स्पेशल

सणासुदीला खरेदी करा हाय परफॉर्मन्स बजाज पल्सर बाइक! वाचा बजाज पल्सरच्या प्रत्येक प्रकाराचे किंमत आणि वैशिष्ट्ये

Published by
Ajay Patil

आपल्याला सगळ्यांना माहित आहे की बजाज पल्सर ही भारतातील सर्वात लोकप्रिय बाईक असून गेली अडीच दशके ग्राहकांच्या हृदयावर बजाज पल्सरने राज्य केले आहे. तुम्हाला माहिती असेल की बजाज पल्सर सिरीजची पहिली बाईक साधारणपणे 2001 मध्ये लॉन्च करण्यात आलेली होती व तेव्हापासून या बाईकने ग्राहकांमध्ये लोकप्रियता मिळवलेली आहे.

या सिरीज अंतर्गत भारतामध्ये 125cc ते 400cc पर्यंतच्या दोन डझनपेक्षा अधिक मोटरसायकली विकल्या जातात. त्यामुळे तुम्हाला देखील जर बजाज पल्सर रेंजची बाईक या सणासुदीमध्ये खरेदी करण्याचा प्लॅन असेल तर तुम्ही ॲमेझॉन वरून देखील ऑनलाईन खरेदी करू शकतात. या लेखामध्ये आपण या बजाज पल्सर बाइकच्या काही प्रकारांची माहिती व त्यांची किंमत थोडक्यात जाणून घेणार आहोत.

 या आहेत उत्कृष्ट अशा बजाज पल्सर बाइक

1- बजाज पल्सर 125 बाईक बजाज पल्सर 125 बाईक सिंगल सीट आणि स्प्लिट अशा दोन प्रकारांमध्ये देण्यात आली आहे आणि तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या रंगसंगतीमध्ये तिला खरेदी करू शकता. या बाईकमध्ये 125cc सिंगल सिलेंडर एअर कुल्ड डीटीएस- आय इंजिन देण्यात आले असून जे 11.8 पीएस पावर आणि 10.8 एनएम टॉर्क जनरेट करते.

हे इंजिन पाच स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे व या बाईकची इंधन टाकी क्षमता ही अकरा लिटरची आहे व वजन 142 किलो आहे. या बाईकमध्ये हॅलोजन हेडलाईट, एलईडी टेल लाईट, अनलॉग आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, लो फ्युएल इंडिकेटर, पायलट लॅम्प तसेच कॉम्बी ब्रेकिंग सिस्टीम इत्यादी वैशिष्ट्ये देण्यात आलेले आहेत. या बाईकची किंमत 80 हजार 811( एक्स शोरूम दिल्ली) इतकी आहे.

2- बजाज पल्सर 150 बाईक या बाईक मध्ये 149.5 सींगल सिलेंडर एअर कुल्ड इंजिन देण्यात आले असून याची पावर 14 पीएस आणि 13.25m टॉर्क जनरेट करण्याची आहे. हे इंजिन पाच स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्सशी जोडलेले आहे व या बाईकमध्ये 15 लिटरची इंधन टाकी बसवण्यात आली आहे.

ही मोटरसायकल सिंगल डिस्क ब्रेक्ससह आणि ड्युअल डिस्क अशा दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. या बाईकमध्ये सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, एलईडी टेललाईट, लो फ्युएल इंडिकेटर, सिंगल चैनल एबीएस, स्प्लिट सीट तसेच बॉडी ग्राफिक्स, इंजिन कील स्विच, पास स्विच इत्यादींचा यामध्ये समावेश असून या बाईकची किंमत एक लाख 14 हजार 230 रुपये आहे.

3- बजाज पल्सर एन 160- ही बाईक ड्युअल चॅनल एबीएस या एकाच प्रकारात उपलब्ध आहे. या बाईकला पावर करण्यासाठी 164.8 सीसी सिंगल सिलेंडर एअर ऑइल कुल्ड इंजिन देण्यात आले असून जे 16 पीएस पावर आणि 14.65 एनएम टॉर्क जनरेट करते.हे इंजिन पाच स्पीड कॉन्स्टंट मेश गिअरबॉक्सशी जोडलेले आहे व यामध्ये 14 लिटरची इंधन टाकी आहे. या बाईकची किंमत एक लाख 41 हजार 218 रुपये आहे.

4- बजाज पल्सर एफ 250- ही बाईक फक्त एकाच प्रकारात ऑफर करण्यात आली आहे व त्याला पावर करण्यासाठी सिंगर सिलेंडर ऑइल कुल्ड इंजेक्टड इंजिन देण्यात आले असून यामध्ये 239.7cc इंजिन देण्यात आले आहे जे 24.5 पीएस पावर आणि 21.5 एनएम टॉर्क देते.

हे इंजिन पाच स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे व या बाईकची इंधन टाकी 14 लिटरची आहे. ही बाईक 17 इंच आलोय व्हीलसह येते व यामध्ये एमआरएफ ट्यूबलेस टायर्स वापरण्यात आलेले आहेत.

या बाईकमध्ये बूमरँग आकाराचे एलईडी डीआरएल, यूएसबी चार्जिंग पोर्ट, सेमी डिजिटल कन्सोल, गिअर इंडिकेटर, इंजिन कील स्विच आणि रेंज इंडिकेटर इत्यादी वैशिष्ट्ये देण्यात आलेले आहेत. या बाईकची एक्स शोरूम किंमत एक लाख 51 हजार 795 रुपये आहे.

5- बजाज पल्सर एनएस 200- ही मोटरसायकल स्टॅंडर्ड व्हेरियंटमध्ये उपलब्ध असून यामध्ये 199.5cc सिंगल सिलेंडर इंजिन प्रदान करण्यात आले आहे. जे २४.५ पीएस पावर आणि 18.74 एनएम टॉर्क जनरेट करते. इंजिन सहा स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे व या बाईकची इंधन टाकीची क्षमता बारा लिटरची असून तिचे वजन 158 किलो आहे.

या बाईकच्या पुढील बाजूला अपसाईड डाऊन फोर्क व मागच्या बाजूला नायट्रोक्स मोनो शॉक सस्पेन्शन देण्यात आलेले आहेत. तसेच ब्रेकिंग ड्युटी डुएल चॅनल ABS सोबत पुढील आणि मागील बाजूस अनुक्रमे 300mm आणि 230mm डिस्क ब्रेकद्वारे हँडल केल्या जातात. या बाईकची एक्स शोरूम किंमत एक लाख 61 हजार 430 रुपये इतकी आहे.

Ajay Patil