स्पेशल

Business Idea: तुमच्याकडे जर 2 लाख रुपये भांडवल असेल तर ‘हा’ व्यवसाय करा सुरू; महिन्याला कमवाल 50 हजार

Published by
Ajay Patil

Business Idea:- व्यवसायाची निवड किंवा एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तो प्रामुख्याने असा सुरू करावा की आपल्या आर्थिक आवाक्यामध्येच आपल्याला भांडवल टाकायचे काम येईल व त्या व्यवसायाच्या माध्यमातून मात्र नफा हा उत्तम मिळेल आणि प्रामुख्याने याच पद्धतीच्या व्यवसायाच्या शोधात बरेच जण असतात.

कारण एकदम सुरुवातीला पाच ते दहा लाख रुपयांचे भांडवल टाकून व्यवसायाला सुरुवात करणे म्हणजे स्वतःच्या पायावर दगड मारून घेण्यासारखे असते. त्यामुळे कमीत कमी आर्थिक भांडवल आणि जास्तीत जास्त नफा या दृष्टिकोनातून व्यवसायाची निवड ही  आपल्याला आर्थिक अडचणीत देखील येऊ देत नाही आणि हळूहळू आर्थिक समृद्धीच्या दिशेने देखील जाण्यास मदत करतात.

असे अनेक प्रकारचे व्यवसाय आहेत की ज्यामध्ये कमीत कमी भांडवल आणि जास्तीत जास्त नफा आपल्याला मिळवता येणे शक्य आहे. या मुद्द्याला धरूनच आपण असाच कमीत कमी भांडवलात सुरू करता येणारा व्यवसाय पाहणार आहोत.

 प्रदूषण चाचणी केंद्र सुरू करा आणि भरपूर पैसे कमवा

प्रदूषण ही आजकालची एक ज्वलंत समस्या असून प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून सरकार अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलत असते. याच पावलांचा एक भाग म्हणून सरकार प्रत्येक वाहनांची नियमित तपासणी करून प्रदूषण प्रमाणपत्र मिळावे अशा पद्धतीचा एक नियम सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे.

या प्रमाणपत्राचा कालावधी तीन महिने ते बारा महिन्यांपर्यंत असतो व अशा परिस्थितीमध्ये तुमच्यासाठी प्रदूषण चाचणी केंद्र व्यवसाय अतिशय फायद्याचा ठरू शकतो. साधारणपणे हा व्यवसाय सुरू करण्याकरिता तुम्हाला दोन लाख रुपये खर्च करणे गरजेचे असते व व्यवसाय सुरू झाल्यानंतर व चांगला विकसित झाल्यानंतर तुम्ही प्रत्येक महिन्याला 50 हजार रुपये कमवू शकतात.

सध्या वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली असून यामध्ये कार असो की स्कूटर प्रत्येकाला प्रदूषण प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र घेतल्यानंतर तर काही महिन्यांनी हे प्रमाणपत्र परत घ्यावे लागते. कारण वाहनांमुळे होणारे प्रदूषण एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त होणार नाही याची खात्री या माध्यमातून करता येते.

आपल्याला माहित असेलच की, नवीन मोटर वाहन कायद्यानुसार प्रदूषण प्रमाणपत्र जर वाहन धारकाकडे नसेल तर मोठ्या दंडाची तरतूद करण्यात आली असून हा दंड 10 हजार रुपये पर्यंत देखील असू शकतो. त्यामुळे या दंडापासून वाचण्याकरिता प्रत्येक वाहन धारकाला हे प्रमाणपत्र घेणे गरजेचे आहे. त्यामुळेच आपल्याला अनेक पेट्रोल पंपांवर आणि महामार्गांजवळ प्रदूषण चाचणी केंद्र दिसून येतात.

 प्रदूषण चाचणी केंद्र उघडण्यासाठी काय तयारी करावी लागते?

याकरिता तुम्हाला फारसा खर्च करावा लागत नाही. फक्त तुम्हाला आरटीओकडून परवानगी घ्यावी लागते व त्याकरता थोडासा वेळ लागतो. परवानगी व्यतिरिक्त तुमच्याकडे जमीन असणे गरजेचे आहे किंवा तुमच्याकडे स्वतःची जमीन किंवा जागा नसेल तर ती तुम्हाला भाडे स्वरूपात घ्यावी लागेल.

प्रदूषण चाचणी केंद्रासाठी अर्ज करावा लागतो व त्याकरिता पाच हजार रुपये शुल्क भरणे गरजेचे असते प्रत्येक वर्षाला या चाचणी केंद्राचे नूतनीकरण करावे लागते व दरवर्षी त्यासाठी पाच हजार रुपये खर्च करावा लागतो.

या व्यतिरिक्त तुम्हाला लाकूड आणि कथिल पासून एक स्ट्रक्चर बनवावे लागते व याकरिता 30 ते 40 हजार रुपयांचा खर्च येतो. प्रदूषण तपासणी मशीन तसेच कम्प्युटर, वेबकॅम इत्यादी करिता लागते एक ते दीड लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. प्रकारे तुम्ही दोन लाख रुपये गुंतवण्यासाठी गरजेचे असते.

 या व्यवसायातून किती नफा मिळेल?

आपल्याला माहित आहे की एका PUC प्रमाणपत्राची किंमत 50 ते 140 रुपये असते व बाईक करिता ते सर्वात कमी लागते. कार मालकाला पीयूसी प्रमाणपत्रासाठी 110 रुपये द्यावे लागतात व ज्यांच्याकडे डिझेल वाहन असेल त्यांना 140 रुपये खर्च करावा लागतो. या सगळ्यांमध्ये जर तुम्ही सरासरी 80 रुपये जरी घेतले तरी दिवसात 15 ते 20 वाहने नक्कीच तुमच्याकडे येतील.

अशा परिस्थितीमध्ये तुम्ही दररोज एक हजार दोनशे ते एक हजार सहाशे रुपये सहजपणे कमवू शकतात. अशाप्रकारे तुमची एका महिन्यात कमाई 36000 ते 48 हजाराच्या आसपास जाऊ शकते.

अशा प्रकारे तुम्ही दोन लाख रुपयांचे गुंतवणूक करून 40 हजार ते 50 हजार रुपये प्रत्येक महिन्याला कमवू शकतात. ज्या ठिकाणी वाहनाची गर्दी होत असेल अशा ठिकाणी जर तुम्ही हे केंद्र उघडले तर आणखी यामध्ये कमाई वाढते.

 अर्ज कुठे कराल?

तुम्हाला जर प्रदूषण चाचणी केंद्र उघडायचे असेल तर त्याकरिता तुम्हाला https://puc.parivahan.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा लागतो.

 प्रदूषण चाचणी केंद्र उघडताना या गोष्टी लक्षात ठेवा

प्रदूषण चाचणी केंद्र उघडताना तुम्हाला काही गोष्टींवर लक्ष ठेवावे लागते. जसे की तुम्हाला केबिनचा रंग पिवळाच ठेवावा लागतो व तशा प्रकारचा निर्णय सरकारने घेतला आहे. कारण जेणेकरून हा रंग लोकांना दुरून पाहता येईल.

महत्वाचे म्हणजे कॅबिने ची लांबी अडीच मीटर, रुंदी दोन मीटर आणि उंची दोन मीटर असावी. तसेच तुमच्या प्रदूषण चाचणी केंद्राचा परवाना क्रमांक देखील नमूद करणे आवश्यक असते.

Ajay Patil

Published by
Ajay Patil