Budget Smartphone: स्मार्टफोन घ्यायचा आहे व तो देखील 10 हजार रुपये पेक्षा कमी किमतीचा! तर वाचा स्वस्त स्मार्टफोनची यादी

Pragati
Updated:

Budget Smartphone:- सध्या अगदी विद्यार्थ्यांपासून तर वृद्ध लोकांच्या हातामध्ये आपल्याला स्मार्टफोन दिसून येतात. कारण स्मार्टफोन हे गॅझेट खूप महत्त्वाचे असून त्यामुळे अनेक महत्त्वाची कामे आपण चुटकीसरशी करू शकतो. स्मार्टफोन ही आता काळाची गरज आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

बाजारामध्ये अनेक कंपन्यांचे स्मार्टफोन आपल्याला दिसून येतात व यामध्ये काही हजारापासून तर लाखो रुपये पर्यंत किंमत असलेले स्मार्टफोन मिळतात. बरेच व्यक्ती कमीत कमी किमतीमध्ये चांगला स्मार्टफोन विकत घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आपल्याला दिसून येते.

यामध्ये अनेक प्रकारचे स्मार्टफोन आपल्याला बाजारात दिसून येत असल्यामुळे नेमका कोणता फोन खरेदी करावा याबाबत खूप गोंधळ उडतो. या लेखामध्ये आपण असेच काही स्मार्टफोनची यादी बघणार आहोत चे दहा हजार रुपये पेक्षा कमी किमतीत मिळतात.

हे आहेत दहा हजार रुपयेपेक्षा कमी किमतीतील स्मार्टफोन

1- रेडमी 9i- हा स्मार्टफोन खूप महत्त्वाचा असून या स्मार्टफोनमध्ये 6.53 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे तसेच यामध्ये मीडिया टेक हिलीओ G25 प्रोसेसर देण्यात आले असून यामध्ये चार जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज उपलब्ध आहे. तसेच 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा व आठ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला असून यामध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे व याची किंमत 8299 रुपये इतकी आहे.

2- पोको C31- या स्मार्टफोनमध्ये देखील 6.53 इंच एचडी+ डिस्प्ले देण्यात आला असून यामध्ये मीडियाटेक हिलिओ G35 प्रोसेसर असून तीन जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज उपलब्ध आहे. यामध्ये तेरा मेगापिक्सल चा मुख्य कॅमेरा आणि पाच मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असून या फोनची किंमत 7490 रुपये आहे.

3- सॅमसंग गॅलेक्सी F02s– या स्मार्टफोनमध्ये देखील 6.51 इंच एचडी+ डिस्प्ले असून यामध्ये कॉलकॉम स्नॅप ड्रॅगन 450 प्रोसेसर देण्यात आला असून यामध्ये तीन जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज आहे. तसेच कॅमेरा पाहिला तर यामध्ये तेरा मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि पाच मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला असून याची किंमत 8490 रुपये आहे.

4- विवो Y1s- या स्मार्टफोन मध्ये 6.22 इंच एचडी+ डिस्प्ले देण्यात आला असून यामध्ये मीडिया टेक हिलिओ P35 प्रोसेसर असून 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज उपलब्ध आहे. तसेच यामध्ये तेरा मेगापिक्सल चा मुख्य कॅमेरा आणि पाच मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला असून यामध्ये 4030mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आलेली आहे. या स्मार्टफोनची किंमत 7490 इतकी आहे.

5- टेक्नो स्पार्क 9- या स्मार्टफोन मध्ये 6.6 इंच एचडी+ डिस्प्ले देण्यात आला असून मीडिया टेक हिलिओ G37 प्रोसेसर देण्यात आला असून यामध्ये चार जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज उपलब्ध आहे. तसेच तेरा मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि आठ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला असून यामध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे व याची किंमत 6990 रुपये आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe