होंडाची 80 हजाराची बाईक घ्या आणि 60 किलोमीटरचे मायलेज मिळवा! ही बाईक घ्याल तर राहील फायद्याचा सौदा

Pragati
Published:
honda levo

ज्या कुणाला बाईक घ्यायचे असते असे प्रत्येकजण आपल्या बजेटमध्ये परवडेल आणि उत्तम मायलेज देईल अशा बाईकच्या शोधात असतात. भारतीय बाईक बाजारपेठेमध्ये एक लाख रुपये पेक्षा कमी किमतीत मिळतील अशा भरपूर बाईक असून अशा कमी किमतीतल्या आणि वैशिष्ट्यपूर्ण फिचर्स असलेल्या बाईंकना मागणी असते.

भारतीय बाजारपेठेमध्ये प्रामुख्याने होंडा, हिरो तसेच बजाज, सुझुकी आणि यामाहा सारख्या कंपन्यांच्या बाईक प्रसिद्ध आहेत व यामध्ये जास्त करून होंडा,हिरो व बजाजच्या बाईक्सना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. याप्रकारे तुम्हाला देखील जर बाईक खरेदी करायचे असेल आणि तीही होंडा कंपनीची तर होंडा लिव्हो ही बाईक सर्वात उत्तम ठरेल.

काय आहेत होंडा लिव्होची वैशिष्ट्ये?

कंपनीने या बाईकमध्ये 109.51cc क्षमतेचे पावरफुल इंजिन दिले असून ही बाईक 8.6 बीएचपी पावर आणि ९.३एनएम टॉर्च जनरेट करते. जर आपण होंडाच्या या बाईकचे मायलेज पाहिले तर याबाबत होंडा कंपनीचा दावा आहे की ही बाईक 60 किलोमीटर पर लिटरचे मायलेज देण्याचा सक्षम आहे.

होंडाची ही नवीन जनरेशन बाईक असून त्यामध्ये डिजिटल कन्सोल देण्यात आला आहे. या बाईक मध्ये ड्रम ब्रेक आणि कंबाइनड ब्रेकिंग सिस्टम देण्यात आलेली आहे. त्यामुळे दोन्ही टायरवर उत्तम नियंत्रण मिळवण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने मदत होते.

या बाईकमध्ये अलॉय व्हिल देण्यात आलेल्या आहेत व त्यामुळे ती खूप स्टायलिश दिसते. जर आपण या बाईकच्या सिटची उंची पहिली तर ती 790 मीमी असून त्यामुळे कमी उंची असलेला व्यक्ती देखील ही बाईक आरामात चालवू शकतात. हे बाईक आरामदायी रायडिंग करिता सिंगल पीस सीट्स येते व हायस्पीडसाठी यामध्ये चार स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आलेले आहे.

या बाईकचा टॉप स्पीड 110 किमी प्रति तास असून नऊ लिटरची इंधन टाकी देण्यात आले. या बाईक मध्ये ड्रम आणि डिस्क असे दोन्ही ब्रेक पर्याय असून ट्यूबलेस टायर देण्यात आलेले आहेत व टायरची साईज १८ इंचाची आहे.

किती आहे होंडा लिव्होची किंमत?

या बाईकची एक्स शोरूम प्रारंभिक किंमत 79 हजार 950 रुपये असून टॉप मॉडेलची किंमत एक लाख तीन हजार रुपये इतकी आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe