शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी! एका शेअरवर 5 बोनस शेअर्स देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट नोट करा

बोनस शेअर देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. गुजरात टूलरूम लिमिटेडनं आपल्या गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअरची घोषणा केली असून ही कंपनी प्रत्येक १ शेअरमागे ५ शेअर्स बोनस म्हणून देणार आहे. यामुळे कंपनीचे स्टॉक फोकस मध्ये आले आहेत.

Published on -

Bonus Share 2025 : सध्या शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या कंपन्यांकडून तिमाही निकाल जाहीर केले जात आहेत. सोबतच काही कंपन्या बोनस शेअर देत आहेत आणि काही कंपन्यांकडून डिव्हिडंट देण्याची सुद्धा घोषणा केली जात आहे. दरम्यान, शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या अशाच एका कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअरची घोषणा केली आहे.

यामुळे बोनस शेअर देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. गुजरात टूलरूम लिमिटेडनं आपल्या गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअरची घोषणा केली असून ही कंपनी प्रत्येक १ शेअरमागे ५ शेअर्स बोनस म्हणून देणार आहे. यामुळे कंपनीचे स्टॉक फोकस मध्ये आले आहेत.

खरेतर, कंपनीच्या बोर्ड मीटिंगमध्ये नुकताच याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. महत्त्वाची बाब अशी की, आता कंपनीनं या बोनस इश्यूसाठी रेकॉर्ड डेट सुद्धा जाहीर केली आहे. अशा परिस्थितीत आज आपण या बोनस इश्यूसाठी नेमकी रेकॉर्ड डेट काय आहे अन कंपनीच्या या घोषणेनंतर सध्या शेअर बाजारात स्टॉकची परिस्थिती कशी आहे? याचा एक आढावा घेणार आहोत.

रेकॉर्ड डेट कधी आहे?

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीच्या बोनस शेअर्ससाठीची रेकॉर्ड डेट याच महिन्यात आहे. कंपनीनं मंगळवार, १८ फेब्रुवारी रोजी या बोनस शेअरसाठी रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांचं नाव या दिवशी कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये राहील, त्यांना प्रत्येक शेअरवर बोनस म्हणून ५ शेअर्स दिले जातील कंपनीच्या शेअर्सची किंमत १५ रुपयांपेक्षा कमी आहे.

१ रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या प्रत्येक शेअरवर पात्र गुंतवणूकदारांना बोनस म्हणून ५ शेअर्स दिले जाणार आहेत. नक्कीच जे गुंतवणूकदार बोनस शेअर देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी राहणार आहे. दरम्यान कंपनीच्या या घोषणेनंतर सध्या या कंपनीचा स्टॉक शेअर मार्केटमध्ये फोकस मध्ये आला आहे.

शेअर बाजारातील कंपनीच्या स्टॉकची स्थिती कशी आहे?

आज 13 फेब्रुवारी 2025 रोजी गुजरात टूलरूम लिमिटेड या कंपनीचा स्टॉक बीएसईवर फोकस मध्ये राहिला आहे. या शेअर्समध्ये आज जवळपास ५ टक्क्यांची वाढ झाली आहे. आज हा शेअर ११.२० रुपयांवर उघडला.

काही काळानंतर बीएसईवर कंपनीच्या शेअरचा भाव ४.८५ टक्क्यांनी वाढून ११.३५ रुपयांवर पोहोचला. बीएसईवर या कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ४५.९७ रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांक १०.१८ रुपये इतका आहे. कंपनीचं मार्केट कॅप २६१.३१ कोटी रुपये इतके आहे.

गुंतवणूकदारांना किती परतावा मिळाला?

या स्टॉक मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना गेल्या तीन वर्षात चांगला परतावा मिळाला आहे. तीन वर्षात कंपनीचे शेअर्स जवळपास 811 टक्क्यांनी वाढले आहेत. पण, गेल्या वर्षभरात शेअर बाजारात कंपनीची कामगिरी खराब राहिली आहे.

या काळात शेअरच्या किंमतीत ६९.४४ टक्क्यांची घसरण झाली आहे. अर्थातच अल्पावधीत या कंपनीचे स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात अपयशी ठरले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe