स्पेशल

Business Idea: भाऊ फक्त घरी बसून ‘हे’ 3 व्यवसाय करा! ग्राहकांची खरेदीला घरी लागेल रांग; मिळेल भरपूर पैसा

Published by
Ajay Patil

Business Idea:- व्यवसाय करणे किंवा एखाद्या व्यवसायाची निवड करून तो यशस्वीपणे चालवणे याला खूप महत्त्व असून नोकऱ्यांची उपलब्धता खूपच कमी असल्यामुळे छोटे मोठे व्यवसाय करण्याशिवाय आता पर्याय नाही. व्यवसाय करायचे म्हटले म्हणजे त्यासाठी देखील आपल्याला पैसा लागतो.

परंतु अनेक व्यअवसाय आहेत की ते सुरू करण्यासाठी तुम्हाला जास्त प्रमाणात पैशांची आवश्यकता नसते. जे तुम्ही घरात बसून देखील असे व्यवसाय चांगल्या प्रकारे सेटअप करू शकतात व त्या माध्यमातून उत्तम असा नफा मिळवू शकता.

बऱ्याच तरुणांच्या हाताला सध्या काम नाही किंवा अनेक महिला अशा आहेत की त्या घरचे काम झाल्यावर त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर फ्री टाईम असतो. अशा मोकळ्या वेळेचा सदुपयोग करून काही व्यवसायांच्या मदतीने चांगला पैसा महिलावर्ग आणि बेरोजगार तरुण देखील मिळवू शकतात. या उद्देशाने या लेखामध्ये आपण अशाच काही होममेड फूड बिजनेसची माहिती घेणार आहोत. ज्या माध्यमातून आपण चांगला नफा मिळूवू शकतो.

 हे तीन व्यवसाय घरी बसून देतील उत्तम नफा

1- होम मेड बिर्याणी व्यवसाय आपल्याला माहित आहे की आजकाल हॉटेलमधून बिर्याणीचे पार्सल मिळतात व असे पार्सल घेऊन बरेच जण आवडीने बिर्याणी खात असतात. परंतु आपण जर हॉटेल वरून बिर्याणी मागवली तर तिची कॉन्टिटी ही खूप कमी असते.

त्याऐवजी मात्र होम बेड बिर्याणी कमी दरामध्ये भरपूर मिळते व खाण्याचा एक आनंद ग्राहकांना लुटता येतो. त्यामुळे घरी बिर्याणी बनवून त्याची विक्री करण्याचा व्यवसाय हा खूप चांगल्या पद्धतीने चालू शकतो व त्या माध्यमातून चांगला नफा मिळू शकतो.

2- मटनचिकन रस्सा बिझनेस आज-काल मांसाहार करणाऱ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात असून असे मांसाहार करणारे लोक अनेक प्रकारच्या मांसाहारी रेसिपी बनवून खात असतात व यामध्ये काहींना चिकन व सुक्क मटण तसेच नुसता रस्सा खायला आवडते. बऱ्याचदा मित्रांमध्ये देखील एकत्र येऊन रस्सा पार्टी केली जाते.

अशा पार्टीमध्ये घरगुती पद्धतीने बनवलेले मटण किंवा चिकन तसेच रस्सा खूप आवडीने खाल्ला जातो. त्यामुळे तुम्ही घरीच जर सुखे मटन किंवा चिकन तसेच रस्सा इत्यादी बनवून जर त्याची विक्री केली तर हा एक व्यवसाय चांगल्या पद्धतीने तुम्हाला पैसा देऊ शकतो.

3- माशांच्या रेसिपी बनवून तुम्हाला जर माशांचा फ्राय किंवा माशांचे कालवण चांगल्या पद्धतीने बनवता येत असेल तर हा व्यवसाय तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकतात.

यामध्ये कोकणी पदार्थ स्पेशली मासे फ्राय जर तुम्हाला बनवता येत असेल तर मात्र तुमच्याकडे मोठ्या प्रमाणावर ग्राहक येतील यात शंकाच नाही.त्यामुळे मासे फ्राय तसेच कालवण यांचाही व्यवसाय तेजीत चालणारा व्यवसाय असून तो तुम्ही घरी बसून करून चांगला पैसा मिळवू शकता.

Ajay Patil