Business Tips:- जगातील जे काही यशस्वी व्यक्ती आहेत त्यांच्या जर आपण एकंदरीत जीवन किंवा जीवन प्रवास पाहिला तर आपल्याला अनेक प्रेरणादायी गोष्टी यामध्ये दिसून येतात. या व्यक्तींच्या अगदी दिवसाची सुरुवात म्हणजे सकाळी उठण्यापासून तर रात्री झोपेपर्यंतचा एकंदरीत दैनंदिन रुटीन इतर लोकांपेक्षा खूप वेगळ्या पद्धतीचा असतो व त्यांचे काम करण्याची पद्धत देखील खूप वेगळीच असते.
हेच वेगळेपण त्यांना त्यांच्या आयुष्याच्या सगळ्या टप्प्यांवर यशस्वी करून जाते. आधी याच पद्धतीने जर आपण जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये कायम नाव असणारे टेस्ला मोटर आणि स्पेसएक्स सारख्या मोठ्या कंपनीचे संस्थापक असलेले इलॉन मस्क यांचे उदाहरण घेतले तर यांचा एकंदरीत जीवन प्रवास हा खूप वेगळ्या पद्धतीचा असून तो इतरांना खूप प्रेरणा देणार आहे.
मस्क हे त्यांचे नाविन्यपूर्ण विचार आणि जोखीम पत्करण्याचा जो काही स्वभाव आहे त्यासाठी संपूर्ण जगात ओळखले जातात. अशा या महत्वपूर्ण असलेल्या मस्क यांनी व्यवसाय सुरू करण्यासाठी काही महत्त्वाच्या पाच टिप्स सांगितलेले आहेत. त्याबद्दल आपण या लेखात माहिती घेऊ.
इलॉन मस्क यांनी व्यवसाय सुरू करण्यासाठी सांगितलेल्या पाच टिप्स
1- कामाप्रती उत्साही राहणे– मस्क यांच्या मते तुम्ही जे काही काम करत आहात किंवा जो व्यवसाय सुरू करणार आहात त्याबद्दल तुम्ही कायम उत्साही असणे गरजेचे आहे. तसेच महत्त्वाचे म्हणजे ते असे म्हणतात की,व्यक्तीने तेच केले पाहिजे जे त्यांना आवडते किंवा ज्यामध्ये त्यांना आवड आहे. त्यामुळे त्यांना इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा खूप जास्त आनंद मिळतो व व्यक्ती व्यवसायामध्ये यशस्वी होतो.
2- जोखीम पत्करणे– मस्क म्हणतात की, तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल किंवा तुमच्या बँक अकाउंट मध्ये तुम्हाला भर घालायची असेल तर तुम्ही व्यवसायामध्ये कायम जोखीम पत्करायला तयार असणे गरजेचे आहे. एकदा 2012 मध्ये त्यांनी मुलाखत दिली होती व त्यामध्ये म्हटले होते की, प्रत्येक व्यक्ती एका साच्यात बसण्याचा प्रयत्न करत आहे.
जोखीम घेण्याविरुद्ध एक प्रचंड पूर्वा ग्रह आहे. एलोन मस्क यांचा असा विश्वास आहे की, कोणतीच जोखीम न घेणे की ही सर्वात मोठी जोखीम आहे. विशेषतः अशा जगामध्ये जे जग सातत्याने बदलत आहे. तसेच अपयशी ठरण्याची हमी एकमेव स्ट्रॅटेजी देते, ती म्हणजे जोखीम न घेणे
3- कठोर परिश्रमाची तयारी ठेवणे– याबद्दल ते म्हणतात की, चिकाटी ही खूप महत्त्वाची असते व जोपर्यंत तुम्हाला हार मानायला भाग पाडले जात नाही तोपर्यंत तुम्ही हार मानू नका. यापुढे मस्क यांचा विश्वास आहे की, यशस्वी होण्यासाठी लोकांना जीवतोड काम करावे लागेल.
जेव्हा तुम्ही इतरांपेक्षा जास्त कष्ट घ्याल तेव्हा तुमच्या यशाची शक्यता वाढते व त्याकरता कठोर परिश्रम करणे गरजेचे आहे. पुढे ते म्हणतात की एक सारख्या कामासाठी जर इतर लोक 40 तास आठवड्यात घालवत असतील
आणि त्याचवेळी तुम्ही आठवड्याचे 100 तास काम करत असाल तर तुम्हाला माहिती आहे की, या व्यक्तींना एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी वर्ष लागतं ते तुम्ही चार महिन्यात करू शकतात.
4- स्वतःमध्ये गुंतवणूक करणे– यातील सर्वात उत्तम सल्ला जर त्यांचा कोणता असेल तर तो म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट चांगल्या प्रकारे कशा करता येतील याचा सतत विचार करा आणि स्वतःला प्रश्न विचारा. मस्क हे जेव्हा आठ वर्षाचे होते तेव्हा दिवसाला दहा तास वाचन करत होते. विशेष म्हणजे त्यांना पुस्तक वाचण्याची आवड इतकी प्रचंड प्रमाणात होती की लायब्ररीत वाचण्यासाठी त्यांच्याकडील पुस्तके संपली होती व त्याकरिता त्यांनी संपूर्ण इन सायक्लोपीडिया वाचण्याचा निर्णय घेतला.
मस्क यांनी त्यांच्या सुरुवातीच्या वयात काहीतरी नवनवीन गोष्टी शिकण्याचा निरंतर प्रयत्न केला व स्वतःमध्ये गुंतवणूक करण्यावर पूर्ण लक्ष केंद्रित केले. म्हणजे मस्त यांनी स्वतःला प्रोग्राम करायला शिकवले आणि वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी 500 डॉलर्समध्ये व्हिडिओ गेम लिहिली आणि ती विक्री देखील केली.
पुढच्या कालावधीमध्ये मात्र पेनिसेल्विनिया विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांनी भौतिकशास्त्र आणि अर्थशास्त्रात दुहेरी पदव्या घेतल्या.
मस्क यांचे जीवन जर पाहिले तर त्यांनी सतत स्वतःमध्ये आणि त्यांच्या पाहिलेल्या स्वप्नांमध्ये गुंतवणूक करण्यावर भर दिला व त्याचीच परिणीती म्हणून ते आज जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जातात. विशेष म्हणजे मस्क यांनी अनेक व्यवसायाची सुरुवात अगदी शुन्यातून केली आणि ते यशाच्या शिखरावर पोहोचवले आहेत.
5- कामात चिकाटी ठेवणे–इलॉन हे या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जातात. परंतु यामधील जर त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास पाहिला तर तो तितकासा सोपा मात्र नव्हता.
आज आपल्याला जितके ते यशस्वी म्हणून दिसतात तितके त्यांच्या जीवनामध्ये अपयश देखील खूप मोठ्या प्रमाणावर आलेले होते. परंतु जेव्हाही त्यांना अपयश आले तेव्हा त्यांनी चिकाटी दाखवली आणि हार न मानता प्रयत्न करून त्यातून बाहेर पडले. उदाहरणच घ्यायचे झाले तर मस्क यांनी स्थापन केलेले Zip2 आणि PayPal या दोन्ही कंपन्यांमधून ते बाहेर पडले व 2008 च्या मंदीच्या लाटेत त्यांची टेस्ला आणि स्पेस एक्स या दोन्ही कंपन्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभ्या होत्या.
तेव्हा असे वाटत होते की मस्क पुन्हा अपयशाच्या दरीत लोटले जातील. परंतु मस्क यांनी आधी झालेल्या चुकांमधून बरेच काही स्वतःसाठी शिकून घेतले होते व त्यातूनही ते चिकाटीने बाहेर पडले.
यातून आपल्याला असे दिसून येते की कितीही काही संकटे आली तर त्यातून बाहेर निघण्यासाठी आधीच्या आयुष्यामध्ये आलेल्या अनुभवातून शिकून त्या चुका पुन्हा न करता त्यातून बाहेर निघणे आणि प्रेरणा शोधत राहणे खूप गरजेचे आहे.