स्पेशल

कौतुकास्पद! 30 गुंठा जमीन अन साडेतीन लाखांची कमाई, पहा ‘असं’ काय केलं बीडच्या ‘या’ शेतकऱ्याने

Published by
Ajay Patil

Beed Successful Farmer : मराठवाडा म्हटलं की सर्वप्रथम डोळ्यापुढे उभे राहत ते दुष्काळाच काळीज चिरणार चित्र. निश्चितच मराठवाड्याला दुष्काळामुळे नानाविध अशा संकटांचा सामना करावा लागला आहे. सातत्याने पडणारा दुष्काळ, त्यामुळे येणारी नापीकी यामुळे मराठवाड्यातील शेतकरी भरडला जात आहे. गेल्या काही वर्षात मात्र मराठवाड्यात पावसाच प्रमाण वाढल आहे. पावसाळी काळात समाधानकारक पाऊस आता होत असल्याने येथील शेतकऱ्यांनी शेतीमध्ये नाविन्यपूर्ण असे प्रयोग राबवले आहेत.

बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातही असाच एक कौतुकास्पद प्रयोग समोर येत आहे. येथील एका शेतकऱ्याने मात्र तीस गुंठे शेत जमिनीत पारंपारिक पिकांच्या शेतीला बगल देत फुलशेतीच्या माध्यमातून साडेतीन लाखांची कमाई करून दाखवली आहे. तालुक्यातील मौजे मोठे वाडी येथील विष्णू आबाराव रेडे या अल्पभूधारक शेतकऱ्याने ही कमाल केली आहे.

हे पण वाचा :- आनंदाची बातमी ! आता ठाण्यातून मुंबई, पुणे, नाशिक प्रवास करणे होणार सोपं; ‘या’ नवीन रस्त्यांसाठी हालचाली वाढल्या

वास्तविक प्रयोगशील शेतकरी रेडे हे तब्बल तेरा वर्षापासून फुल शेती करत आहेत. ते उसाची आणि गुलाब, मोगरा, गलंडा या फुलाची शेती करतात. तेरा वर्षांपूर्वीपर्यंत रेडे हे देखील इतर शेतकऱ्यांप्रमाणेच पारंपारिक पिकांची शेती करायची. मात्र या पारंपारिक पिकांच्या शेतीमध्ये वाढणारा उत्पादन खर्च आणि मिळणार उत्पादन याचा विचार केला असता त्यांना अतिशय कवडीमोल उत्पन्न मिळत होतं.

परिणामी त्यांनी उसाची आणि फुलांची लागवड केली. 2010 मध्ये आपल्या तीस गुंठे जमिनीत गुलाब, मोगरा, गलांडा या फुल पिकांची लागवड केली. गुलाब आणि गलांडा या फुलांचे पाचशे रोपे लावली आणि मोगऱ्याची आठशे रोपे त्यांनी लावली. त्यावेळी 51 हजाराचा खर्च यासाठी त्यांना आला. खर्च वजा जाता मात्र त्यांना चांगली कमाई या तीस गुंठ्यातून झाली. तेव्हापासून अविरतपणे ते फुल शेती करत आहेत.

हे पण वाचा :- पुणे, सोलापूर, कोल्हापूर, नांदेड, नागपूर वासियांसाठी महत्वाची बातमी! 31 मार्चपर्यंत ‘या’ रेल्वे गाड्या राहणार बंद, काय राहणार कारण?, पहा

अलीकडे मात्र फुलांना चांगला भाव मिळत असल्याने त्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. ते उत्पादित झालेले फुल जवळील बाजारपेठेत विक्री करतात. रोज सकाळी उठून फुलांची तोडणी केली जाते आणि माजलगाव बाजारात याची विक्री होते. मोगरा साधारणतः 25 ते 27 हजार रुपये प्रति क्विंटल या दराने विक्री होतो. गलांडा तीन हजार रुपये प्रति क्विंटल आणि गुलाबाच्या एका नगाला दोन रुपये असा भाव म्हणतो. जवळपास दहा महिने फुलांच्या शेतीतून त्यांना कमाई होते.

रोजाना दीड ते दोन हजार रुपये उत्पन्न त्यांना यातून मिळत. रेडे सांगतात की, गेल्या तेरा वर्षांपासून त्यांना या 30 गुंठे जमिनीतून दरवर्षी तीन ते साडेतीन लाखांचा निव्वळ नफा मिळतोय. निश्चितच विष्णू रेडे यांनी केलेला हा प्रयोग त्यांच्यासाठी फायदेशीर ठरला असून फुल शेतीच्या माध्यमातून त्यांना शाश्वत कमाई होत आहेत. यामुळे हा शेतकऱ्याचा नाविन्यपूर्ण प्रयोग इतरांसाठी नक्कीच मार्गदर्शक राहणार आहे. 

हे पण वाचा :- इंजिनिअरिंगच्या शिक्षणाला ठोकला रामराम! तरुणाने सुरु केली ‘या’ जातीची पेरूची शेती; अन मिळवले लाखोंची कमाई

Ajay Patil

Published by
Ajay Patil