Borivali Thane Tunnel : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थातच एम एम आर डी ए च्या माध्यमातून बोरिवली ते ठाणे दरम्यान भूमिगत मार्ग विकसित केला जात आहे.
या प्रकल्पांतर्गत अकरा किलोमीटर लांबीचे दोन भूमिगत बोगदे विकसित केले जाणार आहेत. या प्रकल्पासाठी जवळपास 11,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. दरम्यान या प्रकल्पासाठी नुकतीच टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी दोन कंपन्यांनी टेंडर भरले होते.
लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी) आणि मेघा इंजीनियरिंग या दोन कंपन्यांनी टेंडर भरले. यामध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने एल अँड टी कंपनीचे टेंडर नामंजूर केले आणि मेघा इंजीनियरिंग ला टेंडर दिले होते.
हे पण वाचा :- आनंदाची बातमी ! आता नासिकमधून ‘या’ शहरादरम्यान सुरू होणार किमान सेवा, प्रवाशांचा प्रवास होणार सुसाट
मात्र एल अँड टी कंपनीने या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता उच्च न्यायालयाने या प्रकरणावर सुनावणी घेत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने नामंजूर केलेले टेंडर योग्य असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे.
म्हणजेच आता बोरिवली ते ठाणे दरम्यान भूमिगत बोगद्याचे काम मेघा इंजीनियरिंग ही कंपनी करणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, बोरिवली ते ठाणे हा प्रवास सध्या उपलब्ध असलेल्या मार्गाने करण्यासाठी प्रवाशांना जवळपास दीड ते दोन तासांचा कालावधी खर्च करावा लागतो.
वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना अधिकचा वेळ लागतो. अशा परिस्थितीत प्रवाशांना ठाणे ते बोरिवलीचा प्रवास लवकर करता यावा, या दोन्ही शहरादरम्यान जलद कनेक्टिव्हिटी मिळावी म्हणून एम एम आर डी ए च्या माध्यमातून हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
हे पण वाचा :- आनंदाची बातमी ! ‘या’ बँकेत निघाली मोठी भरती, पगार मिळणार तब्बल 89 हजार, पहा डिटेल्स
या प्रकल्पांतर्गत अकरा किलोमीटर लांबीचे दोन बोगदे तयार केला जाणार आहे. आता याचे काम मेघा इंजीनियरिंग ही कंपनी करणार आहे. बोरिवली-मागाठाणे-एकता नगरमधून ठाणे मानपाडा येथील टिकुजी-नी-वाडी जवळ हा भुयारी मार्ग तयार होणार आहे.
प्रत्येक भुयारामध्ये तीन मार्गिका अशा दोन्ही भुयारांमध्ये एकूण सहा मार्गिका असतील. टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे मात्र तरीही या प्रकल्पाचे काम सुरू होण्यासाठी आणखी काही दिवस लागणार आहेत. पण पावसाळा सुरू झाल्यानंतर या प्रकल्पाचे काम सुरू होऊ शकते असा दावा केला जात आहे.
हे पण वाचा :- रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी ! अकोला मार्गे धावणारी ‘ही’ सुपरफास्ट ट्रेन सुरु झाली, पहा संपूर्ण वेळापत्रक