या पृथ्वीतलावर अनेक प्रकारचे प्राणी असून असंख्य अशा कीटकांचा संचार देखील आपल्याला या पृथ्वीतलावर असल्याचे दिसून येते. यामध्ये काही प्राणी हे अतिशय हिंस्र असतात तर काही अतिशय शांत असतात. काही प्राणी मांसाहारी असतात तर काही नसतात. सिंह, वाघ, बिबट्यासारखे प्राणी अतिशय धोकादायक समजले जातात.
कारण ते इतर प्राण्यांची शिकार करून त्यांचा उदरनिर्वाह करतात. या सगळ्या प्राण्यांच्या मध्ये जर आपण कुत्र्याचा विचार केला तर हा एक पाळीव प्राणी म्हणून देखील ओळखला जातो. परंतु यामध्ये देखील काही जंगली म्हणजेच रानटी कुत्र्यांच्या जाती अशा आहेत की ज्या अतिशय हिंस्र स्वरूपाच्या असतात.
कुत्र्यांच्या देखील अनेक जाती आहेत व त्यामध्ये काही संकरित जाती देखील आहेत असं देखील म्हटले जाते. परंतु या सगळ्या कुत्र्यांच्या जातींमध्ये जर आपण एका कुत्र्याच्या जातीची माहिती घेतली तर ती जात खूप खतरनाक म्हणजेच धोकादायक समजले जाते. असे म्हटले जाते की या जातीच्या कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये अक्षरशः हाडांची देखील पावडर होते म्हणजे चुरा होतो. नेमका हा कुत्रा कोणता आहे? याविषयीची माहिती हे लेखात आपण घेऊ.
कुत्र्याची ही जात आहे सर्वात धोकादायक
पिटबुल जातीचे कुत्रे तुम्ही पाहिलेले असतील अगदी त्याच पिटबुल सारखे दिसणारे कुत्रे म्हणजे बुली डॉग्ज होय. क्रॉस ब्रीडींगमध्ये कुत्र्यांची ही जात तयार झाली असे म्हटले जाते.
बुली डॉग्ज या कुत्र्याची उत्पत्ती वेगवेगळ्या प्रकारच्या पाच जातींच्या कुत्र्यांच्या संकरित प्रजनानंतर झाली आहे. बुली डॉग्स हा शिकारी कुत्रा म्हणून ओळखला जातो व कुठलीही गोष्ट शिकण्याची त्याची क्षमता खूप विकसित असून ती इतर कुत्र्यांच्या मानाने जास्त आहे.
याला तिच्या कुत्र्यांना व्यवस्थित प्रशिक्षण मिळाले तर ते खूप फायद्याचे ठरतात. परंतु जर त्यांना योग्य प्रशिक्षण मिळाले नाही तर ते सिंह किंवा वाघासारखे धोकादायक देखील ठरण्याची शक्यता अधिक असते.
बुली डॉग्ज जातीच्या कुत्र्याने जर चावा घेतला तर अक्षरशः शरीराची त्वचा आणि मांस देखील फाटते. एवढेच काय तर हाडांची पावडर किंवा चूरा देखील होण्याची शक्यता असते. असे म्हटले जाते की या कुत्र्याच्या हल्ल्यातून वाचणे खूप कठीण असते. हा एक रागीट कुत्रा असून त्याचा राग हा खूप धोकादायक असतो.
कसे असते बुली डॉग्जचे स्वरूप?
या अमेरिकन बुली डॉग्जचे चार प्रकार असून त्यामधील स्टॅंडर्ड, पॉकेट, एक्सेल आणि क्लासिक असे चार प्रकार पडतात. यातील एक्सल हा प्रकार सर्वात धोकादायक श्रेणीत येतो. या जातीच्या कुत्र्याचा आकार 19 ते 23 इंच असतो. यामधील क्लासिक जातीच्या कुत्र्यांचा आकार समान असतो तर सर्वात लहान आकाराचे कुत्रे हे पॉकेट प्रकारातील असतात. ते फक्त 13 ते 16 इंच इतकेच उंच असतात.