स्पेशल

Business Idea: महिन्याला खेळायचे असेल लाखोत तर सुरू करा ‘हा’ व्यवसाय! मिळेल सरकारी योजनांची आर्थिक मदत

Published by
Ajay Patil

Business Idea:- शिक्षण तर पूर्ण केलेले आहे परंतु आता नोकरी मिळत नाही. नोकरीसाठी वणवण भटकण्याची वेळ प्रत्येक तरुणांवर आलेली आहे. बरेच तरुणांची आर्थिक परिस्थिती नसताना देखील मोठ्या कष्टाने शिक्षण पूर्ण केले. परंतु नोकरीची वाणवा असल्यामुळे आता उदरनिर्वाहासाठी काय? हा विचार किंवा हा प्रश्न तरुणांपुढे मोठ्या प्रमाणावर आ वासुन उभा आहे.

त्यामुळे आता व्यवसाय करण्याशिवाय कुठलाही पर्याय नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. याकरिता सरकारच्या माध्यमातून देखील अनेक योजना राबवल्या जातात व या माध्यमातून व्यवसाय उभा करण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. याप्रकारे तुम्हाला देखील जर नोकरी नसेल व व्यवसाय सुरू करण्याचा  विचार करत असाल तर तुमच्यासाठी या लेखामध्ये महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे.

 सरकारी योजनांची मदत घ्या आणि सुरू करा बॉक्स निर्मिती व्यवसाय

बॉक्स निर्मिती व्यवसाय हा एक खूप महत्वपूर्ण असा व्यवसाय असून सध्या ऑनलाईन मार्केटचा जमाना असून ऑनलाइन पद्धतीने अनेक वस्तू बॉक्समध्ये बंद स्वरूपात पाठवण्याचा ट्रेड वाढला आहे.

त्यामुळे बॉक्स निर्मिती व्यवसायाला येणारा काळ हा खूप चांगला असणार आहे. तुम्हाला देखील व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही बॉक्स निर्मिती करण्याच्या व्यवसायामध्ये पैसे गुंतवून मोठी कमाई करू शकतात. या बॉक्सला मागणी देखील मोठ्या प्रमाणात असून त्यामुळे या व्यवसायात चांगला नफा मिळू शकणार आहे.

या व्यवसायामध्ये जर तुम्ही कष्ट आणि सातत्य ठेवले व पूर्ण ताकतीने प्रयत्न केले तर यश हे हमखास मिळू शकते. बाजारात प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच विविध प्रकारचे गिफ्ट, मोबाईल तसेच बूट व चप्पल पासून अनेक वस्तू तयार करणाऱ्या किंवा विक्री करणाऱ्या व्यवसायाकडून या बॉक्सेसला मोठी मागणी असते व असे अनेक उद्योग आहेत यामध्ये बॉक्स मोठ्या प्रमाणावर वापरले जातात.

 सरकार करते आर्थिक मदत

तुम्हाला देखील हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही कमी व्याजदरामध्ये सरकारच्या योजनांच्या माध्यमातून कर्जाचा लाभ घेऊ शकतात. योजनांच्या  दृष्टिकोनातून बघितले तर याकरिता तुम्हाला महाराष्ट्र सरकारची अण्णासाहेब पाटील कर्ज योजना व केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या मुद्रा योजनेचा लाभ मिळवू शकतात.

हा व्यवसाय जर तुम्हाला पूर्ण क्षमतेने सुरू करायचा असेल तर तुम्ही वीस लाख रुपये गुंतवूण हा व्यवसाय सुरू करू शकतात व छोट्या स्वरूपात देखील हा व्यवसाय तुम्हाला सुरू करता येतो.

 हा व्यवसाय सुरू करण्याआधी या गोष्टी करा

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला जर बॉक्स तयार करण्याचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुमच्याकडे पाच हजार ते साडेपाच हजार स्क्वेअर फुट जागा असणे गरजेचे आहे.

तुम्हाला केंद्र सरकारच्या लघु मध्यम उद्योग विभागाकडे या व्यवसायाची नोंदणी करावी लागेल त्यामुळे तुम्हाला सरकारच्या कर्ज योजनांचा लाभ मिळेल. तुम्हाला या व्यवसायाकरिता कंपनीचा परवाना व प्रदूषण प्रमाणपत्र आणि जीएसटी नोंदणी इत्यादी महत्वाच्या गोष्टी देखील कराव्या लागणार आहेत.

 किती होऊ शकते कमाई?

कुठलाही व्यवसायामध्ये कमाई किती होते किंवा किती मिळणार हे त्या व्यवसायाच्या स्वरूपावर आणि तुम्ही तो व्यवसाय किती क्षमतेने चालू केला आहे यावर अवलंबून असते.

जर हा बॉक्स तयार करण्याचा व्यवसाय पूर्ण क्षमतेने सुरू केला तर तुम्ही महिन्याला दोन लाख रुपये देखील कमवू शकतात. यामध्ये तुमचे मार्केटिंग आणि किती लोकांपर्यंत तुम्ही तुमचा व्यवसाय पोहोचवण्यामध्ये यशस्वी होत आहात  यावर देखील कमाईचे स्वरूप अवलंबून असते.

Ajay Patil