स्पेशल

महिलांसाठी आनंदाची बातमी ! आता महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मिळणार ‘इतकं’ कर्ज, शासनाने सुरू केली विशेष योजना, पहा…..

Business Loan For Womens in marathi : महिलांसाठी आजची ही बातमी विशेष खास आहे. विशेषता ज्या महिलांना आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल अशा महिलांनी आजची ही बातमी संपूर्ण वाचणे जरुरीचे आहे. खरं पाहता गेले काही दशकात महिला सक्षमीकरणाचा मुद्दा प्रचंड गाजत आहे.

तसेच महिलांना पुरुषांप्रमाणे संधी उपलब्ध करून देणे हे शासनाचे कर्तव्य आहे. देशाची अर्धी जनसंख्या ही महिलांचीच आहे म्हणून त्यांनाही पुरुषांप्रमाणे अधिकार देणे, हक्क मिळवून देणे हे निश्चितच शासनाचे कर्तव्य असून शासनाने त्या दृष्टीने आता प्रयत्न देखील सुरू केले आहेत.

हे पण वाचा :- महिलांसाठी खुशखबर ! शासनाच्या ‘या’ योजनेतून मिळणार 5 लाखांचं विनातारण अन बिनव्याजी कर्ज; कोणत्या महिलांना मिळणार पाच लाख? पहा…

महिला आता शिक्षणात, उद्योगात, कृषी क्षेत्रात पुरुषांप्रमाणेच कामगिरी करत आहेत. अगदी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला आता काम करत आहेत. काही क्षेत्रात महिलांनी पुरुषांपेक्षा वरचढ कामगिरी केली आहे. यामुळे नारीशक्तीचा जागर देखील होत आहे.

मात्र, ज्या महिलांना व्यवसाय सुरू करायचा असतो अशा महिलांना प्रारंभी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामध्ये सर्वात मोठी अडचण आहे ती पैशांची. पैसा नसल्यामुळे महिलांना उद्योग सुरू करता येत नाही. परंतु आता शासनाने महिलांसाठी काही योजना सुरू केल्या आहेत ज्या योजनेच्या माध्यमातून महिलांना आता आपला व्यवसाय थाटता येणार आहे.

हे पण वाचा :- अवकाळी पावसाचा मुक्काम लांबला ! तब्बल ‘इतके’ आठवडे सलग पाऊस पडणार; भारतीय हवामान तज्ज्ञांचा अंदाज

अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मिळणार कर्ज

महिला या स्वयंपाक बनवण्यात पुरुषांपेक्षा निश्चितच वरचढ आहेत. अनेक महिलांना स्वयंपाक बनवणे आवडते. जर महिलांना आपल्या या फॅशनला व्यवसायात कन्व्हर्ट करायचे असेल. म्हणजे केटरिंगचा व्यवसाय करायचा असेल आणि भांडवल नसेल तर अन्नपूर्णा योजनेचा लाभ महिला घेऊ शकता.

महिला या योजनेअंतर्गत 50000 पर्यंतचे कर्ज घेऊ शकतात. यासाठी मात्र महिलांना गॅरेंटर लागणार आहे. तसेच हे कर्ज महिलांना 36 महिन्यात म्हणजेच तीन वर्षात परत करावे लागणार आहे. इतर कर्जाप्रमाणेच या कर्जासाठी देखील महिलांकडून व्याजदर आकारला जाणार आहे.

या योजनेअंतर्गत देशातील सर्वात मोठी बँक अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून कर्ज घेतलं जाऊ शकतं. या योजनेबाबत आणि लोनबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण आपल्या एसबीआयच्या जवळील शाखेला भेट देऊ शकता.

हे पण वाचा :- मुंबई-अहमदाबाद प्रवास आता होणार सुसाट आणि सुरक्षित; Mumbai-Ahmedabad हायवेवर ‘या’ ठिकाणी तयार होणार नवीन भुयारी मार्ग, पहा…..

महिला उद्योग निधी योजनेअंतर्गत नियुक्त कर्ज 

महिला आता उद्योगात आपलं नशीब आजमावत आहेत. अनेक महिलांनी व्यवसायात आपले वेगळेपण देखील दाखवल आहे. अशा परिस्थितीत आता देशातील काही प्रमुख बँकेच्या माध्यमातून तसेच वित्तीय संस्थांच्या माध्यमातून महिलांना व्यवसायासाठी भांडवल उपलब्ध करून दिले जात आहे.

यामध्ये पंजाब नॅशनल बँक देखील मागे राहिलेले नाही. देशातील महिला उद्योजकांना आर्थिक मदत करण्यासाठी पंजाब नॅशनल बँक (PNB) आणि स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (SIDBI) यांनी एक मोठी कल्याणकारी योजना सुरू केली आहे.

महिला उद्यम निधी योजना असं या योजनेचे नाव आहे. योजनेच्या माध्यमातून देशभरातील महिला उद्योजकांना 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते. विशेष बाब अशी की महिला उद्योजकांना हे कर्ज 10 वर्षांत फेडता येते. व्याजदर हे बाजारभावानुसार ठरवले जातात. निश्चितच महिला उद्योजकांसाठी ही देखील योजना फायदेशीर राहणार आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांनो काळजी घ्या ! ‘या’ जिल्ह्यात कोसळणार अतिमुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अलर्ट

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts