Business Idea : तुमचीही स्वतःचा व्यवसाय असावा अशी इच्छा आहे का ? तुम्हालाही नजीकच्या भविष्यात नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे का ? मग आजची ही बातमी तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच वाचायला हवी. कारण की आज आपण बारा महिने तेजीत असणाऱ्या एका भन्नाट व्यवसायाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
खरे तर कोरोना काळापासून नवयुवक तरुणांचा आणि तरुणींचा माईंड सेट बदलला आहे. आता नोकरी ऐवजी व्यवसायाला अधिक महत्त्व दाखवले जात आहे. नोकरीमध्ये असणारी अनिश्चितता पाहता आता तरुण वर्ग व्यवसायाकडे वळू पाहत आहे.
छोटा का असेना पण स्वतःचा व्यवसाय असावा असे स्वप्न अनेकांनी उराशी बाळगले आहे. मात्र कोणता व्यवसाय सुरू करावा ? हेच अनेकांना सुचत नाही. दरम्यान आज आपण खिशातून फक्त दीड लाख रुपये खर्च करून सुरू होणाऱ्या एका बिजनेस आयडिया ची माहिती पाहणार आहोत.
कोणता आहे तो व्यवसाय
आम्ही ज्या व्यवसायाबाबत बोलत आहोत तो आहे बनाना पेपर मेकिंग बिझनेस. अलीकडे केळी पासून बनवलेल्या पेपरला बाजारात मोठी मागणी आली आहे. यामुळे हा बनाना पेपर मेकिंगचा व्यवसाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. बनाना पेपर मेकिंग प्लांट इस्टॅब्लिश करून तुम्ही लाखो रुपयांची कमाई करू शकणार आहात.
केळीचा कागद हा केळीच्या झाडाच्या सालाच्या किंवा केळीच्या सालीच्या तंतूंपासून तयार केला जातो. पारंपारिक कागदाच्या तुलनेत, केळीच्या कागदात कमी घनता, उत्तम डिस्पोजेबिलिटी, हाय टेंसिल स्ट्रेंथ असते. यामुळे बाजारात याला मोठी मागणी आहे. परिणामी हा बिजनेस सुरू केल्यास तुम्हाला चांगली कमाई होणार आहे.
दरम्यान, या व्यवसायाचा खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला आहे. या प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये हा व्यवसाय सुरू करण्यासाठी किती भांडवल लागू शकते आणि यातून किती कमाई होऊ शकते याबाबत अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
किती गुंतवणूक करावी लागणार
प्रोजेक्ट रिपोर्ट नुसार हा व्यवसाय सुरू करण्यासाठी जवळपास 16 लाख 50 हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागू शकते. यामध्ये मशिनरीज, कच्चामाल, बिझनेस साठी लागणारे शेड, वर्किंग कॅपिटल अशा विविध बाबींचा समावेश आहे.तथापि जर तुमच्याकडे एवढी अमाऊंट नसेल तर तुम्ही अवघी एक लाख 65 हजार रुपयांची गुंतवणूक करून उर्वरित 90 टक्के रक्कम ही फायनान्स करून घेऊ शकता.
म्हणजेच या व्यवसायासाठी लागणारी 90% रक्कम तुम्हाला बँकेकडून कर्ज स्वरूपात मिळू शकते. तसेच जर तुमच्याकडे साडेसहा लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक असेल तर तुम्ही पीएम मुद्रा योजनेअंतर्गत कमी इंटरेस्ट रेट वर दहा लाख रुपयांचे कर्ज मिळवू शकता.
व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला काही परवाने काढावे लागणार आहे. तुम्हाला तुमचा व्यवसाय रजिस्टर करावा लागणार आहे. तुम्हाला तुमच्या व्यवसायाची जीएसटी नोंदणी, एमएसएमई उद्योग ऑनलाइन नोंदणी, बीआयएस प्रमाणपत्र, प्रदूषण विभागाकडून एनओसी काढावी लागणार आहे. हे सर्व डॉक्युमेंटेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करू शकणार आहात.
कमाई किती होणार
जेवढा माल सेल होईल तेवढाच अधिकचा नफा यातून मिळणार आहे. यामुळे व्यवसाय सुरू केल्यानंतर मार्केटिंग वर विशेष लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. जर तुम्ही योग्य पद्धतीने मार्केटिंग केली तर या व्यवसायातून वर्षाकाठी पाच ते सहा लाख रुपयांची कमाई करता येणे सहजतेने शक्य आहे. म्हणजेच यातून महिन्याकाठी 50 हजार रुपयांचा नफा मिळू शकणार आहे.