जात आहेत.

या अंतर्गत बँका त्यांच्या ग्राहकांना मुदत ठेव रकमेइतकाच जीवन विमा देतात. मात्र, यामध्येही वयोमर्यादा आहे. पाहिले तर, बँका त्यांच्या जोखमीची गणना करतात आणि त्यांच्या ग्राहकांना जीवन विमा देतात, हा एक फायदेशीर करार आहे.

कर बचतीचा लाभ मिळतो : जर तुम्ही 5 वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीच्या मुदत ठेव योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला कर बचतीचा लाभ मिळू शकतो. तुम्ही आयकर कायदा 1961 च्या कलम 80C अंतर्गत पाच वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधीच्या मुदत ठेव योजनेत गुंतवणूक केल्यास कर सूट मागू शकता.

या अंतर्गत तुम्हाला एका वर्षात 1.5 लाख रुपयांपर्यंत कर सूट मिळू शकते. तथापि, जर तुम्ही 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी एफडी केली तर तुम्हाला कर भरावा लागणार आहे. पण, बँकांकडून वर्षभरात मिळणारे व्याज ४० हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यावरही कर आकारला जातो.