अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2022 :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशात लसीकरण मोहीम आजही युद्धपातळीवर सुरु आहे. यातच एक अत्यंत महत्वाची माहिती समोर येत आहे.
ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने नुकतेच नाकावाटे दिल्या जाणाऱ्या बूस्टर डोसच्या परिक्षणाला परवानगी दिली आहे. हैदराबाद स्थित भारत बायोटेककडून ही लस विकसित केली जात आहे.
नऊ ठिकाणी इंट्रानाझल बूस्टर डोसचे परिक्षण केले जाणार आहे. अलीकडेच डीसीजीआयने भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीच्या नियमित बाजारातील विक्रीला परवानगी दिली होती.
दरम्यान देशात कोरोनाची तिसरी लाट सक्रिय झाल्यानंतर कोरोनाचा बूस्टर डोसची गरज वाढू लागली आहे. त्या अनुषंगाने बूस्टर डोस देण्यात येऊ लागले आहे.
दरम्यान तिसऱ्या डोसच्या तिसऱ्या टप्प्यातील परिक्षणाला मंजुरी मिळालेली भारत बायोटेक ही देशातील दुसरी कंपनी आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉन स्ट्रेनचा मुकाबला करण्यासाठी बूस्टर डोस प्रभावी
ठरणार असल्याचे भारत बायोटेककडून सांगण्यात आले आहे. बूस्टर डोस म्हणून कोव्हॅक्सिन, कोविशिल्ड तसेच स्फुतनिक व्ही या लसींना आतापर्यंत परवानगी देण्यात आलेली आहे.