स्पेशल

Business Idea: कमीत कमी खर्चामध्ये घ्या ‘या’ फ्रॅंचाईजी आणि कमाई करा लाखोत! वाचा वेगवेगळ्या फ्रॅंचाईजी बिझनेसची माहिती

Published by
Ajay Patil

Business Idea:- तुम्हाला देखील कमीत कमी खर्चामध्ये चांगला नफा कमवायचा असेल तर तुमच्याकरिता इतर व्यवसायांपेक्षा फ्रॅंचाईजी मॉडेल खूप योग्य असू शकते. कारण भारतामध्ये कमी गुंतवणुकीचे अनेक फ्रॅंचाईजी व्यवसाय आहेत व ते तुम्ही कमीत कमी जागेत आणि कमीत कमी गुंतवणुकीत सुरू करू शकतात.

नोकरीच्या मागे न लागता तुम्ही जर कमी भांडवलामध्ये काही फ्रॅंचाईजी व्यवसाय सुरू केले तर तुम्ही लाखो रुपयांची कमाई या माध्यमातून आरामात करू शकतात. या अनुषंगाने या लेखामध्ये आपण महत्त्वाच्या फ्रॅंचाईजी व्यवसाय बद्दलची माहिती घेणार आहोत व ती नक्कीच तुम्हाला उपयोगी ठरेल.

 या प्रकारच्या फ्रॅंचाईजी बिजनेस मधून तुम्ही कमवाल लाखोत

1- आधार केंद्र फ्रॅंचाईजी सरकारच्या आधार कार्ड सेवेअंतर्गत आधार केंद्र फ्रॅंचाईजी उघडून तुम्ही या क्षेत्रातल्या महत्त्वाच्या सेवा नागरिकांना देऊ शकतात. या प्रकारच्या व्यवसायामध्ये तुम्हाला कमीत कमी जागेची आवश्यकता असते व 100 ते 200 स्क्वेअर फुट जागेमध्ये तुम्ही आधार केंद्र सुरू करू शकतात.

ही एक सरकारी सेवा असून काही हजार रुपयांपासून तुम्हाला आधार केंद्र सुरू करता येते. आपल्याला माहित आहे की आधार केंद्र फ्रॅंचाईजी मधून आधार अपडेट तसेच नवीन आधार कार्ड जारी करणे इत्यादी सेवा दिल्या जातात व या माध्यमातून चांगले उत्पन्न महिन्याला मिळू शकते.

या व्यवसायासाठी साधारणपणे 30 ते 40 हजार रुपये गुंतवणूक व 100 ते 200 चौरस फूट जागेची आवश्यकता असते. या व्यवसायामधून तुम्ही प्रत्येक महिन्याला 25 ते 35 हजार रुपये कमाई करू शकता.

2- एसबीआय एटीएम फ्रॅंचाईजी तुम्हाला चांगले उत्पन्न हवे असेल तर तुमच्यासाठी एसबीआय एटीएम फ्रॅंचाईजी हा एक चांगला पर्याय असू शकतो. यामध्ये थोडी गुंतवणूक जास्त आहे परंतु जसजसे ग्राहक वाढतील तसे तसे या माध्यमातून तुम्हाला मिळणारा पैसा वाढत जाईल.

एसबीआय एटीएम फ्रॅंचाईजी करिता तीन ते चार लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागते व यामध्ये दोन लाख रुपये सुरक्षा ठेव म्हणून घेतली जाते. या व्यवसायाच्या माध्यमातून जर जमेची बाजू बघितली

तर एसबीआयचे ब्रँड व्हॅल्यू आणि एटीएमच्या वाढत्या गरजा नुसार तुम्ही प्रत्येक महिन्याला 60 ते 90 हजार रुपये आरामात कमवू शकतात. याकरिता तुम्हाला शंभर स्क्वेअर फुट जागेची आवश्यकता असेल व महिन्याला 30 ते 40 हजार रुपये कसेही तुम्ही कमवू शकतात.

3- पोस्ट ऑफिस फ्रेंचाईजी व्यवसाय भारतामध्ये अजून देखील ग्रामीण भागामध्ये आणि काही शहरांमध्ये देखील पोस्ट ऑफिसच्या सेवा हव्या त्या प्रमाणात पोहोचलेल्या नाहीत व त्यामुळे पोस्ट ऑफिसच्या सेवांची खूप मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.

भारतीय टपाल विभाग छोटे व्यवसायिकांना पोस्ट ऑफिस फ्रेंचाईजी उघडण्याची संधी देत असून ज्या ठिकाणी पोस्ट ऑफिसची सुविधा नाही अशा ठिकाणी तुम्हाला ही संधी दिली जाते.

या माध्यमातून तुम्ही पोस्ट कार्ड तसेच स्पीड पोस्ट व नोंदणीकृत पोस्ट यासारख्या अनेक सेवा देऊ शकतात व त्या बदल्यात तुम्हाला कमिशन मिळते. पोस्ट ऑफिस फ्रेंचाईजी करिता तुम्हाला पाच हजार ते दहा हजार रुपयांचे गुंतवणूक करावी लागते व दोनशे स्क्वेअर फुट जागेची आवश्यकता भासते व या व्यवसायातून तुम्ही पंधरा ते वीस हजार रुपये दरमहा कमवू शकतात.

4- प्रधानमंत्री कौशल विकास योजना प्रशिक्षण केंद्र प्रधानमंत्री कौशल विकास योजना अंतर्गत केंद्र सरकार लोकांना प्रशिक्षण देऊन रोजगार क्षम बनवण्यावर भर देत असून या योजनेअंतर्गत तुम्ही प्रशिक्षण केंद्र उघडण्यासाठी फ्रेंचाईजी घेऊ शकतात. या माध्यमातून युवकांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाते व त्या बदल्यात तुम्हाला सरकारकडून पैसे मिळतात.

कौशल्य प्रशिक्षण केंद्र तुम्ही छोट्या जागेत देखील चालवू शकता आणि चांगला नफा मिळू शकतात. या व्यवसायासाठी तुम्हाला साधारणपणे एक ते दोन लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागते व 500 ते 1000 स्क्वेअर फुट जागेची आवश्यकता भासते. या व्यवसायातून तुम्ही प्रत्येक महिन्याला तीस ते पन्नास हजार रुपयांपर्यंत कमाई करू शकता.

5- अमूल फ्रेंचाईजी व्यवसाय अमुल भारतातील एक प्रसिद्ध आणि विश्वासार्ह ब्रँड असून जो डेअरी उत्पादनांमध्ये संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. त्यामुळे तुम्हाला देखील व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही अमुल फ्रेंचाईजी घेऊन डेअरी उत्पादने विक्री करून चांगला पैसा मिळवू शकता.

या व्यवसायासाठी जास्त जागा लागत नाही आणि अगदी छोट्या दुकानांमधून तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. आपल्याला माहित आहे की अमुलची आईस्क्रीम, तूप तसेच दही व तूप इत्यादी दुग्धजन्य उत्पादनांना खूप मागणी असते व त्या दृष्टिकोनातून नफा देखील चांगला मिळतो.

अमुल फ्रॅंचाईजी घेण्यासाठी तुम्हाला दोन ते तीन लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागते. दरवर्षी तुम्ही पाच ते दहा लाख रुपयांची कमाई या माध्यमातून करू शकतात.या व्यवसाय करिता जास्तीत जास्त 300 ते पाचशे स्क्वेअर फुट जागेची आवश्यकता भासते.

Ajay Patil