स्पेशल

घर बांधणे होईल सोपे! सरकार देणार विनातारण होमलोन? काय आहे सरकारचा प्लॅनिंग?

Published by
Ajay Patil

Without Mortgage Home Loan:- वर्तमान परिस्थिती जर आपण बघितली तर यामध्ये जागा घेऊन स्वतःचे घर बांधणे किंवा घर विकत घेणे हे पाहिजे तेवढे सोपे राहिले नाही. कारण घरांच्या आणि जागांच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांना स्वतःचे घर उभारणे अशक्य होताना दिसून येते.

परंतु तरीदेखील बरेच व्यक्ती हे होमलोन सारख्या पर्यायाचा वापर करून स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करतात. आपल्याला माहित आहे की होम लोन घ्यायचे म्हणजे आपल्याला घराचे कागदपत्रे गॅरंटी म्हणून बँकेकडे तारण ठेवणे गरजेचे असते व तेव्हा कुठे बँकेकडून होमलोन दिले जाते.

परंतु आता कमी उत्पन्न गट आणि मध्यमवर्गीयांकरिता केंद्र सरकार एक नवीन योजना सुरू करणार असल्याची माहिती समोर आली आहे व त्या योजनेनुसार जे व्यक्ती होमलोन घेतील अशा व्यक्तींना आता कुठल्याही प्रकारची कागदपत्रे बँकेकडे तारण ठेवावी लागणार नाहीत किंवा कोणत्याही गॅरेंटरची देखील गरज भासणार नाही.

म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे म्हटले म्हणजे आता कुठल्याही हमीशिवाय होमलोन मिळणे शक्य होणार आहे. याबाबत सरकारचा प्रयत्न सुरू असून जर असं झाले तर नक्कीच देशातील नागरिकांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे.

कोणत्याही तारणाशिवाय मिळेल होम लोन?
मिळालेल्या माहितीनुसार, बघितले तर सरकार लवकरात लवकर एक नवीन गृहनिर्माण योजना सुरू करण्याच्या तयारीत असून या योजनेच्या माध्यमातून देशातील कमी उत्पन्न गटातील आणि मध्यमवर्गीय यांच्याकरिता स्वतःचे घर उपलब्ध करून देणे व त्याकरिता आवश्यक असलेले होम लोन हे कुठल्याही हमीशिवाय मिळवून देण्यासाठी या माध्यमातून प्रयत्न केला जाणार आहे

व याकरिता संबंधितांना होम लोनसाठी कुठल्याही प्रकारे मालमत्तेची कागदपत्रे तारण द्यावी लागणार नाहीत किंवा त्या लोनकरिता कोणत्याही गॅरेंटरची गरज भासणार नाही. मालमत्तेची कुठलीही कागदपत्रे नसताना देखील सरकार लोकांना होमलोन उपलब्ध करून देण्यावर सध्या काम करत असून नक्कीच यामुळे दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.

ज्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा उत्पन्नाचा पुरावा किंवा लागणारी आवश्यक कागदपत्र नाहीत अशा नागरिकांना घर खरेदी करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा या योजनेचा उद्देश असणार आहे.

मध्यमवर्गीयांसाठी सरकार करत आहे नवीन प्लॅनिंग
केंद्र सरकारच्या माध्यमातून या नवीन गृहनिर्माण योजनेच्या माध्यमातून कोणत्याही हमीशिवाय निम्न आणि मध्यमवर्गीय लोकांना 20 लाख रुपयापर्यंत कर्ज मिळू शकणार आहे व कर्ज परतफेड करण्यासाठी 30 वर्षाचा कालावधी असणार आहे. आता जर आपण बघितले तर केवळ आठ लाख रुपयापर्यंतचे कर्ज कोणत्याही हमीशिवाय दिले जाते.

इतकेच नाही तर या योजनेच्या माध्यमातून घेतलेल्या कर्जाच्या काही रकमेची हमी स्वतः सरकार घेणार आहे तर थर्ड पार्टीच्या हमीसह तुम्हाला गृहकर्ज मिळणे शक्य होणार आहे. कुठलीही कागदपत्रे गहाण न ठेवता हे कर्ज उपलब्ध होणार आहे.

जर कर्ज फेडण्यामध्ये काही चूक झाली तर सरकार 70% रकमेची हमी स्वतः घेणार असे बोलले जात आहे. या सगळ्या योजनेवर वित्त मंत्रालय आणि गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालय, नॅशनल हाऊसिंग बँक आणि इतर व्यावसायिक बँकांमध्ये सध्या बोलणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

निम्न आणि मध्यमवर्गीय कुटुंबे कोणाला म्हणतात?
सध्याची जर आपण तरतूद बघितली तर ईडब्ल्यूएस म्हणजेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक अशा कुटुंबांना मानले जाते की ज्यांचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपये पर्यंत आहे.

तसेच ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन ते सहा लाखांमध्ये आहे त्यांना अल्प उत्पन्न गटामध्ये मोडले जाते व वार्षिक उत्पन्न सहा ते नऊ लाख रुपये असणाऱ्या कुटुंबांना मध्यम उत्पन्न गटात मोडले जाते.

Ajay Patil