स्पेशल

राज्य शासन ‘या’ उमेदवारांना देणार एमपीएससी, यूपीएससी आणि पोलीस भरतीसाठी मोफत प्रशिक्षण; या तारखेपर्यंत करा अर्ज

Published by
Ajay Patil

महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी अनेक लाभाच्या योजना राबवल्या जात असून या योजनांच्या माध्यमातून व्यवसाय उभारणी तसेच शिक्षणाच्यासाठी आर्थिक मदत करण्याच्या दृष्टिकोनातून या योजनांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. जर आपण स्पर्धा परीक्षांच्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने बघितले तर राज्यातील अनेक तरुण तरुणी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात व याकरिता पुणे किंवा मुंबईसारख्या शहरांमध्ये महागड्या कोचिंग क्लासेसला ऍडमिशन घेऊन अशा ठिकाणी अभ्यास करतात.

परंतु ही बाब महागडी असून ती प्रत्येकाला शक्य होते असे नाही. या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच बार्टीने अनुसूचित जाती प्रवर्गातील जे उमेदवार एमपीएससी तसेच यूपीएससी व पोलीस भरती याची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी एक उत्तम संधी निर्माण केली असून या माध्यमातून बार्टी या प्रवर्गातील उमेदवारांना मोफत प्रशिक्षण देणार आहे. त्यामुळे निश्चितच या उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

 बार्टी देणार एमपीएससी, यूपीएससी आणि पोलीस भरतीसाठी मोफत प्रशिक्षण

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून बार्टी या संस्थेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या अनुसूचित जातीतील उमेदवारांसाठी एक उत्तम संधी निर्माण करून देण्यात आलेली आहे व या माध्यमातून आता एमपीएससी, यूपीएससी आणि पोलीस भरती याकरिता मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामध्ये संघ लोकसेवा आयोग( नागरी सेवा),

महाराष्ट्र लोकसेवा आयोग( राज्यसेवा तसेच न्यायिक व अभियांत्रिकी सेवा), पोलीस व मिलिटरी भरतीपूर्व प्रशिक्षण, बँक, रेल्वे, एलआयसी व इतर स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असलेले पूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे व याकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 30 ऑक्टोबर 2023 च्या शासन निर्णयानुसार बघितले तर हे सर्वंकष धोरण निश्चित करण्यात आले आहे व त्या अनुषंगाने पुणे येथील बार्टीच्या माध्यमातून सन 2024-25 करिता वर उल्लेख केलेल्या सर्व परीक्षांच्या पूर्व परीक्षेसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

 या तारखेपर्यंत करता येईल अर्ज

बार्टीच्या माध्यमातून राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी स्पर्धा परीक्षा तसेच पोलीस भरती याकरिता जे काही मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे त्यासाठी बार्टीच्या माध्यमातून अर्ज मागविण्यात आले असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 3 जुलै 2024 पर्यंत असणार आहे.

याकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे कुठली पात्रता असणे गरजेचे आहे?

1- याकरिता अर्ज करणारा उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

2- संबंधित उमेदवाराकडे राज्याचा अनुसूचित जातीचा दाखला व वय अधिवास असणे गरजेचे आहे.

3- उमेदवाराचे वय हे संबंधित परीक्षांच्या अटी व शर्तीनुसार असणे गरजेचे आहे.

4- उमेदवाराचे कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न आठ लाखापर्यंत असणे गरजेचे आहे व अशा उमेदवारांनाच अर्ज करता येणार आहे.

5- एखाद्या उमेदवाराला जर अनाथ आरक्षणाचा फायदा घ्यायचा असेल तर अशा उमेदवाराकडे महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून देण्यात आलेले प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.

6- जर उमेदवार दिव्यांग असेल तर 40% पेक्षा जास्त दिव्यंगत्व असल्याचे प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत सादर करणे गरजेचे आहे.

 या प्रशिक्षणासाठी आरक्षण कशा पद्धतीचे आहे?

त्यामध्ये महिलांसाठी 30% तर दिव्यांगांसाठी पाच टक्के आरक्षण असणार आहे व वंचितांकरिता 5% आरक्षण असेल व यामध्ये मुख्यत्वे वाल्मिकी व तत्सम जाती जसे की लोहार, मातंग, बेरड तसेच मागदी इत्यादी करिता) देखील आरक्षण असणार आहे.

 उमेदवारांची निवड कशी केली जाईल?

बार्टीच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या या पूर्व प्रशिक्षणाकरता उमेदवारांना पात्र ठरायचे असेल तर याकरता अगोदर एक परीक्षा द्यावी लागणार आहे व या सामायिक प्रवेश परीक्षेमध्ये जे काही गुण मिळतील त्या आधारे प्रशिक्षणासाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

 इच्छुकांनी ऑनलाइन नोंदणी कुठे करावी?

यापूर्वी प्रशिक्षणाकरिता ज्या इच्छुक उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांना ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे व ही नोंदणी उमेदवारांना https://trtpune.in/bartregmay24/ या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. ऑनलाइन अर्ज तीन जुलै 2024 पर्यंत पाठवायचे आहेत.

Ajay Patil