अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- सरकारी तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत. आज सलग 24व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं घट होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
आज मुंबई शहरांत पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 94.14 रुपये प्रति लिटर इतकी आहे.
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत पेट्रोलची किंमत 103.97 रुपये प्रति लिटर, तर डिझेलची किंमत 86.67 रुपये प्रति लिटर इतकी आहे.
चेन्नईत पेट्रोल 101.40 रुपये प्रति लिटरनं आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर कोलकातामध्ये डिझेलची किंमत 89.79 रुपये आणि पेट्रोल 104.67 रुपयांनी विकलं जात आहे.
शहरं पेट्रोल / डिझेल (रुपये प्रति लिटर)
मुंबई – 109.98 रुपये | 94.14 रुपये
पुणे – 109.45 रुपये | 92.25 रुपये
रत्नागिरी – 111.69 रुपये | 94.43 रुपये
औरंगाबाद – 110.75 रुपये | 93.50 रुपये
नागपूर – 109.71 रुपये | 92.53 रुपये