सण उत्सवाच्या कालावधीमध्ये फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन सारख्या ई कॉमर्स प्लेटफॉर्मच्या माध्यमातून फेस्टिवल सिझन सेल सुरू करण्यात आलेले आहेत व या माध्यमातून अनेक महागड्या वस्तू स्वस्त दरात खरेदी करण्याची संधी प्राप्त झाली आहे
यामध्ये अनेक इलेक्ट्रिक उपकरणे तसेच घरगुती वापरातील वस्तू व त्यासोबत बाईक्स आणि कारचा देखील समावेश आहे. या अनुषंगाने तुम्हाला जर येणाऱ्या उन्हाळ्याची व्यवस्था आतापासून करून ठेवायची असेल व तुम्हाला जर एसी खरेदी करायचा असेल तर तुम्ही अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल 2024 च्या माध्यमातून दीड टन स्प्लिट एसी कमी किमतीमध्ये खरेदी करू शकणार आहात.
या सेलमध्ये सर्व स्प्लिट एसी तीन आणि पाच स्टारच्या एनर्जी रेटिंगमध्ये उपलब्ध आहेत. तुम्हाला जर हे स्प्लिट एसी विकत घ्यायचे असतील तर ते तुम्हाला 46% च्या सवलतीत ॲमेझॉन वरून ऑर्डर करता येणार आहेत.इतकेच नाहीतर या खरेदी करिता तुम्ही एसबीआय कार्ड वापरले तर तुम्हाला तब्बल दहा टक्के अतिरिक्त सूट देखील मिळणार आहे.
ॲमेझॉन सेलमध्ये कोणते एसी आहेत उपलब्ध?
1- डायकिन 1.5 तीन स्टार इन्वर्टर स्प्लिट एसी– हे तीन स्टार एनर्जी रेटिंग सह असलेला एसी असून यामध्ये 2.5 पीएम फिल्टरसह ट्रिपल डिस्प्ले आहे. ड्यू क्लीन तंत्रज्ञानासह हा एसी तुमची खोली पूर्णपणे थंड करेल.
तुम्ही या एसीला घरातील कुठल्याही रूम किंवा बेडरूममध्ये सहजपणे बसवू शकतात. या एसीमध्ये वापरण्यात आलेले कॉपर कंडेन्सर कॉइल केवळ कुलिंग सुधारत नाही तर देखभाल खर्च देखील कमी करतो. हा एसी ॲमेझॉन सेलमध्ये 40,000 पेक्षा कमी किमतीत तुम्ही खरेदी करू शकतात.
2- व्होल्टास 1.5 टन तीन स्टार इन्वर्टर स्प्लिट एसी– हा एसी ग्रेट इंडियन सेलमध्ये 46% च्या मोठ्या सवलतीत उपलब्ध आहे. यामध्ये चार इन 1 समायोज्य मोड देण्यात आलेले असून ज्या माध्यमातून तुम्ही तापमानानुसार कुलिंग बदलू शकतात.
तसेच यामध्ये अँटी डस्ट फिल्टर देण्यात आले असून हा एसी ऑटो क्लीन फंक्शन्ससह येतो. हा एअर कंडिशनर केवळ थंड हवाच देत नाही तर हवा शुद्ध करण्याचे काम देखील करतो. हा एसी खरेदी केल्यानंतर तुम्हाला त्यावर एक वर्षाची वॉरंटी मिळते.
3- पॅनासोनीक 1.5 टन ५ स्टार वायफाय इन्वर्टर स्मार्ट स्प्लिट एसी– हा स्प्लिट एसी असून जो पाच स्टार एनर्जी रेटिंग आणि इन्वर्टर कंप्रेसर सह येतो. या एसीमध्ये सात इन 1 परिवर्तनीय कुलिंग मोड देण्यात आलेले असून या एसीमध्ये चार वे स्विंग देण्यात आलेले आहेत.
त्यामुळे खोली सर्वत्र थंड करण्यास मदत करते व यामध्ये तुम्ही व्हाईस कमांड देऊन देखील नियंत्रित करू शकतात. तुम्ही जर हा एसी डाऊनपेमेंट करून खरेदी करू शकत नसाल तर तुम्ही ॲमेझॉन ग्रेट इंडियन सेल वरून ईएमआयच्या माध्यमातून देखील खरेदी करू शकतात.
4- लॉयड 1.5 टन तीन स्टार हेवी ड्युटी इन्व्हर्टर स्प्लिट एसी– हा एक स्मार्ट आणि सुबकपणे डिझाईन केलेला एसी असून कुलींगचा चांगला आनंद घेण्यासाठी मध्यम आणि मोठ्या आकाराच्या खोलीमध्ये इन्स्टॉल करू शकतात.
हा लॉयड इन्वर्टर स्प्लिट एसी 100% इनर ग्रूव्हड कॉपर कंडेन्सरसह येतो व जो थंड होण्यास मदत करतो. अति उष्णतेमध्ये देखील खोली उत्तम प्रकारे थंड करण्यास हा एसी सक्षम आहे.हा एसी तुम्ही ॲमेझॉन सेल 2024 मधून कमीत कमी किमतीत खरेदी करू शकतात.
5- गोदरेज 1.5 टन पाच स्टार इन्व्हर्टर स्प्लिट एसी– हा एसी पाच वर्षाच्या सर्व समावेशक वॉरंटीसह येतो. यामध्ये हेवी ड्युटी कूलिंग करिता कॉपर कंडेन्सर कॉइल आहे.
याच्या मदतीने 52 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये देखील उत्तम प्रकारे रूम थंड करू शकतो. दीड टन क्षमतेचा हा एसी ॲमेझॉनच्या ग्रेट इंडियन सेलमध्ये 37 हजार 990 च्या किमतीत उपलब्ध आहे.