भाऊबीज 2021 : काय आहे भाऊबीज? जाणून घ्या भाऊबीज साजरी करण्याची वेळ आणि मुहूर्त आणि महत्व

Published by
Ahmednagarlive24 Office

मित्रांनो दिपावली आनंद स्नेह समृद्धी ऐश्वर्य आणि शांती यांची उधळण करत आली. दिपावलीचे प्रत्येक क्षणाक्षण प्रत्येकाला हवे हवेसे वाटत असतात. दिपावली पासून नवं स्वप्नांची सुरूवात होते. येणाऱ्या पुढच्या दिपावली पर्यंत अनेक संकल्प तयार असतात आणि त्यातून त्यांना आनंद मिळवायचा असतो.

भाऊबीज हा दिवस दिपावलीचा शेवटचा दिवस मित्रांनो नात्यांना व्यक्तीच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. जन्मल्यापासून जोडल्या गेलेल्या प्रत्येक नात्याचं वेगळे वैशिष्ट देखील आहे. आई-बाबा, मावशी, आत्या, आजी, आजोबा, ताई आणि दादा यांना गोतावळ्यात अत्यंत महत्त्व आहे.

बहिण-भाऊ नात्यांचे महत्त्व पुराणकथांमध्ये ही दिसून येते. दिपावली हा सर्वांत मोठा सण आहे. कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज साजरी केली जात असते. भाऊबीजेला यमद्वितीया असेही म्हणले जाते. भाऊबीज हा नात्यावर आधारित सण उत्सव आहे. भाऊबीज हा सण मोठ्या श्रद्धेने आणि परस्पर प्रेमाने साजरा केला जात असतो.

रक्षाबंधना नंतर भाऊबीज हा भाऊ बहीणीच्या प्रेमस्नेहाचा सण आहे. यानिमित्ताने भाऊ बहिण एकमेकाप्रति प्रेमभावना व्यक्त करीत असतात. भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो. तिच्या सौभाग्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. या दिवशी घेण्यासाठी येणार म्हणूनबहिणीचे मन देखील उत्साहाने तनामनाला जणू नवसंजीवनी मिळत असते. भाऊबीज बहीण भावांच्या प्रेमाचे अतुट नाते जपणारा उत्सव आहे. भाऊ बहिणीचे नाते घट्ट करणारा दिवस म्हणजे भाऊबीज..

भाऊबीज काय असते :-
भारतीय सण उत्सव हा इतर देशांतील संस्कृतीत पेक्षा वेगळा असुन आनंद स्नेह वाटणारा आहे. भाऊबीज बहीण भावांच्या प्रेमाला अतुट बंधनांचा सण उत्सव आहे. भाऊबीज हा सण उत्सव कार्तिक शुद्ध द्वितीया या दिवशी साजरा करण्यात येतो. भाऊबीजेला यमद्वितीया असे सुद्धा म्हणतात. भाऊबीज हा दिपावलीतील दिवसांतील सहावा दिवस आहे. भाऊबीजेच्या दिवशी भाऊ तीला माहेरी आणण्यासाठी गेल्यावर बहिणी त्याचे मनू स्वागत करते.

बहीण भावासाठी गोडधोड जेवण बनवते. बऱ्याच ठिकाणी सकाळी किंवा सायंकाळी बहीण भावाला औक्षण करते व त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि भरभराटीसाठी प्रार्थना करत असते. भाऊराया बहीणीला ओवाळणी घालतो आणि तिला साडी भेट देतो..!!

भारतातील कायस्थ समाजाचे लोक भाऊबीजेच्या दिवशी भगवान चित्रगुप्ताच्या देवळात जाऊन दौत-टाकाची आणि चित्रगुप्ताची पूजा करून त्याच्याकडे दु:ख निवारण्याची प्रार्थना करतात. धार्मिक आणि पौराणिक कथा अशी सांगितली जाते की, भाऊबीज या दिवशी यमराजाने आपली आवडती बहीण यमुनेच्या घरी जाऊन, तिला साडी, सोण्या चांदीचे आणि हिरामोत्याचे दागिने भेट दिले होते,

म्हणून भाऊबीज या दिवसाला यमद्वितीया म्हणत असतात. धार्मिक ग्रंथानूसार भाऊबीजेच्या दिवशी यमुना नदीत स्नान करणे खुप पवित्र मानले जाते. यमुना नदीत स्नान केल्यामुळे त्यावर्षी यमपासून काहीच भय नसते अशी भावना आहे.

भाऊबीज कधी आहे ? :-
भाऊबीज हा सण बहीण भावांच्या पवित्र नात्याला ऋणानुबंध करणारा सण आहे. प्रत्येक बहीण भावांच्या दुष्टीने हा दिवस अतिशय महत्त्व असतो. भाऊबीज या दिवशी बहीण भावांच्या दिर्घ आयुष्यासाठी व त्याला सुख, शांती आणि समृद्धीची भरभराट लाभो यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करत असते तर भाऊ बहीणी घ्या सौभाग्य आणि तीच्या आयुष्यात भरपूर सुख, समाधान, समृद्धी, आणि ऐश्वर्य लाभो यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना केली जाते.
या वर्षीची भाऊबीज ही शनिवार ६ नोव्हेंबर या दिवशी आहे.

भाऊबीज साजरी करण्याची वेळ आणि मुहूर्त :-
या वर्षीची भाऊबीज ही शनिवार ६ नोव्हेंबर या दिवशी आहे. या दिवशी बहीण भावाला औक्षण करते भाऊ बहीणी चे आशिर्वाद घेऊन तीला भेट वस्तू आणि साडीची भेट देत असतो. हा दिवस बहिण भावाच्या प्रेमाची आपुलकी वाढवणारा आहे. हिंदू पंचांगानुसार यावर्षीच्या भाऊबीजेचा शुभ मुहूर्त हा सकाळी ८ : ०४ ते ११ : ४६ आणि सायंकाळी ६ : ०२ ते ९ : १२ असा शुभ मुहूर्त आहे.

भाऊबीज का साजरी केली जाते ? :-
दिपावली या उत्सवास सणांची माळ असे म्हणतात. दिपावलीच्या प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व आहे. दिपावली ही वसुबारस या सणापासुन सुरू होते आणि भाऊबीज हा दिपावलीचा शेवटचा दिवस असतो.

भाऊबीज बहीण भावांच्या नात्याची खोली वाढवत असतो. धार्मिक आणि पौराणिक कथा अशी प्रचलित आहे की, पौराणिक कथेनुसार असे सांगण्यात येते की, भगवान सूर्यदेव आणि त्याची पत्नी संज्ञा यांना दोन मुले होती, मुलाचे नाव यम व मुलीचे नाव यमुना असे होते.

भगवान सुर्यदेवाची पत्नी संज्ञाला भगवान सूर्यदेवांचा तप सहन झाला नाही म्हणून तीने स्वतःची सावली निर्माण करून आपल्या मुलाला आणि मुलीला आपल्या सावलीकडे सोपवून संज्ञाला माहेरी निघून गेली. या सावलीला आपल्या मुलांशी कसलीही ओढ आणि प्रेम नव्हते.

पण या दोन्ही भावा-बहिणींचे एकमेकांवर खूप प्रेम होते. पुढे यमुनेचे लग्न झाल्यावर यमुना आपल्या भावाला आपल्या घरी जेवावयास बोलावत असे, पण यमराज व्यस्त असल्याने यमुनाचा अग्रह टाळत होता. कारण त्याला दैनंदिन कामातून वेळ मिळत नसे. पण एक दिवस बहिणीच्या खूप आग्रहानंतर यमराज यमुनेला भेटण्यासाठी बलिप्रतिपदेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच कार्तिक शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी तिच्या घरी गेला.

यमुनेने आपला भाऊ यमराज यांचे मनापासून स्वागत करून सायंकाळी यमराजा यांच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावून त्यांच्यासाठी सुंदर चविष्ट भोजन बनवून त्यांचा पाहुणचार केला.

बहिणी यमुनेचे प्रेम, आपुलकी आणि आदराने केलेला पाहुणचार पाहुन यमराज प्रसन्न व आनंदी झाले. यमदेवाने बहीण यमुनेला काहीतरी मागण्यास सांगितले. तेव्हा यमुनेने तिला दरवर्षी याच कार्तिक प्रतिपदेच्या दुसऱ्या दिवशी घरी येण्याचे वरदान मागितले.

बहीण यमुनेची ही विनंती भाऊ यमराज यांनी मान्य करून तिला काही हिऱ्यामोत्याची आणि सोन्याचांदीचे दागिने भेट म्हणून दिले. भाऊबीजेच्या दिवशी बहिणीने टिळा लावलेल्या भावाला उत्तम आरोग्य लाभते अशी समज आहे. हा दिवस भावांच्या उत्तम आरोग्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. भाऊबीज या दिवसाला यम द्वितीया असेही अनेक ठिकाणी म्हणतात.
म्हणून बहीण भावांचे नाते अतूट प्रेमस्नेहाने ऋणानुबंध व्हावे हा त्यांच्या मागचा उद्देश असतो.

भाऊबीज कशी साजरी केली जाते ? :-
दिपावलीचा एक एक दिवस आणि दिवसांचा प्रत्येक क्षण आपल्या सर्वांना आनंद आणि प्रेम देऊन जातो. भारतीय हिंदू धर्मात रक्षाबंधन या सणानंतर भाऊबीजलाही विशेष महत्त्व असते.

भाऊबीजेच्या दिवशी बहिणी आपल्या लाडक्या भावाला टिळा लावते, भावाच्या दीर्घायुष्यासाठी, त्याला भविष्यात समृद्धी आणि ऐश्वर्य लाभो अशी उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना बहीण भावासाठी केली जाते. बहीण भावाला कुंकवाचा टिळा लावण्यासाठी प्रथम पूजेचे ताटात दिवे, अक्षता, मिठाई, सुपारी, करगोटा, एक रूपायाचे नाणे इत्यादी वस्तू ताट तयार केले जाते.

यानंतर तुपाचा दिवा पेटवल्यानंतर भावाची आरती करून त्यांच्या मुखात गोड मिठाई घालून औक्षण केले जाते. त्यानंतर त्याला सुपारी करगोटा दिला जातो. भाऊ बहीणीला साडी आणि भेटवस्तू देतो. धार्मिक आणि पौराणिक कथेनुसार बहिणी भावाला टिळा लावते तेव्हा भावाच्या आयुष्यावर येणारे सर्व संकट नष्ट होऊन त्याला उज्ज्वल आयुष्य प्राप्त होते असे मानण्यात येते. म्हणून भाऊबीज हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण आहे.

भाऊबीज या सणांचे महत्व :-
दिपावली ही आनंद, प्रेम, स्नेह,उत्साह, चैतन्य आणि भरभराट घेऊन येत व परमोच्च आनंद देऊन नैराश्याचा अंधकार दुर सारून सर्वत्र चैतन्याचा सडा शिंपणारा दिपावली हा सण प्रत्येकाला हवाहवासा वाटत असतो.

त्यामुळे या सणाची आपण सर्वांजण आतुरतेने वाट पाहातो. भाऊबीज हा सण बहीण भावांच्या नात्याला नवसंजीवनी देण्याचे काम करत असतो. दिपावलीतील प्रत्येक दिवसाचे वेगवेगळे विशेष महत्त्व आहे. त्या महत्त्व आणि विविधतेने दिपावलीचा सण उत्सव साजरा होतो.

भाऊबीज या सण निमित्ताने बहीण भावाकडे माहेरी येते. त्यांच्या सुखी आयुष्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करते. दोघेही एकमेकांच्या सुख दुःखाची देवाण घेवाण करतात. यानिमित्ताने इतर पाहुणेही घरी येत असतात. असा हा दिपावलीतील भाऊबीज सण उत्सव बहीण भावांच्या नात्याची वीण घट्ट करून जातो.

Ahmednagarlive24 Office