Banking FD News : भारतात गुंतवणुकीसाठी गेल्या काही वर्षांमध्ये अनेक ऑप्शन्स उपलब्ध झाले आहेत. एलआयसी आणि पोस्ट ऑफिसच्या बचत योजना, बँकेची एफडी योजना अशा सुरक्षित बचत योजना अन शेअर मार्केट आणि शेअर मार्केट वर आधारित म्युच्युअल फंड सारख्या योजनांमध्ये देखील गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली आहे.
शेअर मार्केट व त्यावर आधारित म्युच्युअल फंड मधून ग्राहकांना नक्कीच इतर सुरक्षित बचत योजनांपेक्षा अधिकचा परतावा मिळतोय. मात्र या ठिकाणी गेलेली गुंतवणूक ही रिस्की आहे.
यामुळे सुरक्षित गुंतवणुकीसाठी आजही पोस्ट ऑफिस तसेच एलआयसीच्या बचत योजना आणि बँकेच्या एफडी योजनांना अधिक प्राधान्य दाखवले जात आहे.
दरम्यान आज आपण अशा एका बँकेच्या एफडी योजनेबाबत जाणून घेणार आहोत ज्यामध्ये गुंतवणूक केल्यास ग्राहकांना चांगला परतावा मिळणार आहे. आज आपण कॅनडा बँकेच्या एफडी योजनेची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
कॅनडा बँकेची 12 महिन्यांची एफडी योजना
सार्वजनिक क्षेत्रातील कॅनडा बँक ही देशातील एक प्रमुख सरकारी बँक आहे. ही बँक आपल्या ग्राहकांसाठी सात दिवसांपासून ते दहा वर्षे कालावधीपर्यंतची एफडी योजना ऑफर करते. या बँकेकडून आपल्या ग्राहकांना एफडीवर चार टक्क्यांपासून ते 7.25% दराने व्याज दिले जात आहे.
कॅनडा बँक बारा महिने अर्थातच 365 दिवसांच्या एफडीवर सामान्य ग्राहकांना 6.85% दराने व्याज देते तसेच याच कालावधीच्या म्हणजेच एक वर्षाच्या एफडीत गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 7.35% या दराने व्याज देत आहे.
12 महिन्यांच्या एफडी मध्ये 4 लाखांची गुंतवणूक केली तर किती रिटर्न मिळणार ?
कॅनडा बँकेच्या 12 महिन्यांच्या एफडी मध्ये जर सामान्य ग्राहकांनी 4 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना मॅच्युरिटीवर अर्थातच 365 दिवसांचा काळ पूर्ण झाल्यानंतर चार लाख 28,112 मिळणार आहेत. म्हणजेच 12 महिन्यात 28 हजार 112 रुपये व्याज म्हणून एक्स्ट्रा मिळणार आहेत.
तसेच जर ज्येष्ठ नागरिक ग्राहकांनी या कालावधीच्या एफडी योजनेत चार लाख रुपये गुंतवलेत तर त्यांना चार लाख 29 हजार 798 रुपये मिळणार आहेत अर्थातच या कालावधीच्या एफडी योजनेत जेष्ठ नागरिकांना 29 हजार 798 रुपये एक्स्ट्रा मिळणार आहेत.