Discount Offer On Honda Cars:- भारतामध्ये ग्राहकांमधील लोकप्रिय असलेल्या कंपन्यांच्या कार जर बघितल्या तर यामध्ये होंडा कार्स इंडिया या कंपनीच्या अनेक कार्स ग्राहकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. होंडा कार्स इंडियाचा मोठा ग्राहक वर्ग भारतामध्ये असून या कंपनीच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक चांगली फीचर्स आणि परवडणाऱ्या किमती मधील कार लॉन्च करण्यात आलेले आहेत.
त्यामुळे ग्राहकांचे हित डोळ्यासमोर ठेवून या कंपनीने आतापर्यंत चांगल्या पद्धतीने काम केलेले आहे. अगदी याच अनुषंगाने जर आपण बघितले तर ग्राहकांना या नवीन वर्ष 2025 मध्ये होंडा कार्स इंडियाच्या माध्यमातून एक चांगली आणि फायदेशीर अशी भेट देण्यात आली आहे.
म्हणजेच या वर्षात होंडा कार्सने आपल्या लोकप्रिय असलेल्या तीन कारवर भरघोस अशी सूट ऑफर केली असून या वर्षात विक्रीत वाढ व्हावी हा त्यामागचा उद्देश आहे व ही सूट प्रामुख्याने होंडा एलेवेट, 5th Gen City आणि होंडा सिटी वर मिळत असून ती साधारणपणे 90 हजार रुपयांपर्यंत आहे. यासोबतच कंपनीने एक वारंटी पॅकेज देखील सादर केले आहे.
होंडाच्या या तीन कार्सवर मिळत आहे 90000 पर्यंत सूट
1- होंडा सिटी- होंडा कार्सने त्यांच्या लोकप्रिय असलेल्या होंडा सिटीच्या सर्व व्हेरियंटवर जवळपास 73 हजार 300 रुपये पर्यंत डिस्काउंट ऑफर केला आहे.
होंडाच्या या कॉम्पॅक्ट सेडानची एक्स शोरूम किंमत 11 लाख 82 हजार ते 16 लाख 35 हजार रुपये पर्यंत आहे.ही एक उत्तम अशी कार असून त्यात स्पेस देखील चांगला आहे.
2- होंडा एलिव्हेट- जर या जानेवारी महिन्यामध्ये तुम्ही होंडा एलिव्हेट खरेदी केली तर तुम्हाला तब्बल 86 हजार 100 रुपये पर्यंतचा डिस्काउंट यामध्ये मिळू शकतो.
होंडा एलिव्हेटची एक्स शोरूम किंमत 11 लाख 91 हजार रुपयांपासून सुरू होते. या कारमध्ये 1.5- लिटर पेट्रोल इंजिन आहे. ही कार 17 किलोमीटरचे मायलेज देते.
3- होंडा सिटी हायब्रीड- या नवीन वर्षामध्ये होंडा सिटी हायब्रीडच्या सर्व व्हेरिएंटवर जवळपास 90 हजार रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. जर आपण या कारची भारतातील किंमत पाहिली तर ती १९ लाखापासून सुरू होते
व 20.55 लाख रुपये एक्स शोरूम इतकी आहे. या कारचे मायलेज उत्तम असून ही कार एक लिटर मध्ये हायब्रीड मोडमध्ये 26.5 km चे मायलेज देते. या कारमध्ये 1.5- लिटर पेट्रोल इंजिन असून जे 126 पीएस पावर जनरेट करते.