‘हा’ सरकारी बँकेचा स्टॉक गुंतवणूकदारांना देणार जबरदस्त रिटर्न ! टार्गेट प्राईस आताच नोट करा

आरबीआय ने हा निर्णय घेतल्यानंतर शेअर बाजारात तेजी येणार असा विश्वास होता. यामुळे गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात उत्साही सुद्धा होते. मात्र आरबीआयच्या या निर्णयानंतर देखील शेअर बाजारात तेजी दिसली नाही याउलट काल शेअर बाजार घसरला. काल बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेंसेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी मध्ये घसरण पाहायला मिळाली.

Published on -

Banking Stock : काल सात फेब्रुवारी 2024 रोजी आरबीआय ने मोठा निर्णय घेतला आणि रेपो रेटमध्ये 0.25% इतकी कपात करण्यात आली. आता RBI चे रेपो रेट 6.50 टक्क्यांवरून 6.25% पर्यंत खाली आले आहेत. यामुळे आता सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे आणि गृह कर्जासहित सर्व प्रकारचे कर्ज स्वस्त होणार आहे. मात्र खरे तर आरबीआय ने हा निर्णय घेतल्यानंतर शेअर बाजारात तेजी येणार असा विश्वास होता.

यामुळे गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात उत्साही सुद्धा होते. मात्र आरबीआयच्या या निर्णयानंतर देखील शेअर बाजारात तेजी दिसली नाही याउलट काल शेअर बाजार घसरला. काल बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेंसेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी मध्ये घसरण पाहायला मिळाली.

महत्त्वाचे म्हणजे काल बँकिंग सेक्टर मधील स्टॉक देखील घसरलेत आणि यामुळे गुंतवणूकदारांकडून विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पण अशा या परिस्थितीत, शेअर बाजाराच्या बदलत्या सेंटीमेंटमध्ये एका सरकारी बँकेचे शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा देणार असा अंदाज स्टॉक मार्केट विश्लेषकांकडून व्यक्त होतोय.

हा स्टॉक आहे देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेचा म्हणजेचं एसबीआयचा. खरंतर एसबीआयचे डिसेंबर तिमाहीचे निकाल अलीकडेच प्रसिद्ध झाले आहेत अन या तिमाहीत बँकेची कामगिरी ही मिळती-जुळती आहे.

पण क्यू 3 निकालानंतर, ब्रोकरेजकडून या स्टॉक साठी एक नवीन टारगेट प्राईज निश्चित करण्यात आली आहे. काल, शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2025 रोजी एसबीआयच्या शेअर 2.55% घटून 733 च्या रेंजमध्ये ट्रेड करत होते.

SBI ची शेअर बाजारातील कामगिरी !

देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेचा स्टॉक गेले काही दिवस दबावात दिसला आहे. गेल्या एका महिन्यात हा स्टॉक सुमारे 5% पर्यंत खाली आला आहे. तसेच तीन महिन्यांत हा स्टॉक 13% पेक्षा जास्त घसरला आहे. मात्र गेल्या एका वर्षाच्या काळात हा स्टॉक 10% ने वर सरकला आहे. त्याची 52 आठवड्यांची उच्च पातळी 912 रुपये आहे आणि 52 आठवड्यांची निम्न पातळी 678 रुपये इतकी आहे.

SBI शेअर्ससाठी नवीन टार्गेट प्राईस

आयआयएफएल कॅपिटल या ब्रोकरेजने एसबीआय वर विश्वास दाखवत यासाठी बाय रेटिंग दिलेली आहे म्हणजेच हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज कडून या स्टॉक साठी 870 रुपये एवढी टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आले आहे. म्हणजे हा स्टॉक गुंतवणूकदारांना 18% रिटर्न देणार असे म्हटले जात आहे.

मोतीलाल ओसवालने सुद्धा या स्टॉक साठी आपली आधीची बाय रेटिंग कायम ठेवली आहे. यासाठी ब्रोकरेज कडून 925 रुपये एवढी नवीन टार्गेट प्राईज निश्चित करण्यात आली आहे. म्हणजे सध्याच्या पातळीपेक्षा आणखी 25 टक्क्यांनी यात वाढ होण्याची शक्यता आहे.

ब्रोकरेज फर्म नुवामाने या शासकीय बँकेचे शेअर्स पोर्टफोलिओमध्ये ठेवण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी 1,026 रुपयांची टार्गेट प्राईज सुद्धा निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच हा स्टॉक गुंतवणूकदारांना 36 टक्क्यांपर्यंत रिटर्न देऊ शकतो असा अंदाज आहे.

HDFC इंस्टीट्यूशनल इक्विटीज ब्रोकरेजने सुद्धा या स्टॉक साठी बाय रेटिंग दिलेली आहे. यासाठी या ब्रोकरेज कडून १०५० रुपयांचे नवीन टारगेट प्राईज निश्चित करण्यात आले आहे. म्हणजेच एसबीआयचे स्टॉक 40 टक्क्यांपर्यंतचे रिटर्न देऊ शकतात असे ब्रोकरेजचे म्हणणे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe