Talathi Bharati 2023 : गेल्या अनेक दिवसांपासून ज्या तलाठी भरतीच्या निकालाची वाट पाहिली जात होती त्या तलाठी भरतीचा निकाल या चालू महिन्यातच लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच लाखो उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
खरेतर तलाठी भरतीसाठी 11 लाखाहून अधिक उमेदवारांनी अर्ज केलेले होते. यापैकी दहा लाख 41 हजार 713 अर्ज पात्र ठरवण्यात आले आहेत. पैकी आठ लाख 64 हजार 960 उमेदवारांनी तलाठी भरतीची परीक्षा दिली आहे.
आता या लाखो विद्यार्थ्यांच्या माध्यमातून तलाठी भरतीचा निकाल केव्हा लागणार हाच सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान या भरतीच्या निकालाबाबत एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी माहिती समोर आली आहे.
तलाठी भरतीचा निकाल केव्हा लागणार आणि प्रत्यक्षात निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र केव्हा मिळणार याबाबत सूत्रांच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, येत्या आठवड्याभरात तलाठी भरतीचा निकाल लागणार आहे.
विशेष म्हणजे तलाठी भरतीचा निकाल लागला की लगेच जिल्हास्तरावर निवड यादी जाहीर केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर आता टीसीएस कंपनीच्या माध्यमातून गुणवत्ता यादी तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
हे काम आता येत्या आठवड्याभरात पूर्ण होईल आणि त्यानंतर याचा निकाल सार्वजनिक होणार आहे. याबाबत अतिरिक्त जमाबंदी आयुक्त व तलाठी परीक्षेच्या राज्य समन्वयक सरिता नरके यांनी सांगितल्याप्रमाणे सध्या टीसीएस कंपनीच्या माध्यमातून गुणवत्ता यादी तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
विशेष म्हणजे काही अधिकाऱ्यांनी तलाठी भरती अंतर्गत नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना 26 जानेवारी 2024 ला नियुक्तीपत्रे दिली जाणार असा दावा केला आहे. खरंतर वेगवेगळ्या तांत्रिक अडचणींमुळे तलाठी भरतीचा निकाल लांबला आहे.
त्यामुळे तलाठी भरतीची परीक्षा दिलेल्या उमेदवारांच्या माध्यमातून याचा निकाल केव्हा लागणार हा सवाल गेल्या अनेक दिवसांपासून विचारला जात होता. अशातच आता या परीक्षेचा निकाल येत्या आठवड्याभरात लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे लाखो नवयुवक तरुणांची गेल्या काही महिन्यांची प्रतीक्षा आता संपणार असा विश्वास व्यक्त होत आहे.